मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|छंदोमंजरी|अर्धसमवृत्तें| १६६ ते १७५ अर्धसमवृत्तें १५४ ते १६० १६१ ते १६५ १६६ ते १७५ अर्धसमवृत्तें - १६६ ते १७५ कांही नियमित अक्षरांत लघु-गुरूंच्या विशिष्ट क्रमाने रचना करून दाखविणे हेंच तें होय. Tags : grammermarathiमराठीवृत्तव्याकरण १६६ ते १७५ Translation - भाषांतर विबुधप्रिया : - ( रसौ जजौ भरसंयुता करिवाणरवैर्हरनर्तनम् ) : -रासजासभरागणीं घडते पहा विबुधप्रिया ।राधिका सखि आज ती मज आणि भेटिस राजसे ।देतसें धन फारसें तव मानसा अवडे तसें ॥चित्त हें तिज पाहुनी भ्रमलें दुजी न सुचे क्रिया ।प्राण जाइल वाटतो जरि येइना विबुधप्रिया ॥१६६॥==कनकप्रभा: - सजसा जगौ च यदि मंजुभाषिणी ॥सजसाजगीं घडल मंजुभाषिणी ॥मुखपद्म ज्यावरि कचाग्र शोभलें ।धन पीन तुंग कुच देखणे भले ।बहु पुण्य जो करिल त्यास ती वरी ॥कनकप्रभा न इतरास नोवरी ॥१६७॥==वरतनु : - (भवति नजावथ मालिनी जरौ ) : - वरतनु हें घडतें नजाजरीं नमिशि जरी भजशील राघवा ।हरिल तरी भवरोग आघवा ॥सकल वडील तरावयास रे ।वरतनु लाभलि यास हें बरें ॥१६८॥==कुड्मलदन्ती : - ( बाणरसै: स्यात्ड भतनगगै: श्री: ) : -कुड्मलदंती भतगगांनीं ।भास्कर तूतें धनसुत देतो ।रोगहि सारे सहज हरीतो ॥नित्य तयातें नम नियमानें ।कुड्मलदन्ती तुज वरि मानें ॥१६९॥==प्रसंग: - ( ननरलगुरुभिश्च भद्रिका ) ननरलगुरु यांहि भद्रिका ।रजनिपतिमुखी पहावया ।हरि बहु दिससां अला तया ॥रमवि तयिं पती उभा पहा ।युवतिस घडला प्रसंग हा ॥१७०॥==चामर - ( तूणकं समानिका पदव्दयं विनान्तिमम् ) : -राजराजरागणीं घडेल वृत्त चामर ।राधिका पहावयास जातसे रमापती ।प्राकृतासमान त्यांस वृध्दगोप कोपती ॥तो कळे न हा हरीच गोकुळांत पामरां ।नीच मार्जनीसमान मानितात चामरां ॥१७१॥==मदिरा : - ( सप्तभकारयुतैकगुरुर्यदि सेयमुदारतरा मदिरा ) : -सात भकार गुरु तदनंतर एकचि त्या मदिरा म्हणती ।भिक्षुक भाविक भास्करभक्तहि भामिनिभूत उभें न पुढें ।सज्जन मानिति पंडीत वानिति वाटतसे मनिं नाक चढे ॥ज्यांसि निरंतर वंदुनियव वर पावल जनकिनाथपदां ।मोहिल त्यासहि सेविलिया जरि ही मदिरा घडवी अपदा ॥१७२॥==चंपकमाला: - ( रुक्मवती सा यत्र भमसगा: ) - भामसगांनीं चंपकमाला ।ज्या तरुणींसीं संग करितो ।मन्मथवन्ही उष्ण हरितो ॥त्या गुणपात्रा गोकुळपाला ।द्या अतिवेगें चंपकमाला ॥१७३॥==चंद्रवर्त्म : - ( चंद्रवर्त्म. निगदंति रनभसै: ) : - चंद्रवर्त्म घडतेंच रनभसीं ।राधिका पुलिनिं ये रजीमुखीं ।कृष्ण येईल अतां म्हणुनि सुखी ।आस्य पाहुनि तिचें मनिं विरला ।चंद्र वर्त्म अपुलें ( हि) विसरला ॥१७४॥==भद्रिका : - ( ननरलगुरुभिश्च भद्रिका ) : - ननरलगुरु यांहि भद्रिका ।यदुपतिपदिं या मनास रे ।धीर तरि भववासना सरे ।मिळतिल तुज फार मुद्रिका ॥बसल घरिं सदैव भद्रिका ॥१७५॥==पहिलें ८ एव गादित: श्लोकसंख्या १८०रामचंद्र गणकें हरिलीला ।वर्णुनी करि विसत्व कलीला ॥मंद जे तदुपयोगि सुवृत्तें ।पूर्ण मंगल मही मितवृत्तें ॥१॥येथें उणें अधिक जें वदलों असेल ।तें ज्यांचिया मतिस वाइटसें दिसेल ॥त्यांनीं कृपा करुनि शुध्दि घडे तसेंची ।केलें तरी गुरु सुधा वदनांत सेची ॥२॥इति छंदोमंजरी ग्रंथ : समाप्त: N/A References : N/A Last Updated : March 02, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP