समुच्चय अलंकार - लक्षण ४

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


पण त्यांचें हें म्हणणें बरोबर नाहीं. कसें तें पहा :---
‘समुत्पत्ति:  पद्मारमण०’ ह्या श्लोकांत व  ‘पाटीरद्रुभुजंग०’ या श्लोकांत, समालंकार आहे,  असें कवीला सांगायचेंच नाहीं. श्रीहरीच्या नखापासून जन्म,  शंकराच्या जटेंत राहणें, पतितांना तारण्याची आवड, या तिघांचा आपापसांत संबंध मोठा योग्य आहे, असें कवीला ह्या ठिकाणीं मुळींच सांगायचें नाहीं; तर ‘भगवती भागीरथीचा उत्कर्ष करण्याकरतां ही तिन्हीं कारणें  सज्ज आहेत,’ हें कवीला येथें सांगायचें आहे; याचप्रमाणें, मलय पर्वतावरील वारा, आंब्याचें झाड व कोकिळ ह्या तिघांचा आपपसांत संबंध होणें ही गोष्ट फार योग्य आहे, असें कवीला सांगायचें नसून, हीं तिन्हीं या बालेचा प्राण घ्यायला अगदीं टपलीं आहेत, हें कवीला येथें सांगायचें आहे. असें मानलें तरच, हन्त (हाय हाय)   या पदानें सूचित केलेल्या खेदाची नीट उपपत्ति लागते. ह्या दुसर्‍या ठिकाणींही (म्ह० वारा, आंबा व कोकिळ यांच्या संबंधांतला) समालंकार कवीला पाहिजे असता तर त्या तिघांचा संबंध येणें योग्यच आहे, असा अर्थ होऊन, (हन्तपदानें सूचित केलेल्या) खेदाची उपपत्ति मुळींच लावता आली नसती.
आतां तुम्ही म्हणाल कीं, “बाला व तिला ठार मारायला ट्पलेलीं हीं तिर्‍हींही - ह्यांचा संबंध परस्परांना न शोभणारा आहे.” ह्या द्दष्टीनें येथें कवीला विषम अलंकारच इष्ट आहे; आणि तो तसा मानला कीं खेदाची उपपत्तीही (सहज) लावतां येते,” पण (ह्यावर आमचें म्हणणें हें कीं,)  हें तुमचें म्हणणें खरें मानलें तर मग, तिघांचा (त्या तीन अरमणीय पदार्थांचा)  संबंध योग्य आहे, अशा अर्थाचा समालंकार तर येथें मुळींच होणार नाहीं (असें तुम्हांलाही कबूल करावें लागेल)  आतां राहतां राहिला विषम; पण तोही व्हायला वरील तीन पदार्थांच्याहून (निराळा) बाहेरचा अंश जी बाला तिला घेतलें तरच (तुमचा) विषम अलंकार उभा राहू शकतो. तेव्हां (खरें सांगायचें म्हणजें,) या श्लोकांत (आमता) समुच्चय अलंकारच शुद्ध स्वरूपांत आहे. (त्याचा कुणाही दुसर्‍या अलंकाराशीं संकर नाहीं.)
त्याचप्रमाणें, ‘जीवितं मृत्युना०’ या श्लोकांतही, जीवित (वगैरे) मूळची रमणीय असून मृत्यू (वगैरें) नें ग्रस्त झाल्यामुळें अमरणीय झालीं असलीं तरी, त्यांना मृत्यू (वगैरे)  नें ग्रस्त झाल्यामुळें अमरणीय झालीं असलीं तरी, त्यांना मृत्यू (वगैरें) नें ग्रस्त झाल्यामूळें अमरणीय झालीं असलीं तरी, त्यांना मृत्यू (वगैरे) नें ग्रासून टाकणें योग्य नाहीं, असें कांहिं कवीला येथें सांगायचें नाहीं, कारण रमणीय वस्तु थोडाच वेळ टिकतात ही गोष्ट निसर्गाच्या सामान्य नियमानेंच सिद्ध होत असल्यानें व हें (म्ह० रमणीय वस्तु थोडाच वेळ टिकणें हें) कवीच्या इष्टाच्या विरुद्ध असल्यानें, ते कवींच्या मनांत शल्य उत्पन्न करायला करण झाले आहे. (इतकेंच येथें कवीला सांगायचें आहे.) असें असल्यानें, ह्या तिसर्‍या प्रकाराची (म्ह० रमणीय व अरमणीय ह्यांच्या संबंधाने होणार्‍या समुच्चयाच्या तिसर्‍या प्रकाराची) तो विषमाशीं संकीर्ण आहे म्हणून त्याला विषमच म्हणा, अशी वासतात लावतां येणार नाहीं. हें वर जें आम्ही विवेचन केले आहे त्यानें,
“चांगल्यांचा योग (संबंध) वाईटांचा योग व चांगल्यावाईटांचा योग झाला तरी, त्या तिघांही योगांना समुच्चयाचे तीन प्रकार मानूं नयेत; कारण सम व विषय यांचा (मुख समुच्चयाशीं) संकर मानल्यानेंच काम भागेल.” हें रत्नाकरांचें म्हणणें खंडित झालें. (असें समजावें.)  


येथें रसगंगाधरांतील समुच्चय प्रकरण संपलें.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP