रामदासांचे रूपक

लोकांसाठीच व लोकांसंबंधीच, लोकांनी रचलेली गीते म्हणजेच लोकगीते. भावना उत्कट होऊन ओठावर येणारी गीते.


भरत गा खंडामाजी । शरयूतीर गांवो ।
धर्माचे नगर तेथें । राज्य करी रामरावो ।
पांगुळा पाय देतो । देवी जानकीचा नाहो ।
जाईन मी तया ठायां । देवां दुर्लभ ठावो ।
राघवाचा धर्म जागो । अधर्म रे भागो ।
अज्ञान निरसूनियां । विज्ञानी लक्ष लागो ।
मीपणाचे मोडले पाय ।
म्हणोनि पांगुळा जालों ।
तूपणाची कीर्ति देई । ऐकूनिया शरण आलों ।
मी - तूपण निरसी माझें ।
भक्ति भिंतीवरी बैसलों ।
प्रेम - फडकें पसरूनियां ।
कृपादान मागों आलों ।
जगीं तूचि दाता । म्हणोनि आलो मागावया ।
मागणें नित्सें जेणें । ऐसें रे गा रामराया ।
नवविद्या दुभतें देई । भावहलगा बैसावया ।
ज्ञानकाठी देई करीं ।
वैराग्य बोली पांधराया ।
तुझे कृपेचा कांबळा. ।
दे मज पांगुळा कारणें ।
माया मोह - हीव वाजे । दे निवारेल जेणें ।
बोधाचे ताक पाजी । शब्द खुंटे धालेपणे ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP