ऋक्‌पुरश्चरणस्य द्वितीयप्रकार

प्रस्तुत ग्रंथात मंत्र, व्याख्यान, मराठी अर्थ आणि मंत्रविधान एकत्र मिळाल्याने जिज्ञासूंची तृप्ती पूर्ण होईल असा विश्वास आहे.


अथ ऋक्‌पुरश्चरणस्य द्वितीयप्रकार :--- शिवार्चनचंद्रिकायां मेरुतंत्रे  सारसंग्रहेऽपि ‘रमामंत्रेषु यो सक्त: श्रीसूक्तं स जपेद्वुध: । विधानं वक्ष्यते सम्यक्‌ ऋक्‌पंचदशकस्य हि ॥ शुक्लप्रतिपदारभ्य यावदेकादशी भवेत्‌ ॥ तावद्‌द्वादशसाहस्त्रं जपेन्निश्चलमानस: । दशम्यंतं जपेत्सूक्तं आवृत्त्या तु त्रिसप्तत्या । एकादश्यां तु सप्तत्या सूक्तावृत्तिं चरेद्वुध: ॥ ब्रम्हाचर्यरत: शुद्धो वस्त्रदंतादिभि: सुधी: ॥ पद्मैस्त्रिमधुरोपेतैर्घृताक्तेन पयोन्धसा । श्रीसमिद्भि: सर्पिषा च प्रत्येकं त्रिशतं हुनेत्‌ ॥ प्रतिद्रव्यं त्रित्रिशते स्याद्‌द्वादशशती तथा ।
अशीत्या वृत्तय: सूक्तस्येवं सति भवन्ति वै ॥ द्वादश्यां द्वादशैवाथ विप्रांश्चैव तु भॊजयेत्‌ । तेन सिद्धो भवेन्मंत्रो नात्र कार्या विचारणा ॥’ इति ॥

श्रीभगवती महालक्ष्मी जगदंबिकेच्या कृपानुग्रहास्तव तिचा मंत्र सिद्ध करावा अशी इच्छा असेल, त्यानें पंचदश ऋचात्मक श्रीसूक्ताचा सतत जप करावा. त्याचें विधान असें :---  आश्विन शुक्ल प्रतिपद‌ (देवीनवरात्राचा विशेष कल आहे म्हणून) किंवा पूर्वोक्त शुभमासाच्या शुक्लतिपदेला श्रीसूक्तपुरश्चरणानुष्ठानाचा  आरंभ करावा. प्रतिपदा ते दशमी प्रतिदिनीं (देवीची पूजा करून संकल्पपूर्वक) ‘त्रिसप्तति’ - त्र्याहत्तर आवृत्ति कराव्या, व एकादशीला सत्तर. याप्रमानें जप केला असतां अकरा दिवसांत सूक्तावृत्ति ८०० आठशें होतात. सूक्तऋचा १५ म्हणू ८००*१५=१२००० एकूण द्वादशसहस्र ऋक्‌पुर श्चरण होतें. द्वादशीच्या दिवशीं (येथें अग्न्याहुति वगैरे पाहण्याचें कारण नाही). तद्दशांश इहव, तर्पण, मार्जन, बाम्हण - सुवासिनी कुमारिकाभोजन वगैरे सर्वविधि पूर्ववत्‌ आचरावे. हवनीय द्रव्यें त्रिमधु - (दहीं- तूप-मध) युक्त कमलें (रक्त,) घृताक्त पायस, बिल्वसमिधा आणि आज्य हीं चार होत. प्रत्येक द्रव्याहुति तीनशें (३००) एकूण १२०० दशांश हवन होतें. याप्रमाणें सांग पुरश्चरणानुष्ठान केलें असतां मंत्र सिद्ध होतो यांत शंका नाहीं. याप्रमाणें हा द्वितीय ऋक्‌रश्वरणप्रकार झाला.

द्वादशसहस्त्रऋक् संख्यात्मक पुरश्चरण
प्रकार पहिला
प्रतिपदा ते अष्टमी
७५ आवृत्ती प्रत्येक दिवशी X ८ = ६०० एकूण आवृत्ती
६०० एकूण आवृत्ती + १३४ नवमी-दशमी ( ६७X२) = ७३४
७३४+६६ एकादशी = एकूण आवृत्तीसंख्या

प्रकार दुसरा
प्रतिपदा ते दशमी
७५ आवृत्ती प्रत्येक दिवशी X १० दशमी पर्यंत = ७३०
७३० + ७० एकादशी = ८००  एकूण आवृत्ती
८०० एकूण आवृत्ती + १५ ऋक संख्या = १२००० एवं द्वादशसाहस्त्री


References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP