मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १९ वा| श्लोक १६ अध्याय १९ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ५ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ अध्याय १९ वा - श्लोक १६ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १६ Translation - भाषांतर गोपीनां परमानंद आसीद्गोविंददर्शने । क्षणं युगशतमिव यासां येन विनाऽभवत् ॥१६॥तंव कृत्तिकायुक्तपूर्णिमेसी । गगनीं मोहरतां पूर्णशशी । भरतें भरे क्षीराब्धीसी । गोपीमानसीं त्याहूनी ॥१४०॥गोधनें गोपाळ गोविंद । व्रजासमीप आनंदकंद । आला जाणूनि गोपीवृंद । परमानंद पावती ॥४१॥वियोगरजनीचिये अंतीं । उदया येतां कृष्णगभस्ति । पद्मवदना गोपयुवती । उह्लासती आह्लादें ॥४२॥गोविंददर्शनाचे ठायीं । गोपी निमग्न आनंदडोहीं । होतां गृहमेध्यांची कांहीं । स्मृति देहीं न धरती ॥४३॥अहंतेची अलिका विरे । स्वानंदाचें भरतें भरे । उचंबळोनि कर्णद्वारें । पाहती सादर हरिरूप ॥४४॥सबाह्य कोंदलें कृष्णसुख । नयनां रुचलें श्रीकृष्णमुख । वदनचंद्रींचें पीयूख । चकोर होऊनि सेविती ॥१४५॥ऐसा गोपिकांचा प्रेमा । गवसणी होय कृष्णसोमा । पुढती वियोगाची अमा । युगशतसमसाम्य होय ॥४६॥कृष्णवियोग क्षणार्ध एक । वाटे दिव्ययुगांचें शतक । तेव्हां हरिविरहाचें दुःख । जाळी पावक ज्यापरी ॥४७॥दावानळें ग्रीष्मकाळीं । जळोनि काननें होती होळी । परंतु जीवनें राहती मुळीं । प्रेम न्यहाळीं मेघार्थ ॥४८॥तैशी हरीच्या पुनरागमनीं । जीविताशा गोपीमनीं । पुन्हा प्रत्यक्ष हरिदर्शनीं । उह्लासोनि टवटविती ॥४९॥ऐशी प्रेमळांची जाति । बाने सप्रेमळां चित्तीं । येरांलागीं हे व्युत्पत्ति । चंद्रामृतीं ध्वांक्षत्वें ॥१५०॥म्हणूनि राया कुरुपाळका । जाणसी सप्रेमश्रवणसुखा । गोपीप्रेमाचा आवांका । केला ठाउका यालागीं ॥५१॥प्रथम प्रलंबाचें हनन । आणि दावाग्निप्राशन । करूनि व्रजपुरीं भगवान् । निववी मन गोपींचें ॥५२॥इतुकी कथा ये अध्यायीं । राया तुझिये श्रवणालयीं । वसविली ते तुझ्या हृदयीं । तोषदायी वसों दे ॥५३॥यावरी अध्याय विसावा । श्रवणमात्रें दे विसांवा । तेरांसहित चोविसावा । नलगे पुसावा ये स्थळीं ॥५४॥वर्षाशरत्काल दोन्ही । राया येथींच्या निरोपणीं । रामगोपालचक्रपाणि । क्रीडती वनीं स्वानंदें ॥१५५॥इतुकी कथा भागवतीं । दशमस्कंधीं रायाप्रति । शुक निवेदी महामति । जो संतति व्यासाची ॥५६॥आदिगुरु दत्तात्रेय । जनार्दनासि दाविजो सोय । एकनाथें तदन्वयें । चिदानंदीं प्रकटिली ॥५७॥तेचि स्वानंदाचिये मुखें । वरदकृपा गोविंदरसें । वर्षली तद्रसपाउसें भरला तोषें दयार्णव ॥५८॥नोहे थिल्लरसांचवणी । ब्रह्माद्रिशिखरींचे जीवनीं । प्रेमें प्राशन करितां श्रवणीं । होय हानि तृष्णेची ॥५९॥यालागीं साधकीं संतप्तीं । सार होऊनि श्रवणांप्रति । दयार्णवामृतभरती । सप्रेमभक्ति सेविजे ॥१६०॥इति श्रीमद्भागवते महापुराणे अष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां दावानलप्राशनं नामैकोनविंशोऽध्यायः ॥१९॥श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥१६॥ टीकाओव्या ॥१६०॥ एवंसंख्या ॥१७६॥ श्रीगुरुशिवाय नमः ॥ ( एकोणिसावा अध्याय मिळून ओवीसंख्या १०५५८ ) एकोणिसावा अध्याय समाप्त. N/A References : N/A Last Updated : May 01, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP