मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ९ वा| श्लोक ६ ते १० अध्याय ९ वा आरंभ श्लोक १ ते २ श्लोक ३ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २३ अध्याय ९ वा - श्लोक ६ ते १० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ६ ते १० Translation - भाषांतर संजाजकोपः स्फुरितारुणाधरं संदश्य दद्भिर्दधिमंथभाजनम् ।भित्त्वा मृषाऽश्रुर्दृषदश्मना रहो जघास हैयंगवमंतरं गतः ॥६॥मृशा सकोप झाला हरि । माणिक्यप्रभा फांके अधरीं । दशन रोधिले ते अधरोष्ठीं । स्फुरिताधरीं सरोष ॥९६॥दशनीं चावूनियां अधरोष्ठ । पाषाणघातें मंथनघट । भग्न करितां गोरसपाट । लोटला यथेष्ट गृहगर्भीं ॥९७॥लटिके अश्रु नेत्रीं पुशी । रडे स्फुंदे उकसाबुकसीं । अंतर्गृहीं रिघोनि भक्षी । संग्रहासी गव्याच्या ॥९८॥नवनीत जें पूर्वदिनीं । उत्पन्न झालें गोरसमंथनीं । हैयंगव या अभिधानीं । त्यालागूनि बोलिजे ॥९९॥तया नवनीताचे ग्रास । मुखीं घाली सावकाश । यज्ञभोक्ता हृषीकेश । बालवेश अवगला ॥२००॥उत्तार्य गोपी सुशृतं पयः पुनः प्रविश्य संदृश्य च दध्यमत्रकम् ।भग्नं विलोक्य स्वसुतस्य कर्म तज्जहास तं चापि न तत्र पश्यती ॥७॥तंव ते गोपी यशोदा सती । सुतप्त दुग्ध उतरूनि हस्तीं । प्रवेशे मंथनसदनाप्रति । तेथ श्रीपति न देखे ॥१॥दधिघटांचीं भग्न शकलें । आणि दधि गृहांत विखरलें । हें निज सुताचें कर्म देखिलें । हास्य आलें अद्भुत ॥२॥मग कृष्णाची गवेषणा । करिती झाली नंदांगना । म्हणे बाहेर नाहीं आला कान्हा । पाहे सदना आतौती ॥३॥उलूखलांघ्रेरुपरि व्यवस्थितं मर्काय कामं ददतं शिचि स्थितम् ।हैयंगवं चौर्यविशंकितेक्षणं निरीक्ष्य पश्चात्सुतमागमच्छनैः ॥८॥तंव गृहामाजी कैटभारि । जेथें शिंकियांच्या लांब हारी । वेधोनियां लोणी चोरी । उखळावरी पालथिया ॥४॥उखळ घालूनि पालथें । वरी वेंघोनि कृष्णनाथें । पूर्वसंचित नवनीत होतें । तें स्वहस्तें उतरोनि ॥२०५॥पश्चिम द्वारींची उघडूनि वाट । मिळवूनियां मर्कटथाट । नवनीत वांटी त्यां यथेष्ट । धीट दहाट दुर्धर्ष ॥६॥चौर्य कर्माची शंका मनीं । म्हणोनि पाहे चंचल नयनीं । हें देखोनि यशोदा जननी । विस्मित होऊनि राहिली ॥७॥गोपी सांगती गार्हाणीं । तें मज प्रत्यक्ष दाविलें नयनीं । मोठा खोडकर चक्रपाणि । किती गौळणी सोशिती ॥८॥काढूनि शिंकींचें नवनीत । मर्कटा वदनीं कवळ देत । चौर्यकर्में साशंकित । चंचल पाहत लोचनीं ॥९॥ऐसें देखोनि आपुल्या डोळां । यष्टि घेऊनि यशोदा बाळा । मंदगामिनी वेल्हाळा । धरूं गोपाळा प्रवर्ते ॥२१०॥तामात्तयष्टिं प्रसमीक्ष्य सत्वरस्ततोऽवरुह्यापससार भीतवत् ।गोप्यन्वधावन्न यमाप योगिनां क्षमं प्रवेष्टुं तपसेरितं मनः ॥९॥माता घेऊनि शिंपुटी करीं । धरूं आली हें देखोनि हरि । तळीं उतरोनि झडकरी । पळे बाहेरी भीतवत् ॥११॥सांचल होतां पळे चोर । तैसाचि नंदाचा किशोर । पश्चिममार्गें अतिसत्वर । गोरसतस्कर पळाला ॥१२॥तयाचिये पाठोपाठीं । धांवे यशोदा गोरटी । हाता विती समीप दृष्टीं । धरितां मुष्टीं नातुडे ॥१३॥शमदमादि साधनभार । अभ्यासितां निरंतर । चित्त शोधूनि योगीश्वर । तदाकार करिताती ॥१४॥तया योगियांचें विशुद्ध चित्त । सहसा पावों न शके जेथ । इतर प्राकृतें कैंचीं तेथ । होती समर्थ धरावया ॥२१५॥तीव्र तपें शोधूनि चित्ता । जिहीं साधिली एकाग्रता । तया मानसें आकळितां । जो सर्वथा दुराप ॥१६॥मनोबुद्धीसीं अगोचर । कैंचा इंद्रियां तेथ संचार । त्यासि आकळावया सत्वर । धांवे सादर यशोदा ॥१७॥भक्तिभाग्यें सुलभ झाला । न धरत सबाह्य आकळला । तयामागें यशोदाबाळा । धांवे केवळा धरावया ॥१८॥तो सुष्प्राप हें तों खरें । अनुगतीच्या श्रमें भरे । भाव जाणोनि जगदीश्वर । अभ्यंतरें कळवळिला ॥१९॥अन्वंचमाना जननी बृहच्चलच्छ्रोणीभराक्रांतगतिः सुमध्यमा ।जवेन विस्रंसितकेशबंधनच्युतप्रसूनाऽनुगतिः परामृशत् ॥१०॥समीप जाणोनि वेग करी । परंतु नाटोपे श्रीहरि । ऐशी धांवतां सुंदरी । श्रांत शरीरीं जाहली ॥२२०॥सूक्ष्म सुंदर मध्यभागीं । स्थूळ नितंब सुकुमारांगी । धरूं धांवतां लागवेगीं । धर्म सर्वांगीं उदेला ॥२१॥धांवतां चंचल पृथुल श्रोणी । मुक्त कंचुकी पान्हा स्तनीं । तेणें भारें मंदगामिनी । चक्रपाणि नाटोपे ॥२२॥धांवतां सुटोनि गेली वेणी । मार्गीं विखुरती पुष्पश्रेणी । कृष्णपदवी अनुलक्षूनि । धांवे कामिनी नंदाची ॥२३॥श्रांत देखोनि माउली । कृष्णा पोटीं करुणा आली । मग चालतां मंदचाली । मिठी घाली यशोदा ॥२४॥स्तनींचा काढूनि दुग्धाकडे । धांवली इतुकेंचि वांकुडें । कीं जे भजनीं विक्षेप घडे । मग नातुडे बहुयत्नीं ॥२२५॥गवेषणामिषें केलें भ्रमण । तेणें दोषांचें क्षालन । तेव्हां सुलभ श्रीभगवान । हेंही कारण सूचिलें ॥२६॥बाळ धरावया धांविली । दोषनिवृत्ती कैशी झाली । ऐसी आशंका उदेली । ते परिसिली पाहिजे ॥२७॥पाय ठेवितां कृष्णनाथा । सकळतीर्थें वोडविती माथा । तें पद विलक्षूनि यशोदा जातां । झाली तत्त्वता निर्दोष ॥२८॥भूमंडळींचीं तीर्थें क्षेत्रें । विष्णुप्रतिमासन्निधिमात्रें । तीं प्रत्यक्ष विष्णुपदें पाहतां नेत्रें । भ्रमणमात्रें निर्दोष ॥२९॥आणि काल्पनिक करिती ध्यान । तेणें पावन योगिजन । येथ प्रत्यक्ष चैतन्यघन । देखे कृष्ण पळताहे ॥२३०॥त्रिविक्रम जो ब्रह्मांड मोजी । त्याजे अनंत विक्रम आजी । पाहतां ब्रह्मांडयात्रा घडली सहजीं । गोष्टी दुजी न वदावी ॥३१॥कष्टावांचूनि कैंचें फळ । यशोदेचे कष्ट सफळ । कष्टीं सांपडला गोपाळ । भक्तवत्सल सर्वज्ञ ॥३२॥ N/A References : N/A Last Updated : April 28, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP