मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ३२ वा| आरंभ अध्याय ३२ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २२ अध्याय ३२ वा - आरंभ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा आरंभ Translation - भाषांतर श्रीपरब्रह्मणे नमः । ज्याच्या दर्शनें परमोह्लास । कैवल्यसुखापरिस विशेष । तो गोपीमानसराजहंस । नमूं निगमेश गोविंद ॥१॥जैन मीमांसा पातंजल । सांख्यवैशिषिकादि सकळ । तव दर्शनेंवीण अकुशल । दर्शनें केवळ अदर्शनें ॥२॥पूर्वपक्षेंशीं सिद्धांत । हो कां उत्तमांगही वेदांत । तव दर्शनेंवीण असमर्थ । संसारध्वांत निरसावया ॥३॥कैवल्यसुखा तो सर्वगत । भरलें अनुस्यूत संतत । असतां कल्पनाभ्रमें भ्रांत । दुःखावर्त जग भोगी ॥४॥कोणें कैवल्य हिरोनि नेलें । किंवा कोठें रितें भरलें । न्यून पूर्ण हिरवें पिकलें । नाहीं ऐकिलें कें कोण्हीं ॥५॥संतत सर्वगत असोनि काये । जीव जाचती तापत्रयें । जन्ममरणांचे सोसितां घाये । न फवे मायेमाजिवडें ॥६॥विसरे नृपातें भद्रासनी - । हुनि सुषुप्ति पांगरूनी । व्याघ्रादिभयाची कणकणी । घालोनि गहनीं भोगविजे ॥७॥तैं त्या असोनि भद्रपीठ । निरसूं न शकेचि भय दुर्घट । येथ जागरप्रद जो इष्ट । तो वरिष्ठ सुखदाता ॥८॥यालागीं न होतां सद्गुरुभेटी । वेदांतादिशास्त्रकोटी । जैशा वोसणतयाच्या गोठी । वदतां वोठी अनोळख ॥९॥तस्मात् श्रीसद्गुरूच्या दर्शनें । वेदशास्त्रांचें साचार जिणें । मोक्षलक्ष्मी अहेवपणें । मिरवी भूषणें स्वसुखाचीं ॥१०॥गोशब्दार्थें निगमनिकर । तत्संवितीं जे अविकार । तीचें मानससरोवर । हंस साचार तूं तेथें ॥११॥तस्माद्गोपीहृदयमराळ । तो तूं निगमात्मा निगमपाळ । गोविम्दनिगमेश केवळ । नमन अविकळ सप्रेमें ॥१२॥भेदवर्जित प्रेमोद्रेक । हाचि भजनविशेख । अखंडदर्शनात्मक सुख । प्रकट एक उभयत्र ॥१३॥ऐसें करितां अभेद स्तवन । सद्गुरु सच्चिदानंदघन । स्वसत्ता आकर्षूनियां मन । दिधलें स्मरण ग्रंथाचें ॥१४॥कृष्णवियोगें विरहाभिभूता । गोपी हुडकितां जाल्या श्रांता । तिहीं पुलिनीं गाइलें गीता । ते गतकथा संपली ॥१५॥यावरी तयां रुदितां प्रति । कैसा भेटला श्रीपति । तद्दर्शनें हर्षावाप्ति । कैशा युवति पावल्या ॥१६॥तो वाखाणी बत्तिसावा । गोपी आणि वासुदेवा । जो मिळणीचा स्वानंदठेवा । श्रवणें विसांवा सर्वांसी ॥१७॥ऐसें सद्गुरु संवेदन । प्रेरितां प्रज्ञा लाहोनि मन । निरूपी दयार्णवाचें वदन । भाषाव्याख्यान हरिवरद ॥१८॥गताध्यायीं गायनरूपी । विरहविलाप करिती गोपी । सप्रेम जाणोनि विश्वव्यापी । तत्संकल्पीं कळवळिला ॥१९॥ N/A References : N/A Last Updated : May 04, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP