मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत तुकाराम अप्रसिद्ध अभंग|सुदामचरित्र| सुदामचरित्र सुदामचरित्र सुदामचरित्र संत तुकाराम अभंग - सुदामचरित्र संत तुकाराम गाथेत समाविष्ट नसलेले अप्रसिद्ध अभंग. Tags : abhangsanttukaramअभंगतुकारामसंत सुदामचरित्र Translation - भाषांतर १ऐका हो तुम्ही भाविक जन । भक्तां नारायण सांभाळीत ॥सुदामा ब्राह्मण संसारीं कष्टला । स्मरूं तो लागला कृष्णजीसी ॥तये वेळीं कांता पुसे मुदामासी । स्मरता कोणासी वेळोवेळां ॥तयाचा वृत्तांत ऐका सविस्तर । जोडितसे कर तुका म्हणे ॥ २ स्त्रियेलागीं म्हणे मित्र माझा हरी । ध्यातों मी अंतरीं अखंडित ॥येरी म्हणे जावें तयाचिये भेटी । बहुत हिंपुटीं जालों आम्ही ॥तीन मुष्टी पोहे आणिले ऊसणे । पतिकरीं तिनें शीघ्र दिल्हे ॥तुका म्हणे ऐसा ब्राह्मण निघाला । आनंद जाहला सम्स्तांसी ॥३मार्गासी चालतां प्रश्न जाले चांग । म्हणे पांडुरंग तुष्टला हो ॥ऐसा तो चालतां द्वारका पावला । आल्हाद जाला ब्राह्मणासी ॥तये वेळीं द्वारपाळें हो पूसिलें । “ नाम काय ” बोले “ तुज ” ऐसें ॥येरू म्हणे ‘ कृष्णजीचे बंधु आम्ही ’ । ‘ सांगा जा रे तुम्ही ’ तयापाशीं ॥ तुका म्हणे ऐसा गेला द्वारपाळ । सांगे सकळ वृत्तांत....... ॥४कृष्णनाथापाशीं सांगितली मात । आला हो अतीत द्विज एक ॥सांगतो आपुलें नाम हें सुदामा । आज्ञा काय आम्हां सांगों त्यासी ॥श्रवणीं पडतां तयाचें वचन । गेला नारायण धांवोनियां ॥तुका म्हणे हरि प्रीतीनें भेटला । घेऊनियां आला राउळासी ॥५सुदामासी देव प्रीतीनें पूसती । तुझी गृहस्थिती कैसी आहे ? ॥येरू म्हणे लज्जा वाटते मनाला । गृहीं बाळकांला अन्न नाहीं. ॥वहिनीनें आम्हा काय पाठवीलें । द्यावें तेव्हढें कृष्ण म्हणे ॥तीन मुष्टी पोहे द्विजें हो दीधले । आनंदें भक्षिले देवरायें. ॥तुका म्हणे देव भक्तीचा बांधला । आवडी विठ्ठला भाविकांची. ॥६आनंदें करोनी सुदाम पूजीला । दिल्हीं वस्त्रें त्याला आदरेसी ॥अलंकार केले तयासी परिपूर्ण । मना समाधान ब्राह्मणाचे ॥विश्वकर्मियासी त्वरें पाचारिलं । पुरी सुदामाला सिद्ध करा ॥दूसरी द्वारका देवें रचियेली । तुका म्हणे केली ख्याती त्यानें ॥७ .........ल आठव जाला सुदामासी । आज्ञा हृषीकेशी द्यावी मज ॥तये वेळीं माव केली नारायणें । सुदामासी म्हणे ऐक ऐक ॥वाटेंत तस्कराचा उपद्रव फार । वस्त्रें अलंकार ठेव येथ ॥तुका म्हणे द्विजें ठेवीलीं वस्त्रें । बहु गहिवरें चालिला तो ॥८सुदामा ब्राह्मण वाटेसी चालतां । करीतसे चिंता वेळोवेळा ॥ जाऊनिया काय सांगूं स्त्रियेपाशीं । आतां असो जैसी भरोवरी ॥कृष्ण हा चोरटा शिंदळ ठायींचा । ठाऊक पूर्वींचा आहे मज ॥तुका म्हणे कष्टें द्विज तो चालला । पुढें देखियेला ग्राम थोर ॥९वाटसरां पुसे पुढें कोण ग्राम । काय त्याचें नाम सांगा मज ॥येरू म्हणे तुझें काय नाम असे । लोक पूसताती सुदामासी ॥मार्ग मी चुकओं न कळे वाट । द्वारकेची पेठ दिसताहे ॥ओळखोनी त्यांनीं अपूला स्वामी । नेला निज धामी धरूनियां ॥तुका म्हणे स्वामी कृपेचा सागर । न कळे पार ब्रह्मादिकां ॥१०सकळही जन करिती आरती । भावें वोवाळिती सुदामातें ॥तये वेळीं सुदामा जाहला विस्मित । व्यर्थ कृष्णनाथ निंदिला कीं ॥कृपावंता तुझी न कळेचि माव । अल्प माझा भाव तुझे पायीं ॥कृपेचा सागर माझा नारायण । तुका म्हणे जाणा भाविकाचा ॥११न कळेचि वर जाहलासे भ्रांत । वैभव अद्भुत देखोनियां ॥कांता आली भेटों शृंगार करूनी । मानोनी भवानी पायां लागे ॥झांकियेले नेत्र न बोले कांहीं । हालवोनी बाही जागा करी ॥गेलां जया भेटी तो हा जगजेठी । तेणें कृपादृष्टीं पाहियेलें ॥तुका म्हणे दिधला सुवर्णाचा गांव । उच्चारितां नांव नित्य त्याचें ॥१२आठवितां नांव जाहला सावध । नाटकी गोविंद बहू असे ॥न कळत तुज निंदिलें म्यां देवा । अन्याय करावा क्षम माझा ॥अपारा अनंता किती वर्णूं तूज । वाटतसे लाज निंदियेला ॥तुका म्हणे कृष्ण कृपेचा सागर । रुक्मादेवीवर पांडुरंग ॥ N/A References : N/A Last Updated : March 26, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP