तत्रादौ ऋष्यादिन्यास

प्रस्तुत ग्रंथात मंत्र, व्याख्यान, मराठी अर्थ आणि मंत्रविधान एकत्र मिळाल्याने जिज्ञासूंची तृप्ती पूर्ण होईल असा विश्वास आहे.


तत्रादौ ऋष्यादिन्यास :--- तन्न्यासे शिर:प्रभृतिस्थानान्युक्तानि तंत्रान्तरे - ‘ऋषिर्गुरुत्वाच्छिरसि ध्येयत्वाद्देवता हृदि ।
छंदोक्षरत्वाद्वदने न्यस्तव्यं मंत्रवित्तमै: ॥
’ अन्यत्रापि - ‘गुरुत्वान्मूर्ध्नि तत्स्थानं मंत्रवर्णाधिदेवता ।
छंद:स्थानं मुखं योग्यं देवता हृदि संस्थिता ॥
वीजवर्णात्मना द्दष्टा: पूर्वे मंत्रा महर्षिभि: ॥
तस्मात्तन्मंत्रबीजं वै मंत्रकारणभावत: ॥
मंत्र: सामर्थ्यरूपेण फलदाने सशक्तिक: ।
वीजस्थानं गुहयमिति तत्र बीजं प्रविन्यसेत्‌ ॥
शक्तिस्तु गमने द्दष्टा तेन
शक्तिस्तु पादयो: ।
नाभौ प्राण: कीलितो वै तस्मात्तत्र तु कीलकम ॥’
इति ।
न्यासकाले ऋष्यादिपदं चतुर्थ्यंतं नमोन्तं उच्चार्य तत्तत्स्थानेषु न्यसेत ।
तथा न्यासे शिरोमुखादिस्थानवाचकानां पदानां सप्तम्यंतत्वेन उच्चार: कार्य इत्येके, नेत्यन्ये ।
तदेवं - ऋषिभ्यो नम: शिरसि इत्यादि ।
अत्र मुद्राप्रकार इत्थम्‌ - मध्यमा तर्जनी अंगुष्ठश्चेति च ।
अग्रत: संहतं कृत्वा शिरोदेशे स्पृशेत्‌ ।
छंदोभ्यो नम: मुखे इत्युक्त्वा अनामिकांगुष्ठकनिष्ठाग्रत्रयसंहननेन मुखस्पर्श: ।
देवताभ्यो नमो
हृदि इत्युक्त्वा पंचांगुल्यग्रसंगमनकरतलेन हृदि स्पर्श: ।
बीजेभ्यो नमो गुहये इत्युक्त्वा गुहयस्पर्श: ।
शक्तिभ्यो नम: पादयो: इत्युक्त्वा व्यत्यस्तहस्ताभ्यां पादयो: स्पर्श इति ।
अनुक्तन्यासमुदाविधाने ‘अंगुष्ठानामिकाभ्यां तु न्यास: सर्वत्र संमत:’ (न्या. वि. चंद्रिका) ।
क्वचिच्छक्तिबीजानि स्तनयोर्न्यसेत तत्र शक्तीनां दक्षिणस्तने
बीजानां वामस्तने न्यास इत्युक्तम्‌ । क्वचित्‌ कीलकविनियोगयोर्न्यास: मुद्रा चोक्रा ।
तद्यथा - अंजलिं प्रसार्य शीर्षादिपादान्तं तेन अंजलिना स्पर्श इति कीलकमुद्रा ।
‘विनियोगस्य मुद्रा स्यात हृदये त्वंजलिक्रिया’  क्रिया’ इति ऋष्यादिन्यास: ।

अर्थ :--- ऋष्यादिन्यास म्हणजे ऋषि, छंद, देवता, बीज व शक्ति, क्वचित्‌
कीलक, विनियोग, यांचा शिरोभागादि अंगाचे ठिकाणीं न्यास करणें. मंत्रद्रष्टा ऋषि
श्रेष्ठ असल्यानें उत्तमांग म्हणजे शिरस्‌ याचे ठिकाणीं ऋषिन्यास करणें. छंद
वर्णात्मक आल्यानें वर्णोच्चारस्थान मुख, देवता हृत्कमलाचे ठिकाणीं घ्येय असल्यानें
तिचें हृदयस्थान, बीजाचें स्थान गुहय, गमनशक्ति पायांची असल्यानें पाय हें तिचें
स्थान युक्तन आहे. शिरस्‌, मुख इत्यादि अवयववाचक पदांचा सप्तम्यंत उच्चार
करून ऋष्यादि पदांचा चतुर्थी  विभक्तींत नमोन्त असा निर्देश करावा. तो असा:
ऋषिभ्यो नम: शिरसि असें म्हणून अंगुष्ठ, तर्जनी (आंगठयाजावळचें बोट)
व मध्यमा या तीन अंगुलींचीं अग्रें संहत म्हणजे एकत्र जुळवून मस्तकाला स्पर्श
करणें, छंदोभ्यो नम: मुखे असें म्हणून अनामिका (करांगुलीजवळचें बोट),
कनिष्ठिका आणि अंगुष्ठ यांच्या संहत अशा अग्रांनीं मुखाला स्पर्श करणें.
देवताभ्यो नम: हृदि असें म्हणून पांचही अंगुल्यग्रें एकत्र करून करतलानें
हृदयाला स्पर्श करणें. बीजेभ्यो नम: गुहये असें म्हणून अंगुष्ठ व अनामिका
यांनीं गुहयस्थानीं स्पर्श आणि शक्तिभ्यो नम: पादयो: असें म्हणून व्यत्यस्त
हस्तानें म्हणजे दक्षिण हस्तानें वामपादाला व वाम हस्तानें दक्षिण पादाला एकाच
वेळीं स्पर्श करणें. याप्रमाणें हा ऋष्यादि न्यासविचार झाला.


References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP