मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|वामन जयंती| वामनदर्शनाने बुद्धिमोचन वामन जयंती विषय ज्ञानदेव तु कैवल्यम ह्रदिस्थ वामन (आध्यात्मिक) वामनदर्शनाने बुद्धिमोचन वामनबुद्धिप्रवेश व उपनिषदभाव वामन जयंती - वामनदर्शनाने बुद्धिमोचन श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा. Tags : bhajandattaदत्तभजन वामनदर्शनाने बुद्धिमोचन Translation - भाषांतर कर्म आणि फ़ल, सातत्ये सेवितां । बुद्धिला जडता थोर येते ॥१॥तेणे अदितीला थोर चिंता पडे । घालिती, सांकडे वामनाला ॥२॥पयोव्रत करी अव्यक्त निरोपे । जेणे सर्व पापे दग्ध होती ॥३॥इंद्रियांचा रस, तेच जाणा पय, । तेणे हरि-पाय सेवितसे ॥४॥फ़ाल्गुनांत करी पयोव्रत सती । हरि-पद-रती धरोनीयां ॥५॥जेव्हा शंकरांनी काम हा जाळीला । त्याच समयाला व्रत करी ॥६॥याचा अर्थ ऐसा, काम, सर्वेश्वरा । अदिती, उदारा अर्पितसे ॥७॥तेणे सगुणाचा होय साक्षात्कार । वामन सुंदर प्रगटत ॥८॥संस्काराने त्यासी करोनी संस्कृत । तया पाठवीत बुद्धीपाशी ॥९॥कर्म उपासना ह्याची जी का जोड । फ़ळ तीचे गोड ऐसे आहे ॥१०॥फ़लाभिसंधीने बुद्धि झाली जड । तीच होय नड मोक्षालागी ॥११॥विनायक म्हणे वामनदर्शन । बुद्धिचे मोचन करिल की ॥१२॥ N/A References : N/A Last Updated : February 02, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP