उत्तरालंकार - लक्षण १

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


“प्रश्नाला उपस्थित होऊ न देणारें ज्ञान ज्या अर्थाविषयीचें असतें, त्या अर्थाला उत्तर (अलंकार) म्हणावें.”
प्रश्न म्हणजे जाणण्याची इच्छा. प्रश्न हा शब्दा, (‘प्रच्छ’ :--- विचारणें या धातूला) ‘नङ’ हा (व्याकरणांत सांगितलेला) कृत प्रत्यय, ‘भाव’ ह्या अर्थी लावल्यानें सिद्ध होतो.’ तेव्हां प्रश्न म्हणजे ज्ञीप्सा, (म्ह० कांहींतरी) जाणण्याची इच्छा, (म्ह० जिज्ञासा.) ती (जाणण्याची इच्छा) त्या प्रश्नाला ज्या वाक्यांत उत्तर दिलें जातें त्याच्या ज्ञानाविषयींची असल्यामुळें. त्या उत्तरवाक्याचें ज्ञान झालें कीं नाहीशी होते. (पूर्ण होते.)
(यावर शंका :---) “(कां हो.) जिज्ञासा (तर), (अमुक वस्तूचें) ज्ञान माझ्या सुखाचें साधन आहे” असें (माणसाला) वाटू लागले (म्ह० असें त्याला ज्ञान झालें) कीं, उत्पन्न होतें, आतां ज्या ज्ञानाविषयीं माणसाला इच्छा झाली होती तें ज्ञान, ‘हें ज्ञान माझ्या सुखाला कारण आहे.’ या रूपानें, जिज्ञासा उत्पन्न होण्यापूर्वीच (त्या ज्ञानाची इच्छा करणार्‍या माणसाला) झालें होते. (सिद्धत्वात). मग (तें ज्ञान पुढें उत्तरवाक्यावरून मला व्हावें अशी) त्या माणसाला इच्छा उत्पन्न होईलच कशी.”
(या शंकेला उत्तर :---) असें म्हणू नका. (कारण, उदाहरणच द्यायचें म्हणजे) ‘या जगांत श्रेष्ठ देवता कोणती ?’ अशा तर्‍हेच्या प्रश्नवाक्यावरून, प्रश्न विचारणार्‍या व्यक्तीला ‘सर्वश्रेष्ट देवतेविषयीं मला ज्ञान व्हावें’ अशी इच्छा झाल्याचें अनुमान होतें. ही त्याची  इच्छा ‘शिव, विष्णु, (देवी) इत्यादि देवतांपैकीं सर्वश्रेष्ठ अशा (एक) देवतेविषयींचें ज्ञान माझ्या समाधानाला कारण (होणार) आहे,’ ह्या समजुतीमुळेंच (ज्ञानामुळेंच) उत्पन्न होते. ह्या त्याच्या (म्ह० पृच्छकाच्या) इच्छेच्या पोटांत, (प्रश्न करण्यापूर्वीं) ‘(जगांत) अनेक देवता असतात,’ हें ज्ञान असतेंच; व हें त्याला कुणाकडून तरी (केव्हां तरी) झालेलें असतेंच; (इतकेंच नव्हें तर) विष्णु, शिव इत्यादि अनेक विशिष्ट प्रकारच्या देवता असतात, व त्यांपैकीं कोणती तरी एक देवता (व्यक्तिपरत्वें) श्रेष्ठ मानली जाते, असेंही ज्ञान त्याला (अगाऊ) झालेलें असतें. (दैवतत्वव्याप्यधर्मत्वेन रूपेण ताद्दशधर्मोपस्थितौ सत्याम) हें त्याचें, “विष्णु, शिव इत्यादि अनेक देवता (जगांत) असतात व असतात व त्यांपैकीं कोणती तरी देवता प्रत्येकाला श्रेष्ठ वाटते,” अशा अर्थाचें ज्ञान, “एका वस्तूचें ज्ञान झालें, कीं त्या वस्तूशीं कोणत्या तरी संबंधानें संबद्ध असलेल्या दुसर्‍या (एक किंवा अनेक) वस्तूंचें ज्ञान (आपोआपच) होतें.” या (न्यायशास्त्रांतील) नियमानुसार (अगाऊच) झालेलें असतें. पण कांहीं झालें तरी हें ज्ञान सामान्यस्व्रूफाचें असतें. “ह्या सामान्यज्ञानालाच पुढें विशिष्ट (निश्चित) स्वरूप येईल, आणि मग तें, एकच श्रेष्ठ देवतेविषयींचे, माझ्या प्रश्नाला मिळणार्‍या उत्तराच्या वाक्यावरून होणारें ज्ञान, माझ्या समाधानाला कारण होईल,” असें (प्रश्न करणाराला प्रश्न करण्यापूर्वी झालेलें) ज्ञान, त्याच्या जाण्याच्या इच्छेला विषय होणारें ज्ञान (त्याच्या प्रश्नाला उत्तर मिळण्यापूर्वीं) सामान्य स्वरूपाचें असतें; (अनिश्चित स्वरूपाचें असतें. निरवच्छिन्नप्रकारताभाञ्जि). कारण त्या ज्ञानाचा विषय, ‘विष्णु हें दैवत श्रेष्ठ, शिव हें दैवत श्रेष्ठ अशीं; अनेक श्रेष्ठ दैवतें झालेलीं असतात. उत्तरादाखल बोललेल्या वाक्यावरून, (या अनेक श्रेष्ठ देवतांपैकीं कोणती तरी एकच देवता श्रेष्ठ आहे, असें) निश्चित ज्ञान उत्पन्न झाल्यानंतरच, ती जिज्ञासा थांबतें. [तेव्हां त्या जिज्ञासेला उत्पन्न करणारें ज्ञान (विष्णु वगैरे देवतांपैकीं कोणत्या तरी एकाच श्रेष्ठ देवतेचें ज्ञान, आणि विष्णु वगैरेपैकीं एकच (कोणती तरी) देवता सर्वश्रेष्ठ हें निश्चित विशेषज्ञान (म्ह० त्या उत्तराच विषय होणारें ज्ञान) अशी हीं दोन ज्ञानें निराळीं असल्यानें], इच्छेला उत्पन्न करणारें ज्ञन इच्छेपूर्वीं विद्यमान असलें तरी, त्याच्या योगानेम जिज्ञासेचा प्रतिबंध होणार नाहीं. कारण इच्छेला उत्पन्न करणारें ज्ञान त्या इच्छेचा विषय होतच नाहीं. अर्थात ‘जिज्ञासेला प्रतिबन्ध करणारें उत्तरवाक्यजन्य ज्ञान, विज्ञासा होण्यापूर्वींच हजर असल्यानें, जिज्ञासा उत्पन्नच होणार नाहीं’ हा (शंकाकारानें दाखवलेला) दोष संभवतच नाहीं.
ह्या उत्तरालंकाराचें प्रकार दोन. (१) पहिल्या प्रकारांत, उत्तरावरून प्रश्नाचें अनुमान केलें जातें; व (२) दुसर्‍या प्रकारांत प्रथम प्रश्न केलेला असतो, (आणि नंतर त्याचें उत्तर दिलेलें असतें.) (ह्या दोन्ही प्रकारांची) क्रमानें उदाहरणें :--
“हें पथिका, ! माझा प्रियकार तुझ्याप्रमाणें (च) पथिक असून, आतां वृक्षांच्या (समूहा) खालीं (रानांत) विसावा घेत असेल. सध्यां, मी जिवंत आहे, यापरतें माझें दुसरें कुशल तें काय असणार ?”
ह्या श्लोकांत, कोण्या एका पथिकाच्या स्त्रीनें दुसर्‍या एका पथिकाला दिलेल्या उत्तरावरून, त्या (दुसर्‍या) पथिकानें केलेल्या कुशल प्रश्नाचें अनुमान होतें. कारण तिला कुशल प्रश्न विचारल्यावांचून तिनें आपलें कुशल सांगणें संभवत नाहीं.
“हे कृशोदरि ! तूं अशी कां खंगली आहेस ?” “कां रे, तुला (ह्या) दुसर्‍यांच्या उठाठेवी कशाला ?” “तरी पण सांग ना; मला वरं वाटेल.” “चालता हो, (इथून); हे पथिका ! तुझी बायको तुला सांगेल. (ह्याचें कारण.)”
ह्या श्लोकांतल्या पहिल्या प्रश्नांतलें, “तुझ्या खंगण्याचें कारण सांगितलेंस तर मी त्यावर इलाज करीन” हें व्यंग्य. पण त्याच्या उत्तरांतील “तुझ्यासारख्या परपुरषाला (माझ्या खंगण्याचें)  कारण सांगणें योग्यही नाहीं; अन तुझ्याकडून त्यावर इलाज होणें शक्यही नाहीं.” हें व्यंग्य. (पथिकानें केलेल्या) दुसर्‍या प्रश्नाचे “पुरें झालें तुझें.” हें व्यंग्य. (पथिकानें केलेल्या) दुसर्‍या प्रश्नाचे “पुरें झालें तुझें हें पातिव्रत्य; मूर्ख बायकांच्या निव्वळ हट्टाचा, हा परिणाम आहे; (अगं !) स्वत:ला अन दुसर्‍याला खूप करणें, हें (च) या संसाराचें खरें सार आहे.” हें व्यंग्य; आणि ह्या त्याच्या दुसर्‍या प्रश्नाला दिलेल्या उत्तरांतील, “जी माझी दशा झाली आहे तीच तुझ्या बायकोचीही झाली असणार, त्यावर तूं इलाज कर. स्वत:चें घर जळत असतां तें सोडून, दुसर्‍याच्या घराची आग कुणी विझवीत नाही; आतां स्वत:चें नुकसान सोसूनही दुसर्‍यावर उपकार करण्याची माझी इच्छा ’ (असें म्हणत असशील) तर अशा रीतीचा दुसर्‍यावर उपकार करायला तूं निघालास तर, तुझ्या बायकोवरही तुझ्यासारख्या दुसर्‍या कुणाला तरी उपकर करावा लागेल (च); मग त्याऐवजी माझ्याप्रमाणेंच परक्या पुरुषाकडे ढुंकूनही न पाहणार्‍या तुझ्या बायकोचें विरहदु:ख दूर कर ना !" हें ब्यंग्य.
प्राचीन साहित्यशास्त्रकारांचे या अलंकाराचे बाबतींत म्हणणें असें कीं, “उत्तरावरून प्रश्नाचें अनुमान ज्यांत आले असले तरी, तें रमणीय दिसतें; पण प्रश्न व उत्तर असलेल्या म्ह० दुसर्‍या प्रकारांत, प्रश्न व उत्तरें अनेक वेळ आलीं, तरच तें रमणीय दिसतें.
ह्या अलंकारांचे (मूळ) दोनच प्रकार असले तरी त्यांतील प्रत्येक प्रकाराचे (१) प्रश्नांत खोल अर्थ (व्यंग्यार्थ) असणें (२) उत्तरांत खोल अर्थ असणें, (३) प्रश्न व उत्तर ह्या दोहोंतही खोल अर्थ असणें, (४) प्रश्न व उत्तर दोहोंतही मुळींसुद्धां खोल अर्थ नसणें, असे चार (अवांतर) प्रकार होतात. म्हणजे मुख्य दोन प्रकारांचे, प्रत्येकी चार चार, मिळून (या अलंकाराचे एकूण) आठ प्रकार होतात. उदा) :---
“माझ्या ह्रदयांत वास करणरा माझा प्रियकर माल मुळींच सोडून जात नाहीं. (तेव्हां) तुला उत्त्र द्यायलाही, मला सवड नाहीं; मग तुझ्या मनोरथाची गोष्टच दूर राहिली.”
या ठिकाणीं, कुणा एका पथिकानें, एका साध्वी स्त्रीला केलेल्या, ‘तुझ्या प्रियकार कोठे आहे !’ या प्रश्नाचें अनुमान होतें. ‘प्रियकर जवळ असेल तर त्याला फसवून, अन तो जवळ नसेल तर (मग) आपणा दोघांची स्वच्छंदपणें रतिक्रीडा व्हावी. हा त्या प्रश्नांतला खोल अर्थ. नाहींतर (म्ह० हा खोल अभिप्राय न मानला तर) ‘तुझ्या मनोरथाची गोष्टच दूर’ ह्या उत्तराची संगतीच लावता येणार नाहीं. पण उत्तर उघडच असल्याने, त्यांत खोल अर्थ मुळींच नाहीं.
“हे सुंदरी ! सुवर्णाकरितां मी देशोदेशी भटकत आहे. पण तें मिळायला कठीण असल्यानें, माझें मन चिंतेनें व्यापून गेलें आहे, तें कां ?” हा एका खेडवळ बाईचा उघड प्रश्न. (अनुमान करून जाणलेला.) पण त्या प्रश्नाला एका (रंगेल) चतुरानें दिलेल्या उत्तरांतील, “(सुवर्ण म्ह०) तुझें सुंदर रूप मला (उपभोगाकरितां) दिलेंस तर, माझी चिंता नाहींशीं होईल.” हा खोल अर्थ.
“हे सुंदरी, तुझ्या रोगाचें मूळ कारण नीट शोधून काढून, मग मी त्यावर उपचार करीन; तूं घाबरू नकोस. रसक्तियेंत (पहिला अर्थ :--- पार्‍याचा रोगावर प्रयोग करण्यांत; दुसरा अर्थ :--- रतिक्रीडा करण्य़ांत.) मी अत्यंत निपुण आहे.”
ह्या ठिकाणीं, “विचारल्याशिवाय कुणाला (कांहीं) सांगू नये.” असा शिष्टाचार असल्यामुळें, (श्लोकांत) वैद्यानें स्वत: प्रतिज्ञेनें सांगितलेल्या गोष्टीवरून त्याला केलेल्या, ‘वैद्यबुवा, माझ्या रोगावर इलाज कराल कां हो ?’ या प्रकारच्या प्रश्नाचें अनुमान होएं. हा प्रश्न करणारी एक चतुर स्त्री (श्लोकांतील नायिका) आहे, ह्या विशिष्ट संदर्भावरून, त्यांतून संभोगेच्छारूपी खोल अर्थ सूचित होतो. आणि उत्तरातून सुद्धां संभोगरूपी अर्थ सूचित होतो.
ज्या उत्तरालंकाराच्या प्रकारांतील प्रश्न व उत्तर या दोहोंतही खोल अर्थ नाहीं, त्याचें  उदाहरण म्हणून ‘त्वमिव पथिक:’ इत्यादि श्लोक (मागें) दिलाच आहे.
ज्यांत प्रश्न अनुमित असतो अशा (उत्तरालंकरारा) चे हे प्रकार. अशाच रीतीनें (उत्तरालंकाराच्या) ज्या प्रकारांत प्रश्नही दिलेला असतो, त्यांचींही उदाहरणें देणें शक्य आहे. “किमिति कृशासि०” हा श्लोक प्रश्नयुक्त अलंकाराच्या चारी प्रकाराचें उदाहरण म्हणुन देतां येईल; फक्त त्यांतील बोलणार्‍या व्यक्ति (एकदा) चतुर आहेत व (एकदा) गांवढळ आहेत अशी व्यवस्था (कल्पना) करावी (म्हणजे झालें).
ह्या अलंकाराच्या बाबतींत कुणी असें म्हणतात :--- ‘ह्या अलंकाराचें प्रश्न, उत्तर, आणि अनेक वेळा येणे, हें मर्म आहे (प्राण आहे). कारण ती (प्रश्न व उत्तर) अनेक वेळा येण्यानेंच (काव्यांत) चमत्कार उत्पन्न होतो. तेव्हां एकच प्रश्न व त्याचें एकच उत्तर, ही या अलंकाराची भूमिका असूच शकत नाहीं.” यावर कुणी म्हणतील, ‘असें मानलें तर प्रश्न अनुमित असलेला उत्तरालंकाराचा प्रकार (तुमच्या) लक्षणांत बसणारच नाहीं. (म्ह० तो प्रकार उत्तरालंकारांत घालतांच येणार नाहीं.) कारण त्या प्रकरांत अनुमित झालेला प्रश्नही एकच, व त्याला दिलेलें उत्तरही एकच असणर. शिवाय तो प्रश्नही प्रत्यक्ष श्लोकांत नसणार.’ पण हें म्हणणें बरोबर नाहीं. कारण ह्या (‘उन्नीतप्रश्न’ या) प्रकाराच्या नांवांतल्या ‘उन्नीत’ ह्या शब्दाचा अर्थ (उत्तरावरून) ‘अनुमित’ असा आम्ही करीतच नाहीं; पण अनेक प्रश्न व अनेक उत्तरें यांच्या मालिकेंत, पूर्वी दिलेल्या उत्तरावरुन त्यापुढील प्रश्न ( उभा राहणें) उत्पन्न होणें हाच ‘उन्नीत’ या शब्दाचा अर्थ आम्हाला सांगावयाचा आहे.
उदाहरणार्थ :---
“तुझें जानवें काळें कशानें झालें आहे ?” “काजळ लागल्यानें” “तें कुठून लागलें ?” “तें (चंद्राच्या कन्येच्या म्ह०) नर्मदेच्या पाण्यांत (स्नान करतांना) लागलें.”  “तिचें पाणी काजळानें कसें भरलें ?” “क्रुद्ध झालेल्या नूरदीनबादशहाच्या शत्रूंच्या लक्षावधि स्त्रियांच्या सतत (वाहणार्‍या) (कज्जलयुक्त) अश्रुधारांनीं उत्पन्न झालेल्या नद्या, सगळीकडून, नर्मदेला मिळाल्यानें.”
ह्या श्लोकांत, ‘जानव्याला काळें कुठें लागलें ?’ हा प्रश्न, ‘काजळ लागल्यानें’ हें (पूर्वीं आलेलें) उत्तर ऐकल्यावर उत्पन्न झाला, म्हणून ह्या (उत्तरालंकाराच्या) प्रकाराला ‘उन्नीत’ (प्रश्न) असें (आम्ही) म्हणतों. ह्या उत्तरापूर्वीचा प्रश्न (‘श्यामं यज्ञोपवीतं किमिति’ हा० अनुमित नसला तरी (म्ह० श्लोकांत आला असला तरी) तो, पुढें येणार्‍या उत्तराला तयार करण्याकरतां (श्लोकांत) दिलेला आहे. म्हणजे या (वर दिलेल्या) मताप्रमाणें, (आम्ही म्ह० जगन्नाथानें) पूर्वीं दिलेलीं ‘उन्नीतप्रश्न’ या प्रकारचीं उदाहरणें (खरोखरीचीं) उदाहरणेंच नव्हेत. या नव्या मताप्रमाणें, या उत्तर अलंकाराचे दोन (मुख्य) प्रकार होतात खरे; पण ते (१) उन्नीत (म्ह० अनुमित) प्रश्न असणें व (२) प्रत्यक्ष श्लोकांत प्रश्न असणें [निबद्धप्रश्न] हे ते (दोन) प्रकार नव्हेत; परंतु (१) उन्नीतप्रश्न म्ह० [या मताप्रमाणें] पूर्वींच्या उत्तरांतून पुढील प्रश्न उत्पन्न होणें. व (२) प्रश्न उत्पन्न न होणें म्ह० प्रश्न, उत्तर - अशी स्वतंत्र परंपरा असणें, हे या अलंकाराचे [मुख्य] दोन प्रकार समजावें.
खरें सांगायचें म्हणजे :--- (वरील मताप्रमाणें, उत्तरालंकाराच्या दोन्हीही प्रकारांत अनेक वेळ प्रश्नोत्तरें आलीं पाहिजेत खरीं, पण आमच्या मतें) एक प्रश्न व एक उत्तर यांतही खोल अर्थ भरलेला असेल तर, त्याच्या योगानेंही चमत्कार होऊ शकेल. तेव्हां तीं प्रश्नोत्तरें अनेक वेळच आलीं पाहिजेत, असें नाहीं. पण प्रश्नोत्तरांत खोल अर्थ नसेल तर मात्र, निबद्धप्रश्न या प्रकारांत अनेक वेळ प्रश्नोत्तरें येण्यानेंच चमत्कार उत्पन्न व्हावा, अशी अपेक्षा आहे. पण आक्षिप्तप्रश्न (म्ह० उन्नीतप्रश्न) या प्रकारांत, प्रश्नाचें अनुमान केल्यानें चमत्कारर उत्पन्न होतो, असें सह्रदयांन वाटत असेल तर, त्या प्रकारांत, एकदांच प्रशोत्तर आल्यानेंही अलंकार होता, असें खुशाल मानावे.
दुसर्‍या एका द्दष्टीनेंही या अलंकाराचे अनेक प्रकार संभवतात :--- प्रथम (१) प्रश्न व त्याचें उत्तर दोन्हीही एकच पद्यांत असणें हा एक प्रकार व (२) प्रश्न व उत्तर यांपैकीं उत्तर पद्याबाहेर असणें असे दोन प्रकार होऊ शकतात. या पैकीं पुन्हा पहिल्या प्रकाराचे दोन पोटप्रकार :--- (१) एकाच वाक्यांत प्रश्न व त्याचें उत्तर असणें (२) निरनिराळ्या वाक्यांत प्रश्न व त्याचें उत्तर असणें हे.
याशिवाय एकाच पद्यांत येणारें उत्तर व पद्याचे बाहेर येणारें उत्तर या उत्तराविषयींच्या दोन्हींही प्रकारांत, (१) शब्दांचा एकच वेळ उच्चार करून दिलेलें उत्तर व (२) शब्दांचे अनेक वेळ उच्चार करून मिळणारें उत्तर (३) अनेक प्रश्नांचें एकच शब्दांत उत्तर सांगणें, व इतरही अनेक तर्‍हेनें होणारे अनेक प्रकार संभवतात. यांपैकीं केवळ नमुना म्हणून कांहीं उदाहरणें खालीं दिलीं आहेत :--- किं कुर्वते दरिद्रा: । (ह्या वाक्यांत प्रश्न व त्याचें उत्तर दोन्हींही आलीं आहेत.)
प्रश्न :--- दरिद्री लोक काय करतात ?
उत्तर :--- (किंकुर्वते दरिद्रा: । असा पदांत फेरफार करून) दरिद्री लोक (किम म्ह०) कुत्सित, खराब कृत्य करतात. (अथवा किम म्ह० कांहींतरी  क्षुल्लक गोष्ट म्ह० नोकरी करतात.)
का सारवती धरा मनोज्ञतरा ? (ह प्रश्न) कोणती जमीन जास्त किंमती व सुंदर (मानली जाते) ?
कासारवती धरा मनोज्ञतरा । (हें उत्तर; याच वाक्यांत) दोन पदें एकत्र करून, ‘तळें (कासार) असलेली जमीन जास्त सुंदर (मानतात).’
कोऽपावनस्त्रिलोक्याम ?।)  (हा प्रश्न) त्रैलोक्यांत अपवित्र कोण ?
कोपावनस्त्रिलोक्याम । (हें उत्तर -) क्रोध रक्षणारा (म्ह० बाळगणारा) त्रैलोक्यांत अपवित्र.

येथें रसगंगाधरांतील उत्तरालंकार प्रकरण  (अचानक)  बंद पडलें.  

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP