मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|स्त्रियांची संसारोपयोगिता व विद्यार्जन| प्रस्तुतची कन्या पाहण्याची रीती, साखरपुडा इ. स्त्रियांची संसारोपयोगिता व विद्यार्जन सांप्रतची लग्नपद्धती हुंडा, मानपान इ. प्रस्तुतची कन्या पाहण्याची रीती, साखरपुडा इ. कन्यापरीक्षेचे दशकुमारचरितातील उदाहरण स्त्रीशिक्षणाची अनास्था स्त्रीविवाहाची योग्यता मनु व याज्ञवल्क्य स्त्रीवर्गासंबंधाने मनुस्मृतिकाराची समजूत कल्पान्तरी स्त्रियांची मुंज अविवाहित राहण्याची मोकळिक प्राचीन काळची स्थिती प्रस्तुतची कन्या पाहण्याची रीती, साखरपुडा इ. प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता. Tags : Transliteral प्रस्तुतची कन्या पाहण्याची रीती, साखरपुडा इ. Translation - भाषांतर वरील कलमात लिहिल्याप्रमाणे सांप्रतकाळी सामान्यत: स्थिती झाली आहे, तथापि तेवढ्यवरून ‘ कन्यापरीक्षा ’ या नावाच्या कृत्यास अजीबात फ़ाटा मिळाला आहे असा अर्थ समजावयाचा नाही. कारण बुगड्या गेल्या, पण कानांची भोके होती तशीच कायम राहिली आहेत, या न्यायाने हा कन्यापरेक्षेचा नाटकी प्रकार ‘ साखरपुडा ’ इत्यादी नावाखाली कसाबसा तरी होऊन जातोच. विवाहाच्या बाबतीत देण्याघेण्याच्या वगैरे मुद्द्याच्या गोष्टी अगोदर ठरून चुकल्या असतातच, व उभयपक्षांकडे वधूवरांचुया तसबिरा वगैरे दाखवून कन्या पसंत होण्याचे काम अगोदरच होऊन गेले असते; तेव्हा अशा स्थितीत वरपक्षाकडून पाहण्यात आलेल्या वडील मंडळीपुढे तिला नुसती आणा म्हणून सांगावयाचे, व तिनेही अगोदर शिकवून ठेविल्याप्रमाणे लाजत लाजत येऊन माहेरच्या मंडळीजवळ खाली मान घालून बसावयाचे, व नंतर वरपक्षाकडून ‘ मुली, तुझे नाव काय ? तुला भाऊ किती आहेत ? बहिणी किती आहेत ? ’ इत्यादी काही औपचारिक प्रश्न विचारण्यात आले असता तिने त्यांची उत्तरे अर्धवट हळू आवाजाने, पण आवाज अडखळू न देता द्यावयाची; की लागलीच तिच्या हातात साखरपुडा पडून तिला घरात उठून जाण्याविषयी निरोप मिळावयाचा. एवढे किंवा अशाचसारखे काही किरकोळ प्रकार होण्याचे बाकी राहतात, व तेवढे ते झाले म्हणजे कन्यापरीक्षेचे कृत्य सांग झाले असे लौकिकात मानण्यात येते. N/A References : N/A Last Updated : January 27, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP