मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग अकरावा| वासना तसे भोग प्रसंग अकरावा नमन अद्वैत परब्रह्म जाणतेनेणतेपणा-भेदाभेद पिंगळेची कथा-दृष्टांत वासना तसे भोग यमयातना निष्कलंक प्रबोध हरि व अल्ला एकच विटंबनेचें शरीर प्रसंग समाप्ति प्रसंग अकरावा - वासना तसे भोग श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते. Tags : kavitapoemsaintsheikh muhammadकविताकाव्यमराठीशेख महंमदसंत वासना तसे भोग Translation - भाषांतर यालागीं चतुरीं आवरावी कल्पना । थोड्यासाठी बहुत करितसे भ्रमणा । जप तप अनुष्ठान शहाणपणा । दापूनि टाकीतसे ॥५४॥कल्पना वासना मुरलियाउपरि । तो इंद्रपदाचों राज्य करी । पुण्य सरल्या लोटिजे अघोरी । या मृत्युलोकांमाझारी ॥५५॥करूनियां हीन तप सामोग्री । इच्छी मज राज्य द्यावें श्रीहरि । होईल खोज्या थेरकरी । राज्य भोगावया ॥५६॥खोज्या सौर्याचें वडिलपण । तेंहि एक राजीच भासे व्याहान । थेरकरी मिरवी नाईकपण । तेंहि एक राज्यच असे ॥५७॥ऐशीं राज्यें परोपरी । कोणी विधवा कोणी कर्णकुमारी । ऐसें चराचरीं भोग परोपरी । प्रालब्ध घडवितसे ॥५८॥ज्याची जैशी कमाई भावना । त्यास तैसेंच राज्य प्राप्त जाणा । बोल ठेवावया कारण नाहीं कवणा । जैसे द्यावें तैसे घ्चावें ॥५९॥पुरुषाशीं पुरुषें रमता । तो संवरा होईल तत्त्वतां । उसनें द्यावयाची बद्धता । परतोन लागेल त्याशीं ॥६०॥खोजे होतील एकिया गुणें । सत्य आणिकाला खसी करणें । थेरकरी होऊनि डोळे मोडणें । स्त्रिया अभिलाषालागी ॥६१॥जयाची जैशी करणी रहणी । तो तैसेंच पावेल तत्क्षणीं । यालागी भाव धरावया श्रोते जनीं । कल्पनाविकार सांडावे ॥६२॥सर्व भूतीं भजा अन्नदानें । सुपात्रीं भजावें सर्वांगुणें । पाखंड देखोनि कल्ला करणें । गहिन होऊंनियां ॥६३॥बिजवरास कन्या देऊनि द्रव्य घेती । ते प्रत्यक्ष बोक्याचा देह धरिती । खाटिक पारधी कसाब होती । तें सुरापाणी ओळखावें ॥६४॥अभिलाषें आडवे दृष्टीची कातरी । जप्या तप्या मोहन्या सिंतरी । तिला आवरील तो ब्रह्मचारी । साधुजनांत बोलिजे ॥६५॥जोंवरी वीर्य भरलें असे शिश्र्नीं । तों आवडी आलोकी पराव्या कामिनी । ते मेरूहूनि खचल्या व्याकुळ मनीं । चिंताग्रस्त पडतसे ॥६६॥षड्रस पक्वान्नाचें गोडपण । रसना जीवे जाणें संपूर्ण । तेंचि परतलिया झांकी लोचन । कष्टी होऊनियां वोकी ॥६७॥स्त्रीस भ्रतारापें निजतां हाऊसस । गोळा वागवितां कष्टी नवमास । प्रसूतवेळे विडंबना उदास । प्राणसंधी होतसे ॥६८॥ऐसे थोड्या सुखासाठी बहु दुःख । बहुतां दुःखांचें थोडें सुख । जैसे भुकेलें नेणें घातलें विख । भेदल्या प्राणघात ॥६९॥स्वर्ग नर्क वैकुंठ केलें जगदीशें । तें सुखदुःख सांगेन ग्रंथमिषें । श्रोती चित्त द्यावें उल्हासें । प्रबोध करूनियां ॥७०॥धर्मे धर्म वाढे हे पुण्याची वेली । संख्या नाहीं ऐशी सामोग्री जाली । तरीच ईश्र्वर वैकुंठी घाली । समाधानालागी ॥७१॥सांगेन वैकुंठाचा बडिवार । चौर्यांशी लक्ष कोठड्यांचे एक मंदिर । जैसे एक राज्याचें शोभे भद्र । तैसा पुण्यार्थी राज्य करी ॥७२॥ऐशीं असंख्यात धवलारें । शोभती वैकुंठाभीतर । तेथें पुण्यार्थी आठवी ईश्र्वर । पुतळ्या देवा करिती ॥७३॥ज्याचें येथें पापें पाप उमाप फळें । ते घालजेती यमाचे बंदिशाळे । जाचणी सोसतां बरळती वोवळे । ते सांगेन आतां ॥७४॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP