मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|राम नवमी| दशरथाचा यज्ञाविषयी विचार राम नवमी विषय दशरथाचा यज्ञाविषयी विचार मसलतीची अंमलबजावणी सूत निवेदन पायसप्राप्ति रामजन्म राम नवमी - दशरथाचा यज्ञाविषयी विचार श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा. Tags : bhajandattaदत्तभजन दशरथाचा यज्ञाविषयी विचार Translation - भाषांतर सोमवार ता. ७-४-१९३०अयोध्येसी राजा दशरथ ख्यात । असतां वर्तन काय झाले ॥१॥सर्व सुखे त्यासी, परी न संतती । चिंता झाली चित्तीं बहु त्याच्या ॥२॥तवं आले मनी अश्वमेध यज्ञ । करुनी ब्रह्मयज्ञ तोषवावा ॥३॥बोलावी पुरोहित सकळ प्रधान । सकळ विद्वान बोलावीत ॥४॥तपोधन सारे बोलावित राजा । यज्ञ, पुत्रकाजा, करणे म्हणुनी ॥५॥अश्वमेध यज्ञे तोषवावा हरी । म्हणोनि अंतरी येत माझ्या ॥६॥तुमचा विचार मज कळवावा । आशिर्वाद द्यावा महंत हो ॥७॥सकळांनी तेव्हां अनुमोदियेले । अनुज्ञेत दिले संतोषाने ॥८॥सकळ राण्यांसी भेटतसे नृप । व्रतस्थ साक्षेप रहावित ॥९॥यज्ञदिक्षा घेणे मनांत आणिले । प्रजेसाठी भले म्हणे राजा ॥१०॥सकळ राण्यांसी हर्ष थोर झाला । विचार पटला सकलांसी ॥११॥मग सुमंत्रांसी सांगे नृपवर । सिद्धता साचार करावी हे ॥१२॥विनायक म्हणे पुढील अनुसंधान । लावोनियां मन ऐकावे की ॥१३॥ N/A References : N/A Last Updated : January 25, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP