वामन जयंती - ह्रदिस्थ वामन (आध्यात्मिक)

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


सर्व देवमयी प्रसिद्ध अदिती । जियेला सेविती सर्व देव ॥१॥
जिचेसाठी घडे विषयसेवन । रससमर्पण इंद्रियांच ॥२॥
हिरण्यगर्भरुपी जे का आदिशक्ति । जिची असे भक्ती सकळांसी ॥३॥
विश्व ह्रदयांत भरोनी राहिली । भूतांसह उदेली प्रथम जे ॥४॥
तिची उपासना वामन दर्शन । देतसे करुन निजभक्तां ॥५॥
संभजनीय ह्रदिस्थ प्रत्यगामा । जो का परमात्मा वामन तो ॥६॥
प्राणां, वरी सारी, अपान, खाली करी । मध्ये स्थिती करी वामन तो ॥७॥
पृथ्वी अन्तरिक्ष आणि स्वर्गामाजी । ऐकेक जो योजी निजपाद ॥८॥
ऐसा ह्रदयाकाशी वामन बैसला । पाहिजे देखिला ध्यानामध्ये ॥९॥
कर्म उपासना यांचिया साधनी । घडत वामनी भेटी जाणा ॥१०॥
विनायक म्हणे सेवा अदितीला । भेटा वामनाला मग सुखे ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : February 02, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP