ऋक्‌पुरश्चरणं द्विविधमुक्तम्‌

प्रस्तुत ग्रंथात मंत्र, व्याख्यान, मराठी अर्थ आणि मंत्रविधान एकत्र मिळाल्याने जिज्ञासूंची तृप्ती पूर्ण होईल असा विश्वास आहे.


एवं द्वाद्शसहस्रसंख्याकं ऋक्‌पुरश्चरणं द्विविधमुक्तम्‌ । वैद्यनाथपायगुण्डेमतेन अत्र ऋक्‌पुरश्चरणेऽपि पूर्वोक्ता: पंचदशशतादयोप्यन्ये पक्षा बोद्धव्या: । तेषामपि काल: शुक्लप्रतिपदारभ्यैकादशीपर्यंत उक्त एव तदनुसारेण प्रत्याहिक: सूक्तावृत्तिनियम: कल्पनीय; । ततो द्वादश्यामेव पूर्ववत्‌ तद्दशांशादि हवनाद्यनुष्ठेयम्‌ ॥ पंचदशशतपक्षे यथा - शुक्लप्रतिपदारभ्य अष्टमीपर्यंतं अष्टदिवसेषु दशावृत्तौ (८०) अशीतिपाठा: सूक्तस्य संपन्ना: एवं ऋचां द्वादशशती पूर्णा । ततो नवमीदशम्यो: प्रत्यहं अष्टावृत्तौ षोडशपाठा:, अवशिष्टाअत्वार : पाठा एकादश्यां, एवं सूक्तस्य शतावृत्त्यां पंचदशशतात्मकऋक्‌पुरश्चरणपक्ष: संपन्नो भवति । अनयैव दिशा आवृत्तिकल्पनया द्वादशशतावृत्ति: सहस्रावृत्तिपक्षश्चोहय: । अस्मन्मते सूक्तावृत्तिपक्ष एव द्वादशशतावृत्तिपंचदशशतावृत्त्यादय: पक्षा: अनुसर्तव्या: ।
इति ऋक्‌पुरश्चरणविचार: ।

याप्रमाणें द्वादशसहस्रसंख्यात्कम ऋक्‌पुरश्वरणविधि सांगितला. पायगुंडे यांचे मतानें सूक्तावृत्तिपक्षीं सांगितलेले पूर्वोक्त पंचदशशत, द्वादशशत, सहस्त्रावृत्ति हे पक्ष या ऋक्‌पुरश्वरणपक्षींही घ्यावें. त्यांचा काल प्रतिपदा ते एकादशी हाच होय. द्वादशीला तद्दशांश हवनादि विधि आचरावा. तदनुसार प्रत्येक दिवशींची    आवृत्तिकल्पना करावी. उदाहरणार्थ :--- पंचदशशापक्षीं प्रतिपदा ते अष्टमी नित्य
दहा (१०) आवृत्ति केल्या असतां ८० आवृत्ति; नवमी - दशमी आठ आठ आवृत्ति;
आणि एकादशीच्या दिवशीं चार (४); एकूण ८०+१६+४=१०० सूक्तावृत्ति
केल्यानें पंचदशशत ऋक्‌पुरश्चरन होतें.
ऋक्‌पुरश्चरणक्षीं याच रीतीने दादशशतावृत्ति व सहस्त्रावृत्तिपक्षीं सूक्तावृत्ति यांची कल्पना करावी. हवनादि द्रव्यें पूर्वोत्तच घ्यावीं. आमच्या मतें हे पंचदशशतावृत्ति इत्यादि पक्ष सूक्तावृत्तिपक्षींच घ्यावें. याप्रमाणें सूक्तावृत्तिपुरश्चरण व ऋक्‌पुरश्चरण यांचा विचार पूर्ण झाला.


References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP