श्रीदत्त म्हणाले, श्रुती अनेक प्रकारांनी, आम्ही स्वत: आकाशादिक हे सर्व जगत हे मृगजलाप्रमाणे आहे असे सांगत आहेत आणि जर ते तत्व एक निरंतर सर्वत्र शिवव्यापक असे आहे तर ते कोणत्या उपमेचे उपमेय होणार ? ॥१॥
भेद व अभेद यांनी रहित असून श्रेष्ठ, तसेच कार्य व अकार्य यांनी असून जर ते श्रेष्ठ आहे; आणि जर ते एक निरंतर व सर्व व्यापी असे आहे, तर यजन किंवा तपन कसे होणार ? ॥२॥
मन हेच निरंतर व सर्वगत आहे. तसेच ते विस्ताररहित (विस्तृतता यांनी रहित) असून श्रेष्ठ आहे. मन हेच निरंतर व सर्वदा कल्याणकारक आहे, तर मनाने किंवा वाचेने तरी ज्ञान कसे होणार ? ॥३॥
दिवस आणि रात्र हे भेद ज्याठिकाणी नाहीत, उदय आणि अस्त यांचाही जेथे संस्पर्श नाही, आणि जर निरंतर एक सर्व कल्याणकारक असे ते आहे, तर रवि, चंद्र, अग्नि हे कोठून आले ? ॥४॥
काम आणि अकाम हा भेद ज्याठिकाणी नाही, चेष्टा आणि निश्चेष्टा हा प्रकारही जेथे नाही असे ते तत्व आहे. जरी एक निरंतर व कल्याणकार्क असे ते तत्व आहे, तरी बाह्य आणि आंतर ही भेद बुद्धि कोठून आली ? ॥५॥
जरी सार आणि असार यांनी ते रहित आहे; जरी शून्य आणि अशून्य यांनी ते रहित आहे; आणि जर ते एक निरंतर व सर्वत्र शिव आहे, तर प्रथम कसे व शेवटचे कसे ? ॥६॥
जर् भेद आण अभेद यांचा तेथे संबंध नाही; जर ज्ञान आणि ज्ञेय यांचा तेथे स्पर्श नाही; आणि जर एक निरंतर व कल्याणकारक आहे तर सुषुप्ति व तुरिय कोठून आली ? ॥७॥
बोललेले आणि न बोललेले ही दोन्हीही सत्य नव्हेत व जाणलेले आणि न जाणलेले ही दोन्ही सत्य नव्हेत आणि जर एक निरंतर सर्व कल्याणकारक असे ते तत्व आहे तर विषय, इंद्रिये व मनही कोठून आली ? ॥८॥
आकाश व वायु ही सत्य नव्हेत, पृथ्वी व अग्नि ही सत्य नाहीत, आणि जर ते तत्व एक निरंतर व सर्व कल्याणकारक आहे, तर मेघ व उद्क ही कोठून आली ? ॥९॥
जर भूरादि ह्या कल्पित, लोकांचा त्या तत्वाशी काही संबंध नाही; इंद्रादि देवांचाहीए त्याच्याशी काही संबंध नाही आणि जर ते एक निरंतर व कल्याणकारक तत्व आहे, तर गुणदोषविचाराची बुद्धि कोठून आली ?॥१०॥
त्याचा मरणामरणांशी काही संबंध नाही, त्याचा साधन व असाधन याच्याशी संबंध नाही. जर ते एक निरंतर व कल्याणकारक आहे, तर गमनागमन होते असे (येणे जाणे) हे वेद कसे सांगतो ? ॥११॥
प्रकृति व पुरुष असा भेद नाही. कारण व कार्य असाही भेद नाही. आणि जर ते एक निरंतर सर्व कल्याणकारक आहे, तर पुरुष व अपुरुष कसे मानणार ?
॥१२॥
जेथे तिसरी वृद्धावस्थारुप दु:ख प्राप्ति नाही व गुणत: प्राप्त होणार्‍या द्वितीय तारुण्यावस्थेचीही प्राप्ती नाही आणि जर एक निरंतर व सर्वदा कल्याणकारक असे ते तत्व आहे तर वृद्ध, तरूण आणि शिशु ही नावे येणार कोठून ? ॥१३॥
काय हो ? आश्रम व ब्राम्हणादि धर्म याना रहित असून श्रेष्ठ, आणि जर एक, निरंतर व कल्याणकारक असे ते तत्व आहे, तर नष्ट झालेले व न झालेले (जनन व मरण) हे शब्द कोठून आले ? ॥१४॥
व्याप्त व अव्याप्त ही दोन्ही मिथ्या, उत्पन्न व अनुत्पन्न ही दोन्ही मिथ्या; असे असून जर एक निरंतर व सर्व शिव असे ते तत्व आहे, तर विनाशी व अविनाशी हे शब्द कोठून येणार ? ॥१५॥
पुरुष व अपुरुष हा भेद जेथे नाहीं, वनिता व अवनिता हाही विशेष जेथे नाहे, आणि जर एक, निरंतर कल्याणकारक असे ते तत्व आहे तर विनोद व अविनोद हे शब्द कोठून आले ? ॥१६॥
जर मोह आणि विषाद,संशय आणि शोक यांनी रह्ति असून श्रेष्ठ आणि जर एक, निरंतर सर्वत्र कल्याणकारक असे ते तत्व आहे तर मी किंव माझे असे कोठून येणार. ॥१७॥
अहो, जर धर्माधर्म शून्य, बंधमोक्षशून्य असे तर ते तत्व आहे आणि जर एक, निरंतर सर्वत्र कल्याणकारक असे ते तत्व आहे तर दु:ख व सुख ही कोठून आली ? ॥१८॥
याज्ञिक ब्राम्हण व यज्ञ हा विभाग त्याचप्रमाणे अग्नि, इंधन इत्यादि वस्तु विभाग जेथे नाही. आणि जर ते एक निरंतर कल्याणकारक असे तत्व आहे, तर कर्म कोठून मिळणार ? ॥१९॥
अहो, सुखदु:खरहित गर्व व निगर्व यानी रहित असे ते आहे आणि जर एक निरंतर सर्वदा कल्याणकारक, तर मग प्रीति व विरक्ति ही बुद्धि कोठून येणार ? ? ॥२०॥
जेथे मोह विमोह यांचा विचार नाही, लोभ आणि अलोभ यांचा विचार नाही, आणि जर ते एक निरंतर सर्वदा कल्याणकारक आहे तर अविवेक व विवेक ही बुद्धि कोठून येणार ? ॥२१॥
खरोखर तू आणि मी हा भेद कधीहि नाही, त्याचप्रमाणे कुलजाती हे विचार हे असत्य आहेत. त्याचप्रमाणे परम पुरुषार्थ जो शिव तो मीच आहे अशा स्थितीत मी नमस्कार तरी कसा कोणाला करावा ? ॥२२॥
गुरुशिष्य हा विचार, उपदेश  हा विचार जेथे नष्ट झाला आहे, मीच परम पुरुषार्थ शिव झालो आही तर नमस्कार  कोणाला आनि कसा करु ?  ॥२३॥
कल्पित देहविभाग, किंवा कल्पिलेल्या लोकांचा विभागही तेथी नाही, मीच प्रमपुरुषार्थ शिव आहे तर नमस्कार कोणाला करू ? ॥२४॥
रजोयुक्त किंवा रजोगुण विरहित असा मी कधीही नाही, कारण निर्मल निश्चल व शुद्ध असा आहे. शिवाय परमपुरुषार्थ शिव तो मीच. त्याअर्थी मी नमस्कार कोणाला करावा. ॥२५॥
देह विदेह ही कल्पना जेथे नाही, सर्वच सत्य असल्यामुळे अतृप्त शब्दच जेथे नाही. शिव मीच आहे तर नमस्कार कोणाला ? ॥२६॥
ज्ञान अज्ञान शब्द नाही, छंदोलक्षणही नाही. समरसामध्ये मग्न झाल्यामुळे अंत:करण अत्यंत पवित्र झालेला अवधूत श्रेष्ठ तत्वाविषयी बोलतो. ॥२७॥
मोक्ष निर्णय सहावा अध्याय समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : March 12, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP