हिरण्यवर्णां सूक्तस्य

प्रस्तुत ग्रंथात मंत्र, व्याख्यान, मराठी अर्थ आणि मंत्रविधान एकत्र मिळाल्याने जिज्ञासूंची तृप्ती पूर्ण होईल असा विश्वास आहे.


अत्र हि मूलवचने ‘श्रीसूक्तस्य समस्तस्य’ हिरण्यवर्णां सूक्तस्य जपं कुर्यात्‌ । सर्वं जपेत्तत: सूक्तं श्रीसूक्तं शुभदं नृणां । एतै: प्रमाणै: पुरश्चर्याविधौ द्वादशसहस्राद्यावृत्ति: श्रीसूक्तस्य समस्तस्य विहिता न तु ऋचामेव, एवं सति ‘लोके तु संपूर्णसूक्तस्यैव द्वादशसहस्रादिजप:  तद्दशांशो होमाद्यनुष्ठीयते पुरुषसूक्तजपहोमानुष्ठानवत्‌ ।
तत्र मूलं मृग्यम्‌ अनुपलब्धे:’ इति यदुक्तं विद्वद्वरै: पायगुण्डेत्युपाभिधवैद्यनाथमहोदयैस्तत्सुधीभिर्विचारणीयम्‌ ॥  सितप्रतिपदारभ्य यावदेकादशी भवेत । अथं विधि: सूक्तस्य द्वादशसहस्रावृत्तिपक्षे न युज्यते, कर्मण: बहुदिनसाध्यत्वात्‌ । ऋकपुरश्चरणात्मक: पक्षस्त्वन्य:, स चाधुनैव वक्ष्यते इत्यलम्‌ ।

आतां या सूक्तावृत्तिपुरणाबद्दल प्राचीन पंडित वैद्यनाथ पायगुंडे यांनीं “सध्यां लोकांमध्यें संपूर्ण सूक्ताचें द्वादशसहस्रादिसंख्यात्मक जें पुरश्वरण केलें जातें याला प्रमाण मिळत नाहीं; तें शोधलें पाहिजे”, हा संशय प्रकट केला आहे तो आम्हांला भ्रममूलक वाटतो. कारणा आम्हीं वर उद्धृत केलेल्या वचनांत ‘हिरण्यवर्णां सूक्तस्य’,  ‘श्रीसूक्तस्य समस्तस्य’,‘सर्वं जपेत्तत: सुक्तं’, इत्यादि शिवार्चनचंद्रिकादिवचनांत समस्त सूक्ताच्या द्वादससहस्रादि आवृत्तींबद्दल स्पष्ट उल्लेख आहे. शांतिसारामध्यें कमलाकरांनींही संपूर्ण सूक्ताची द्वादशसहस्रावृत्ति सांगितली आहे. अर्थात्‌ ही शिष्टपरंपरा समूल आहे यांत संशय नाहीं. पुरश्वरणाविषयींचे नियम  पुढें दिले आहेत ते लक्षांत घ्यावे. याप्रमाणें हा द्वादशहस्रादि सूक्तवृत्यात्मक पुरश्वरणविचार पूर्ण झाला.


Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP