मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|दत्तमालावर्णांकितमाघमाहात्म्य| माला १०१ ते १५० दत्तमालावर्णांकितमाघमाहात्म्य माला १ ते ५० माला ५१ ते १०० माला १०१ ते १५० माला १५१ ते २०० माला २०१ ते २५० माला २५१ ते ३०० माला ३०१ ते ३४३ माला १०१ ते १५० श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत दत्तमालावर्णांकितमाघमाहात्म्य Tags : dattagurudattavasudevanand saraswatiगुरूदत्तदत्तवासुदेवानंदसरस्वती माला १०१ ते १५० Translation - भाषांतर दा नें देती यथाशक्ती । ग्रीष्मी प्रपा स्थापिती ।हेमंती काष्ठ कंबळें देती । विश्रांति करविती वर्षाकाळीं ॥१॥य ज्ञदानादिक धर्म । किंवा करणें सत्कर्म ।याच द्विपीं घडे उत्तम । अन्यत्र शर्म भोगणें ॥२॥क्रों चादि द्वीपें असती । तेथें कर्मे न घडती ।जंबुद्बिपीं पुण्यें होती । आर्यावर्ती विशेष ॥३॥अ सें जाणुनी सादर । नित्यकर्म करी नर ।पापें वारूनी सत्वर । जायी पार भवाब्धीच्या ॥४॥सा दरें करी प्रात:स्नान । यथाकाळीं संध्यावंदन ।पंचयज्ञ आचरोन । राहे तो न बद्ध होय ॥५॥ध्या नीं धरी विष्णूसी । कर्में करी निराशी ।मुक्ती त्याचि होयि दासी । सिद्धी त्यापासी रांगती ॥६॥कर् माकर्म विकर्म । जाणावें ह्याचें वर्म ।तोचि सनातन धर्म । शर्म घडे त्यायोगें ॥७॥ष ट्शास्त्रेंही जाणिली । परि कर्माची हे किल्ली ।जंववरी हातीं न आली । तंव शिणविलीं त्रिकरणें ॥८॥णा डिती पक्ष करूनी । अन्या ठेविती अडवुनी ।ते जातील निर्वाणीं । हे कहाणीं नायकावी ॥९॥य थोक्त कर्मे करून । जे करिती ईश्वरार्पण ।दंभासूयादि सोडून । तेची जाण मोक्षभागी ॥११०॥ऐं द्रीपासूनी अष्ट दिशा । तीर्थें हिंडतां न दुर्दशा ।दुरावे धरितां फलाशा । ईशानुग्रहावांचुनी ॥११॥चाक् पटुत्व बुद्धिकौशल । असे जरी विद्याबल । तरीं अज्ञानाचें मूल । नरा निर्मूल न करवे ॥१२॥प्र त्यक्षादि प्रमाणानें । न मिळे तें स्वधर्मानें ।लाभे बुद्धिशुद्धीनें । वेदवचनें विश्वासितां ॥१३॥दा वी गुरु शास्त्राधारें । तें श्रद्धेनें जो आचरे ।तो नर भवाब्धी तरे । हेंची खरें मुख्य वर्म ॥१४॥य ज्ञ पूर्तष्टदान । जपतपानुष्ठान ।सफळ होय भाविकां जाण । गुरुवचन पाळितां ॥१५॥क्लीं कारादि बीजें योजून । मोहनादिप्रयोगाचरण ।करविती कर्म दारुण । गुरु कोण म्हणेल ते ॥१६॥ज नदु:खें कळवळे । ज्याचें चित्त स्वयें वळे ।दीना तारी निजबळें । उपदेश फळे तयाचा ॥१७॥ग रज नाहीं स्वार्थीं ज्याला । सांगेना कां सकामाला ।त्याचा उपदेश भला । तो लोकांला तारील ॥१८॥त्र यिमूर्ति तो मानुन । पाळितां त्याचें वचन ।उद्धरती हीन दीन । सत्य जाण त्रिवाचा ॥१९॥य त्नें पाप वर्जावें । घडतां प्रायश्चित्त करावें ।नित्य हरीतें स्मरावें । पाप दुरावे तयाचें ॥१२०॥व श्य करी इंद्रियांसी । सोडुनी दे परान्नासी ।माता मानी परस्त्रीसी । खास त्यासी श्रेय ये॥२१॥शी तोष्णादि साहुनीं । भावें वागे सदाचरणीं ।परनिंदा न घे कानीं । तो तरोनी तारी परा ॥२२॥क र्म न फळे स्नानाविणें । अस्नाताच्या वीक्षणें ।देव फिरती मागें क्षणें । त्याचें जिणें शववत् ॥२३॥र जस्वल स्नानाविणें । म्हणोनी तें नित्य करणें ।मात्र मानसस्नानें । रोग्याकारणें योजिलीं ॥२४॥णा डी लोकां पाखंडपणें । खायी पियी स्नानाविणें ।तो नर नरकीं शिणें । यमभेणें ये तया ॥२५॥य म न करी पाप्याची दया । अपराध क्षमा नसे जया ।नृदेहीं धरितां हरिच्या पायां । यम तया काय करी ॥२६॥सौ ष्टवें हरिचें नाम । वेदसेवा तीर्थधाम ।धर्म करी निष्काम । परंधाम त्या लाभे ॥२७॥सर् वांहुनी अन्नदान । श्रेष्ठ न ज्या काळ मान ।बुभुक्षित पात्र जाण । हें तारण उभयत्र ॥२८॥व से गृहस्थ होवुन । त्याणें द्यावें शक्त्या अन्न ।यती वर्णी ब्राह्मण । विमुख होतां जाण दुर्गती ॥२९॥म ध्यान्ही ये भुकेला । न देतां दवडी त्याला ।त्याचे गेहीं अवदशेला । थारा झाला शाश्वत ॥१३०॥न: ष्ट दुष्ट न म्हणावा । यथाशक्ती तोषवावा ।अतिथीप्रसादें ये देवा । दया भावार्थि याची ॥३१॥क्षो भवितां अतिथीसी । देव पितर तयासी ।शापिती तो कष्टेंसी । नरकवासी होतसे ॥३२॥भ वभय टाळावया । गंगातीर सेवी तया ।गती ये हें न घडे जया । नामही तया तारीतसे ॥३३॥णा ठवी जो चित्तीं पाप । लोकां न दे शाप ताप ।त्याच्या पुण्या नाहीं माप । त्याचा कोप उपशमे ॥३४॥य त्नें तीर्थवास कीजे । प्रतिग्रह न धेइजे ।अन्यपाप क्षेत्रीं बारिजे । वज्रलेप जें क्षेत्रपाप ॥३५॥श्रीं गितज्ञाची भक्ती थोर । सौख्य दे जी इहपर ।साधू होती दुष्ट क्रूर । ईणें पामर तरले ॥३६॥म हामृत्यू अजामिळा । आला फांस घाली गळां ।नारायणा निजबाळा । बाहे त्या वेळां हरी ये ॥३७॥हा क दिल्ही नारायणा । त्या अंतरीं पुत्रपणा ।ब्रीद राखाया नारायणा । दया ये शरणागताची ॥३८॥सं ज्ञा पुत्रासी योजिली । तीच दैवें अंतकालीं ।वैखरीनें उच्चारिली । ती झाली तारक ॥३९॥पत् ता ज्याचा योग्या नसे । स्वनामें तो भेटतसे ।विवक्षा न पाहतसे । औदार्य असें जयाचें ॥१४०॥प्र यत्नें न घेतां नामा । पापी गेला परंधामा ।घेती ठेवूनी जे प्रेमा । हरि नामातें बुडती कीं ॥४१॥दा स होवूनी विष्णूचे । नाम घेती फुका वाचे ।अर्चन करिती शालग्रामाचें । स्थान त्याचें वैकुंठीं ॥४२॥य ज्ञादिकें पुनरावृत्ती । जन्मक्लेश न चुकती ।शालग्रामर्चनें मुक्ती । वैकुंठासी निश्चल ॥४३॥ग्लौं बीजयुक्तोपासना । करितां कष्टें मिळे त्यांना ।भूमिलाभ नश्वर जाणा । अन्य कामना न पुरती ॥४४॥भू ति निधी संतती । एकैक मंत्रें मिळती ।त्यांची नसे शाश्वती । दैवगती अतर्क्य ॥४५॥मं त्र तंत्रादि फळती । तीं फळें नश्वर होती ।शालग्राम इष्ट प्राप्ती । दे सन्मती ठेवितां ॥४६॥ड सूं येतां महाकाळ । त्याचें हरावया बळ ।शालग्रामार्चन सबळ । चित्ता निश्चळ करी जें ॥४७॥ला भे गुरुप्रसादें जी । विष्णुभावें तिला पूजी ।त्याला गती न ये दुजी । वैष्णवांमाजीं श्रेष्ठ तो ॥४८॥धि क्कार असो तयाला । विके जो शालग्रामाला ।दान देतां भूदानफलाला । दे जी तिला कोण दवडी ॥४९॥प य आदिकीं अभिषेक । करोनी पीतां तीर्थोदक ।त्याचें जाय सर्व पातक । चक्रांकयोगें विशेष ॥१५०॥ N/A References : N/A Last Updated : May 23, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP