मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|दत्तमालावर्णांकितमाघमाहात्म्य| माला ५१ ते १०० दत्तमालावर्णांकितमाघमाहात्म्य माला १ ते ५० माला ५१ ते १०० माला १०१ ते १५० माला १५१ ते २०० माला २०१ ते २५० माला २५१ ते ३०० माला ३०१ ते ३४३ माला ५१ ते १०० श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत दत्तमालावर्णांकितमाघमाहात्म्य Tags : dattagurudattavasudevanand saraswatiगुरूदत्तदत्तवासुदेवानंदसरस्वती माला ५१ ते १०० Translation - भाषांतर च तुर दोघे देह भिन्न । नित्य ज्यांचें एक मन ।व्यवहार अन्नपान । एक वर्तन दोघांचें ॥५१॥वे धा वर दे जेव्हां त्यांला । हाचि वर त्यांणीं वरिला ।इतरांपासूनी आम्हाला । मृत्यू न घडला पाहिजे ॥५२॥षा ड्गुण्ययुत जरी होते । मोहें परस्पर गदाघातें ।मेले तेव्हां ब्रह्मा तीतें । सूर्यलोकातें नेतसे ॥५३॥य मादिकें न साधे । ती पदवी तिलां लाधे ।जीवनमुक्ता तेथें नांदे । ब्रह्मानंदें अद्यापि ॥५४॥म ग औदार्य सोडुनी । काय कार्पण्य जोडुनी ।लाभे ऐक पुरातनी । कथा पावनी अर्जुना ॥५५॥हा टकाष्टकोटिनायक । हेमकुंडलाख्य धनिक ।न्यायें धनसंपादक । वैश्य एक नैषधीं ॥५६॥यो ग्य भार्या असे त्याला । दोन पुत्र झाले तीला ।श्रीकुंडल विकुंडला नाम त्यांला । ठेविता झाला तो वाणी ॥५७॥गि ळे काळ कधीं न कळे । दुर्दशा येतां बुद्धी चळे ।म्हणोनी तो उपरमी वळे । धर्मबळें तराया ॥५८॥ने णुनी अथवा जाणुनी । घडल्या पापाची करी धुणी । षष्ठांश द्रव्य वेंचुनी । करी धनी दानादिक ॥५९॥व नीं वैश्य स्वयें चाले । पुत्रां सर्वस्व ओपिलें ।ईश्वरघ्यानें वपू त्यजिलें । त्याणें जोडिलें स्वर्गपद ॥६०॥धू र्तसंगतीनें तत्पुत्र । व्यसनीं झाले परतंत्र ।अपकीर्ति गाजविती सर्वत्र । कुमित्रसंगें बुडाले ॥६१॥ता तें कष्टें मेळविलें धन । वेश्या नट वीत भाट दुर्जन ।त्यांचे ठायीं व्यर्थ खर्चून । झाले निर्धन निराश्रय ॥६२॥या न छत्र नानावेष नित्य पालटोनि विशेष ।विषय भोगितां नि:शेष । द्रव्यकोष संपले ॥६३॥न परिसतां वृद्धवचना । गती आली अशी त्यांना ।क्षुधातुर धरिती राना । स्वजनांनीं त्यागितां ॥६४॥सू र्यास्त होतां ग्रामी लुटती । पांथांची चोरी करिती ।किंवा जीवहिंसा करिती । भिल्लसंगती धरूनी ॥६५॥या परी काळ कंठिता । व्याघ्रें मारिला ज्येष्ठ भ्राता ।सर्पदष्ट दुजा भ्राता । पंचता पावला एके वेळीं ॥६६॥नं दन वैश्याचे दोन । त्यांचें करोनी बंधन ।दूत नेती ताडून । तया ओढून यमापुढें ॥६७॥द ण्डधर वदे दूतां । विकुंडला न्या वैकुंठा ।श्रीकुंडला नरकीं लोटा । पापी मोठा हा असे ॥६८॥चर् तन याचें कुत्सित । कनिष्ठाचें असे सुकृत ।त्याला वैकुंठीं नेवोत । विष्णुदूत सन्मानें ॥६९॥ध र्मरायें असें बोलतां । विष्णुदूतें कनिष्ठ भ्राता ।विमनीं बैसविला तो दूतां । प्रार्थिता झाला नम्रत्वें ॥७०॥ना नापापें आम्हीं केली । पुण्यवार्ता न ऐकिली ।तुल्यमृत्यु एककालीं । केंवी झाली भिन्नगती ॥७१॥या गादिक म्यां न केलें । प्राग्जन्मींचीं कीं ही फलें ।धर्मतत्त्व न ऐकिलें । सांगा पहिलें तें मज ॥७२॥त्रि कालज्ञ विष्णुदूत । म्हणती त्वां होतां दुर्गत ।दोन माघस्नानें यमुनेंत । हरिमित्रसुतसंगें केलीं ॥७३॥पु ण्य तेंची अगणित । पाप जावूनी वैकुंठ ।तुला लाधला अश्रांत । तो अप्राप्त श्रीकुंडला ॥७४॥त्रा ता आपणा आपण । भोगिजे आपुलें आपण ।पाप पुण्य तें केवी कोण । भोगीजे जाण इतरांचें ॥७५॥य त्न न होतां पुण्य । घडलें तत्फल अगण्य ।दयाळू हरि शरण्य । तारी वरेण्य यापरी ॥७६॥ॐ कारादि नमोंत । नारायण चतुर्थ्यंत ।उच्चारितां पातकांत । मन शांत होतसे ॥७७॥भ गवन्मूर्ति विश्व असा । निर्धार ठेवुनी न कीजे हिंसा ।उवा लिखा किडे माशा । आत्मवत् रक्षाव्या ॥७८॥व दे शास्त्र ती अहिंसा । तीणें नये गळां फांसा ।चुकवुनी नरकवासा । स्वर्गवासा जाती नर ॥७९॥बं ध तोडी अभयदान । तैसेंची स्वधर्माचरण ।परद्रोहादि सोडुन । देतां स्थान अचळ मिळे ॥८०॥ध र्म इष्टापूर्त दत्त । जे आचरती दयायुक्त ।अग्निहोत्री वेदरत । त्याला शाश्वत स्वर्लोक ॥८१॥वि वेकी गोद्विजसेवक । वापीकूपप्रपास्थापक ।पंगुदीनांधतारक । उत्तम लोक तया होय ॥८२॥मो चन करी शरणागता । धर्मयुद्धीं घे पंचता ।दाता नृप तो नरकवार्ता । यमकथाही नायके ॥८३॥च तुर नर मार्गी द्रुम । लावी त्याला लाभे शर्म ।पुत्राहुनि ही परम । तारी द्रुम मानवां ॥८४॥ना हीं तुलसी ज्याचे द्वारीं । यम त्याला दंड करी ।वाहे विष्णूला जो मंजरी । तो तारी निजकुला ॥८५॥य ज्ञ तीर्थ पितर देव । तुलसीपाशी घेती ठाव ।तिला सेवी जो मानव । शुद्ध भाव होय त्याचा ॥८६॥आं तरशुद्धीं तुलसी जळ । करीं धरितां तुलसीमाळ ।झडे वाङ्मन:काय मळ । अमंगळ मंगळ होय ॥८७॥अ गत्यें करी शिवार्चन । त्रिपुंड् रुद्राक्ष लेउन ।बिल्वपत्रें लिंगार्चन । करी तो जन कैलासभागी ॥८८॥सा वधानें रुद्र पढें । त्यांचें पाप सर्व झडे ।अरिष्ट टळे आयुष्य वाढे । जायी पुढे कैलासा ॥८९॥ध्य क्ष लावुनी षडक्षर । जपे तो होय अक्षर ।शिवस्व भोगी पामर । नरक दुर्धर होय तया ॥९०॥सा धन जोडाया मोक्षाचें । रूप पंचक ईश्वराचें । भजावें जें ज्याला रुचे । तेची त्याचें तारक ॥९१॥ध र्म हाची द्रोह नसणें । मताग्रह न करणें ।देवभक्त एकपणें । हेंचि देखणें डोळसां ॥९२॥ना नायत्नें देवालय । संरक्षितां लाभे श्रेय ।गोशाला विश्रमालय । करितां होय स्वर्गवास ॥९३॥य तिमठ देवमंदिर । जीर्ण होतां करी उद्धार ।तो तरे जो त्यावर । लोभ करी नर नरक तया ॥९४॥र्हीं कारांकित शक्तियंत्र । पूजितां होयी स्वतंत्र ।शक्ति सूर्य गजवक्त्र । हरि त्रिनेत्र तारक ॥९५॥सर् वपाप्याहुनी अधिक । देवद्रव्योपजीवक ।निर्लोभ जो देवार्चक । तोचि एक धन्य होय ॥९६॥व से प्रीती जसी विषयीं । लागे तैसी देवाविषयीं ।भला हो कां तो विषयीं । मुक्तिविषयीं न शंका ॥९७॥वि धाता जो जीवांचा । वेद ही त्याची वाचा ।ती उल्लंघी तयाचा । किण कैंचा कैवारी ॥९८॥भू तदया ही त्याची पूजा । येथें न हो भाव दुजा ।निजधर्में तया भजा । त्राता न दुजा त्याहुनी ॥९९॥ति तिक्षापथ्य सेविती । धर्म औषध जे घेती ।त्यांचे क्लेश रोग हरती । सुखस्थिति तयां होय ॥१००॥ N/A References : N/A Last Updated : May 23, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP