ऋष्यशृंग पदी ठेवोनियां माथा । म्हणे माझ्या अर्था पुरविले ॥१॥
सभार्य येवोनी मज धन्य केले । प्रसादाते भले पावविले ॥२॥
ऐशी करी स्तुति परम तुष्ट राजा । अयोध्येसी बोजा परतला ॥३॥
तीन्ही राण्या होती मग गरोदर । तेज ते प्रखर लोटतसे ॥४॥
परब्रह्म आले कौसल्येच्या पोटी । शोभत गोमटी गर्भतेजे ॥५॥
चैत्र नवमीसी मध्याह्नी येतां रवि । प्रभाते प्रगटवी तेव्हां मह ॥६॥
सुर-वर पुष्पवृष्टि करिताती । दुंदुंभि वाजती स्वर्गामाजी ॥७॥
शुद्ध पक्षामाजी देव अवतरे । आनंद संचरे त्रैलोक्यांत ॥८॥
अप्सरा नाचती गंधर्व आलपिती । उत्सव करिती त्रिभुवनी ॥९॥
कौसल्येसी राम कैकेयीसी भरत । दोन पुत्र होत सुमित्रेसी ॥१०॥
लक्ष्मण शत्रुघ्न पुत्र तिला झाले । अभिधान केले वसिष्ठाने ॥११॥
रावणवधार्थ राघव पातला । विश्वास जाहला त्रिभुवना ॥१२॥
धन्य धन्य धन्य धन्य दिन आज । झाला अधोक्षज प्रगट की ॥१३॥
विनायक म्हणे प्रसाद करावा । आम्हांसी बरवा दयाघन ॥१४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 25, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP