मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|वृत्तदर्पण|
पुष्पिताग्रा

पुष्पिताग्रा

लेखक - परशुराम बल्लाळ गोडबोले


पुष्पिताग्रा.
विषमिंच चरणीं न ना र या हा ॥ न ज ज र गा क्रम हा समांत पाहा ॥
व्दिदश विषमिं अक्षरें समग्रा ॥ त्रिदश समीं पदिं तीच पुष्पिताग्रा ॥१॥
चरण १ ला, ३ रा - अ० १२. गण - न, न, र, य.
चरण २ रा, ४ था - अ० १३. गण - न, ज, ज, र, ग.
उदाहरण * रामचंद्र जोशी.
नृपजननगरींत सोय पाहा ॥ नृपभजना त्यजुनी घरीं न राहा ॥
नगरिहि भरली दिसे समग्रा ॥ ध्वजशिखरीं लतिकाच पुष्पिताग्रा ॥१॥

जाति
ज्या पद्यांची रचना मात्रागणांनीं समजते त्यांस जाति म्हणतात. या जातींत प्रकार आहेत ते: - ५४ मात्रांमिळून होणार्‍या पद्यास गाहू; ५७ मात्रांच्या पद्यास गाथा; ६० मात्रांच्या पद्यास गाथिनी व ६४ मात्रांच्या पद्यास स्कंधक म्हणतात.

गाहू. मात्रा ५४.

N/A

References : N/A
Last Updated : June 11, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP