मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसद्गुरुलीलामृत|पूर्वार्ध|अध्याय दुसरा| समास चवथा अध्याय दुसरा समास पहिला समास दुसरा समास तिसरा समास चवथा अध्याय दुसरा - समास चवथा श्रीसद्गुरुलीलामृत Tags : pothisanskritपोथीसंस्कृत समास चवथा Translation - भाषांतर श्री गणेशायनम: । श्रीसीतारामचंद्रायनम: श्रीसदगुरवेनम: । श्रीरामसमर्थ । जयजय श्रीबालकृष्णा । तुझिये कृपें निरसे तृष्णा । शरण जाणूनि करी करूणा । विनंती माझी ॥१॥बालरुप गुरुवर । दिवसेंदिवस होती थोर । कराया पतितांचा उध्दार । नररुप धरियेलें ॥२॥असो बारशाचा दिवस । आनंदले बहुवस । पाचारिले सोनारास । कानीं मुद्या घालिती ॥३॥ताशा मरफा आणि सूर । ढोल सनई सुस्वर । शिंगें वाजविती चतुर । वाजंत्री अनेक ॥४॥बाळासिभूषणें घालिती । पंचधातूंचे वाळे करिती । वाघनखें सुवर्णी गुंफिती । गाठलें घालिती पुतळयांचे ॥५॥कंठी सुवर्ण सांखळी । बिंदली मनगटीं हसोळी । आंगठया घालिती करांगुलीं । रणजोडवें पायांत ॥६॥ऊर्णावस्त्राचें आंगडें । गजनीचें करती टोपडें । जरीकुंचीसी गोंडे क्क। कनकपुष्पे लाविती ॥७॥सुवासिनी बहुत जमल्या । खण नारळ कुंच्या आणिल्या । कोणी वाळे कोणी बिंदल्या । आणिती यथाशक्ती ॥८॥पाळणा सुंदर रंगविला । खेळणीं लाविलीं जयाला । घालिती मऊ शय्येला । दुपटीं रंगीत चिटांची ॥९॥बाळासी पोटकुळीं धरिती । पाळण्याखालूनी देती । गोविंद गोपाळ घ्याहो म्हणती । हर्षभरें ॥१०॥दर्शन उद्वेग चिंता हरी । वाटे दुजा सिंदुरारी । गणेश नाम ठेविती नारी । सदगुरूंचें ॥११॥सुंठवडा वांटला सत्वर । घुगर्या सत्वर । घुगर्या पेढे साखर । गणेश नामाचा गजर । नरनारी करिताती ॥१२॥हळद कुंकू ओटी । परस्परें करिती दाटी । वायन दानें दिधलीं मोठीं । अपूर्व सोहळा जाहला ॥१३॥गणपतीचें मुख पाहती । सुहास्य वदन गंभीरवृत्ती । दर्शनें आनंद चित्ती । न समाये ॥१४॥पहाहा सोज्वळ बाळ । नसे श्लेष्म आणि लाळ । न करी रडोनि गोंधळ । योगियापरीं स्थीर दृष्टी ॥१५॥ब्रह्मरंध्री वायु खेळे । दशमद्वार ते मोकळें । सहजानंदाचे सोहळे तें मोकळें । सहजानंदाचे सोहळे । नित्य भोगी ॥१६॥नवल वाटलें सकळांसी । अवतरले ज्ञानराशी । धन्य धन्य तुमची कुशी । धन्य तुमचें दर्शन ॥१७॥हरुषें कोंदलें गगन । सोहळा झाला पूर्ण । ज्योतिषी तेथें येवोन । जातकांचे वर्तविती ॥१८॥मीन लग्नी जन्म यासी । कुंडाली परिसावी कैसी । स्वगृही तनुस्थानासी । बृहस्पती देवगुरू ॥१९॥वृषभे केतु सहजांत । कर्के स्वगृही निशिनाथ । वृश्चिके शोभे धरणीसुत । राहुसंगे घेवोनी ॥२०॥नक्रे बुध शुक्र शनी । अत्युत्तम एकाद्श स्थानी । कुंभे द्वादशीं तरणी । शुभदायक सर्व ग्रह ॥२१॥होईल हा भगवद्भक्त । भगवद्भजनी आसक्त । तुम्हांसी न कामा येत । प्रपंचाचे ॥२२॥घराचे करील देऊळ । मिळवील बालगोपाळ ।नांदवील सज्जन आणि खळ । एकें ठायीं ॥२३॥लक्ष्मी नांदेल यांचे घरी । परी हा नित्या भिकारी । दीन जनांचा कैवारी । होईल सदा ॥२४॥विद्या पाहतां अगणीत । गणीतें न गणवे नेमस्त । ब्रह्मज्ञानी होईल सत्य । ऐसें आम्हां वाटतें ॥२५॥भार्या पुत्र आणि धन । यावरी नसे आसक्त मन । स्वस्वरूपीं अनुसंधान । ठेवील निश्चयेसी ॥२६॥शमवी अंतर शत्रूसी । बाह्य शत्रू नसे यासी । सदा प्रेमळ वाग्विलासी । अनंत शरण येतील ॥२७॥उभय कुळें उध्दरील । अनन्यासी तारील । कीर्ति डंका वाजवी त्रिभुवनी ॥२८॥उपाध्ये जातक वर्तवीती । दक्षिणा देऊनि बोळविती । अंगारे धुपारे करिती । दृष्ट होईल म्हणोनि ॥२९॥पाळण्या बाळ निजवोनि । पाळणे गाई जो जो म्हणोनि । दोरी हलवी गुरुजननी । मुख चुंबी क्षणाक्षणा ॥३०॥पुत्रप्रेम न वर्णवें । माय होवोनि जाणावें । येरीं शुध्दें वर्णावें ।स्वल्पकांही ॥३१॥जरी पुत्र असला सदगुणी । सशक्त गोंडस गौरवर्णी । मग तें प्रेम कोण वानी । माउलीचें ॥३३॥दिवसेंदिवस बाळलीला । पाहूनि प्रेमाचा उमाळा । आठविती घनसांवळा । तव कृपें लाधलों ॥३४॥आज बाळ उपडी वळलें । मान सावरूं लागलें ॥ माणूस न्याहाळी वाहिले । स्थीरदृष्टी ॥३५॥ पाहाहो रांगत गेला । टिको नेदी वस्तूला । कोणी आवरावें याला । चपल भारी ॥३६॥आजाची अति प्रीति । कडिये घेवोनि फिरती । नाना वस्तूंची दाविती । हास्त करी विनोदें ॥३७॥प्रसंगे रडों लागला जरी । महणता रामकृष्ण विठठल हरी । उगा राहोनी श्रवण करि । अत्यंत आवडी भजनाची ॥३८॥सर्वापाशी जात आहे । म्हणती जगमित्र दिसताहे । तुसड अपमतलबी नोहे । जनप्रियत्व करील ॥३९॥करांगुली घाली मुखांत । गाई पाळील हा बहुत । देउळीं सहा खेळत । देवभक्त होईल ॥४०॥ बालका संनिध राहती । क्षण एक न विसंबती । संगतीसुखासी मिती । नाहीं नाहीं ॥४१॥पिता पाहतां विरक्त । परी पुत्र दर्शनी आसक्त । म्हणे शांत होतें चित्त । दर्शनें याच्या ॥४२॥आधीं बाल स्नेह परम । त्याही वरी सत्समागम । संगतीसुख निरुपम । वाटे सकळांसी ॥४३॥गणपती बोबडे बोले । सकळां कौतुक वाटलें । आपणही तैसे चाळे । करिती त्या सवें ॥४४॥जमले गुरुलीला गुरूभक्त श्रोते । जे बोधाऽमृताचे भोवते । कथन केलें व्यवहारातें । ह्मणतील जरी ॥४५॥गुरूलीला बोधयुक्त । कथन करावी त्वारित । जेणे श्रवण होती पुनित । श्रोतयांचे ॥४६॥वक्ता बोले जी प्रमाण । प्रसंगें वर्तलें जें जाण । केलें पाहिजे कथन । यथा रीती ॥४७॥राज भेटीची आवडी । परी दूत आडवी देवडीं क। तिष्ठावें लागतें घडिघडीं । हांजीं हांजी म्हणोनी ॥४८॥मधुर भोजनाचे भोक्ते । परी मिठावाचूनि अडतें । म्हणती असावें रायतें । चवी लागीं ॥४९॥श्रवणीं बैसले सज्जन । गुरूलीला परम गहन । यथाशक्ति विवरण केलेंचि करूं ॥५०॥रंगी बेरंगी खेळणीं देती । टाळी घंटा वाजविती । बागुल आला कोणी म्हणती । भीती दाविती ज्ञानिया ॥५१॥माहेरी गीताईसी । नेती पाहती बाळासी । आजा आजी संतुष्ट मानसीं । अत्यंतिक जाहली ॥५२॥उष्टावणाचा सोहळा । करी आनंदे मावळा । अलंकार घालिती बाळा । पुरविती हौस ॥५३॥बाळ उभा राहिला । त्यासी पांगुळगाडा केला । अडखळत चालूं लागला । धांवे गुरांसंनिध ॥५४॥इकडे लिंगोपंत रावजीसी । नगमे अहर्निशी । दूता हातीं गीताईसी । आणविले त्वरित ॥५५॥असो ऐसी गुरुमाउली । दीन जनांची साउली । भक्तालागी पावली । मनुष्यरुपें ॥५६॥रावजी वैराग्यें उदासी । वाटे शिव स्मशानवासी । गीता ज्ञानी सदगुणेसी । उमा प्रत्यक्ष वाटतें ॥५७॥कलिमलासूर मातला । बध्द मुमुक्षां अजिंक्य जाहला । म्हणोनि अवतार घेतला । गणपतीनें ॥५८॥भवरोगें जन व्यापिलें । कृतांत मुखी चालले । चतुर वैद्य पाठविले । श्रीरामरायें ॥५९॥परमार्थ धामीं निघाले । मार्गी चोरटे जमले । विपरीत कथोनी भ्रमविलें । भलतीकडे ॥६०॥तैं आले रामदूत । ठकां पिटाळूनि लावित । शुध्द मार्गे चालवीत । मार्गस्थांसी ॥६१॥माणदेशीचे लोक । भोळे वदती बहुतेक । परी सद्गरूंनीं नि:शंक । योग्यतेसी दाविलें ॥६२॥धन्य कुळ धन्य ग्राम । धन्य देश पावन परम । धन्य भक्त पुरुषोत्तम । सद्गुरू भेटी लाधले ॥६३॥ज्ञानसूर्य उगवला । हळुं हळूं प्रकाश फांकला । साधकां आधार मिळाला ल। आदर्शभूत ॥६४॥पुढील चरित्राची गोडी । चाखावी अति आवडी । मनाची मोडोनियां उडी । श्रवणीं सादर बसवावें ॥६५॥इति श्रीसद्गुरूलीला । श्रवणीं स्वानंदसोहळा । पुरविती रामदासीयांचा लळा । कृपा कटाक्षें ॥६६॥इति श्रीसद गुरुलीलामृते द्वितियाध्यायांतर्गत । चतुर्थसमास समाप्त: इति अध्याय ओंवीसंख्या २०८॥ श्रीगुरूचरणारविंदार्पणमस्तु ॥॥ श्रीरामसमर्थ ॥॥ इति द्वितीय अध्याय समाप्त ॥ N/A References : N/A Last Updated : October 18, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP