राग - शंकरा

मानु किती या संतांचे उपकार ॥
कळवळुनी सांगती, आम्हां वारंवार ॥धृ॥
एकेक शब्द बहु अमोलिक बोध ॥
साठवण करावी त्याची हृदयांत ॥१॥
करावे त्याचे निरंतर मनन ॥
हृदयी आठवूनी हरीरूप ध्यान ॥२॥
धन्य आपुले भाग्य, लाभ हा संतसंग ॥
दासी म्हणे हरीनाम गाऊ नित्य अभंग ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP