तत्रैकदा जलचरं गरुडो भक्ष्यमीप्सितम् । निवारितः सौभरिणा प्रसह्य क्षुधितोऽहरत् ॥९॥

तया यमुनाह्रदापासीं । सौभरिमुनि तपोराशि । होता म्हणोनि जलचरांसी । जलनिवासीं निर्भयता ॥१७॥
कोणे एके कालीं तेथ । गरुड पातला क्षुधाक्रांत । ह्रदांतील मत्स्यनाथ । निजाहारार्थ कल्पिला ॥१८॥
प्रियतम भक्ष्यस्थानीं । गरुडें मत्स्यपति कल्पूनी । धरूं जातां सौभुरिमुनि । निवारणीं प्रवर्तला ॥१९॥
त्यातें नगणूनि क्षुधाभिभूत । बळेंचि हरिला मत्स्यनाथ । दुःखें जळचर आक्रांत । कृपेनें द्रवत सौभरि ॥१२०॥

मीनान् सुदुःखितान् दृष्ट्वा दीनान् मीनपतौ हते । कृपया सौभरिः प्राह तत्रत्यक्षेममाचरन् ॥१०॥

मीनपतीचें पाहोनि मरण । दुःखें आक्रंदती मीन । सौभरि कृपेनें कळवळून । त्यांचें कल्याण चिंतिलें ॥२१॥

अत्र प्रविश्य गरुडो यदि मत्स्यान् स खादति । सद्यः प्राणैर्वियुज्येत सत्यमेतद्ब्रवीम्यहम् ॥११॥

गरुडाप्रति शापवचन । आज्ञाभंगें प्रक्षोभोन । बोलता झाला तपोधन । मत्स्यां कल्याण ज्या योगें ॥२२॥
आजिपासूनि ये डोहीं । मत्स्य भक्षील गरुड जयीं । मृत्यु पावेल तेचि समयीं देवत्रयीं रक्षितां ॥२३॥
आजिपर्यंत तपार्जित । जें म्यां जोडिलें सुकृत । त्याचेनि बळें हें त्रिसत्य । वाक्य माझें ब्रह्मांडीं ॥२४॥
ईश्वर हो कां हरिहर ब्रह्मा । मद्वाक्याचा असत्य महिमा । करूं न शके ऐशिया नेमा । कथिलें तुम्हां जलचर हो ॥१२५॥
तैंहूनि गरुड न वचे तेथें । हें कालियासी विदित होतें । गरुडभयाच्या आकांतें । या ह्रदातें प्रवेशला ॥२६॥

तं कालियः परं वेद नान्यः कश्चन लेलिहः । अवात्सीद्गरुडाद्भीतः कृष्णेन च विवासितः ॥१२॥

हें वर्म जाणे कालियफणी । यावीण सर्प नेणती कोणी । म्हणोनि गरुडासि बळिदानीं । मित्र जोडूनि वर्तती ॥२७॥
गरुड कालियें अवमानिला । म्हणोनि एकला वैरि झाला । गरुडें समरीं पराभविला । मग पळाला तेथूनी ॥२८॥
यमुनाह्रदीं निर्भयपणें । यावत्काळ गरुडाभेणें । त्यासी अभय वोपिलें कृष्णें । रमणकद्वीपा धाडिलें ॥२९॥
राजमुद्रेचें देखोनि चिह्न । सेवक सन्मानिती पूर्ण । कालियमाथां श्रीकृष्णचरण । तेणें सुपर्ण निर्वैर ॥१३०॥
दारा पुत्र सुहृद्जन । अवघा परिवार घेऊन । कालिय पावला स्वसदन । रमणकभुवन ज्या नांव ॥३१॥
डोहींहूनि दवडिला सर्प । यमुना केली अमृतरूप । कृष्ण कंदर्पाचा बाप । सर्वां सकृप सर्वस्वें ॥३२॥

कृष्णं ह्रदाद्विनिष्क्रान्तं दिव्यस्रग्गंधवाससम् । महामणिगणाकीर्णं जांबूनदपरिष्कृतम् ॥१३॥

ह्रदापासूनि जनार्दन । बाहिर निघाला देदीप्यमान । यामिनी सांडूनि चंडकिरण । प्रकाशमान ज्यापरी ॥३३॥
जैसा पूजिला होता नागीं । तैसा सालंकृत सर्वांगीं । अवघे अनिमेष देखती दृगीं । स्वजनसंगीं गोगोप ॥३॥
दिव्यांबरें परिधान केलीं । दिव्यगंधें अनुलेपिलीं । दिव्यसुमनें तुरंबिलीं । भावें अर्पिलीं मघमघित ॥१३५॥
आपाद दिव्य माळा कंठीं । दिव्य रत्नें जडलीं मुकुटीं । दिव्यांगदें बाहुवटीं । दिव्य मनगटीं कंकणें ॥३६॥
दिव्यजांबूनदसुवर्णें । त्वष्टृनिर्मित सर्वाभरण । अनर्घ्य खेवणा दिव्य रत्न । सर्पीं प्रयत्नें लेवविलीं ॥३७॥
पाच पेरोज मुक्ताफळें । वज्र गोमेद इंद्रनीळें । जडित केले कटिमेखळे । श्रवणीं सुढाळें कुंडलें ॥३८॥
चिंतामनि स्यमंतकमणि । कौस्तुभमणि पुष्करमनि। ऐशा महामणींच्या श्रेणी । जेथ दिनमनि ठेंगणा ॥३९॥
जांबूनदसुवर्णघटित । अनर्घ्य महामणिमंडित । दिव्याभरणीं सालंकृत । कमलाकांत प्रकटला ॥१४०॥
दिव्य कटकें वांक्या वाळे । क्षुद्रघंटिका कटिमेखळे । मुद्रिकामंडित दशांगुळें । करपदकमळें चिह्नित ॥४१॥
यामिनी सांडूनि यमुनाजनकें । निघतां उदयपर्वतीं प्रभा झळके । तेंवि यमुनेंतूनि यदुनायकें । प्रकट केलें निजरूपा ॥४२॥
त्या कृष्णातेण देखोनि सारे । जेंवि कां निद्रिस्त चेहरे । होती तैसे एकसरें । उठोनि सामोरे धांविले ॥४३॥

उपलभ्योत्थिताः सर्वे लब्धप्राणा इवासवः । प्रमोदनिभृतात्मानो गोपाः प्रीत्याऽभिरेमिरे ॥१४॥

देखोनि कृष्णातें अवघे । जैसे निद्रिस्त होती जागे । तैओसे उठिले सवेगें । चेतना वेगें आथिलें ॥४४॥
अंतःकरणीं प्रकटे स्फुरण । कां संकल्पें आलिंगिलें मन । प्रज्ञा निश्चयाचें भाजन । झाले संपूर्ण पूर्ववत् ॥१४५॥
अनुसंधान प्रकटे चित्तीं । अभिमान कवळी अहंकृति । पंचप्राणांची प्रवृत्ति । करणप्रांतीं प्रवर्तली ॥४६॥
व्यान धांविला शब्दवरी । समान स्पर्शज्ञान विवरी । उदान रूपाची विचारी । प्राण करी रसशोध ॥४७॥
अपान गंधाचें विवरण । करावया झाला प्रवीण । श्रोत्रत्वगाक्षिजिह्वाघ्राण । हा ज्ञानकरणसमुच्चय ॥४८॥
वाक्पाणिपादपायूपस्था । क्रियाचरणीं पांचही प्रशस्ता । कृष्णागमनें अवघा स्वस्था । झाला यथोक्त गोग्राम ॥४९॥
मनीं दाटले पूर्णानंद । गो गोपाळांचे वृंद । जैसे चकोर देखोनि चंद्र । परमानंद पावती ॥१५०॥

N/A

References : N/A
Last Updated : May 01, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP