मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ७५ वा| आरंभ अध्याय ७५ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० अध्याय ७५ वा - आरंभ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा आरंभ Translation - भाषांतर श्रीगणेशायः नमः । मुनिजनमानसनिवासहंसा । नमो गोविन्दा प्रबोधसुरसा । स्वपदभजनें अनन्यदासां । आत्मसमरसा पावविसी ॥१॥तुझिया चरणप्रसादेंकरून । चतुःसप्ततितमपर्यंत जाण । केलें दशमाचें व्याख्यान । पुढें निजगुण वदवावे ॥२॥पंचसप्ततितमाध्यायीं । कथा वर्तली जे जे कांहीं । ते श्रोत्यांचे श्रवणालयीं । भाषाकथनीं सांठविजे ॥३॥इत्यादि सद्गुरूचिया स्तवनें । प्रज्ञाप्रकाश लाहोनि मनें । भाषाव्याख्यान हरि वरदानें । दयार्णववदनें वाखाणी ॥४॥पंचसप्ततितमीं कथा । सिंहावलोकनें अवभृथा । सांगूनि मयकृत सभा पाहतां । दुर्योधनाचा अपमान ॥५॥पूर्वाध्याय संपते काळीं । एका दुर्योधनाविण सकळी । आनंदली नृपमंडळी । पाण्डवलक्ष्मी विलोकुनी ॥६॥हे ऐकूनि शुकाची बोली । नृपा प्रश्नाची इच्छा झाली । ते ये अध्यायीं शंका पहिली । नृपें पुशिली ते ऐका ॥७॥ N/A References : N/A Last Updated : June 01, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP