कारणमाला अलंकार - लक्षण २

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


उदाहरणार्थ, पुढील प्राचीनांचें पद्य :---
“इंद्रियांचा जय करणें हें विनयाचें कारण आहे; विनयामुळें उत्कृष्ट गुण प्राप्त होतात. (उत्कृष्ट) अधिक गुणांनीं युक्त पुरुषावर लोक प्रेम करतात, व लोकांच्या प्रेमामुळें संपत्ति प्राप्त होते.”
“ह्या ठिकाणीं जितेंद्रियत्व हें विनयाचें कारण आहे.” असे ऐकून जितेंद्रियत्वाचें कारण काय असावें, अशीं, एकामागें एक कारण शोधण्याची अपेक्षा, हा एक प्रकार; अथवा, विनय कोणाचें कारण (म्ह० प्रथम विनयाचें कारण सांगून तो विनय कुणाचें कारण) अशी दुसरी अपेक्षा (अशी आकांक्षा) उत्पन्न होते; कारण या ठिकाणीं कारणच प्रथम शब्दानें सांगितलें आहे. ‘कारण तर कळलें पण याचें कार्य काय असावें बरें,’ अशी आकांक्षा कुठें कुठें उत्पन्न होते हें खरें; पण कार्यत्व आणि कारणत्व हे दोन संबंधी पदार्थ असल्यामुलें कारण ऐकू आल्यावर, एक संबंधी पदार्थाचे ज्ञानावर दुसर्‍या संबंधीचें ज्ञान अवलंबून असल्यानें, (म्ह० ‘एकसंबंधिज्ञानपरसंबंधिस्मारकं, या न्यायानें) येथें कारणाच्या ज्ञानावर कार्याचें ज्ञान अवलंबून असल्यानें कार्याची उपस्थिति होते, अशी या आकांक्षेची संगति लावता येईल. पण कारण ऐकून कार्याची उपस्थिति होणें ही गोष्ट सार्वत्रिक नव्हे. अशा रीतीनें, विनय कशाचें कारण अशी आकांक्षा उत्पन्न झाली असतां, ‘विनयापासून उत्कृष्ट गुण प्राप्त होतात’ असें वाक्य जरिइ वरील आकांक्षेची, तात्पर्यार्थाच्या द्दष्टीनें, परिपूर्ति करीत असलें तरी, साक्षात् वरील वाक्य आकांक्षेची पूर्ति करीत नाहीं. त्यामुळें हें वाक्य कानाला कसेंसेंच लागतें. त्याचप्रमाणें उत्कृष्ट गुणानें युक्त पुरुषावर लोक प्रेम करतात’ हें उत्तर, त्या आकांक्षेची पूर्ति तात्पर्याच्या द्दष्टीनें करीत असले तरी, साक्षात् वाक्यद्वारा करीत नाहीं.
अशा ठिकाणीं कथितपदत्व हा दोष तर होत नाहींच, तर उलट तोच अर्थ निराळ्या शब्दानें जर सांगितला गेला, तर नाटकांत दुसरा वेष घेणार्‍या नटाची ज्याप्रमाणें ओळख पटण्याला अडचण पडते त्याप्रमाणें, येथेंही, तोच अर्थ निराळ्या शब्दानें सांगितला गेल्यानें, विवक्षित अर्थाची सिद्धि निर्विधपणानें होत नसल्यामुळें, दोषच होईल. खरी गोष्ट अशी आहे कीं, एखाद्या शब्दापासून उपस्थित होणार्‍या अर्थांत ज्याप्रमाणें, त्या अर्थाचें प्रवृत्तिनिमित्त विशेषण म्हणून भासतें, त्याप्रमाणें त्या अर्थांत तो शब्दत सुद्धां विशेषण म्हणून भासतो. म्हटलेंच आहे कीं. “शब्दाच्या मागें गेल्यावांचून जगांत कोणतेंही ज्ञान होऊच शकत नाहीं.” त्या त्या शब्दांचा (म्ह०दोन शब्दांचा) विशिष्ट अर्थ बाह्य स्वरूपाच्या द्दष्टीनें, अगदीं एकसारखा असला तरी, तो अर्थ, त्यांना दिलेल्या (निरनिराळ्या) विशेषणांच्या योगानें अजिबात निराळा होतो, असें प्रत्ययाला येतें. उदा० :--- कुंड व गोलक या दोन शब्दांचा अर्थ. कुणी म्हणतील, “कुड, गोलक इत्यादि शब्दांत ‘नवरा जिवंत असतांना परपुरुषापासून विशेषणांनीं युक्त असे या (दोन) शब्दांचें प्रवृत्तिनिमित्त (कुंडत्व व गोलकत्व, अनुक्रमें) असल्यानें, त्यांचा निराळा अर्थ व्हावा हें योग्यच आहे; परंतु ताम्र, शोण, रक्त इत्यादि शाब्दांमध्ये, ताम्र, शोण, रक्त इत्यादि, पदें या नात्यानें (किंवा पदें म्हणून) आपापल्या अर्थांची विशिष्टता दाखविणारीं विशेषणें होत नसल्यानें, व त्या (तिन्ही पदांच्या) अर्थाचें विशिष्टत्व दाखविणारें विशेषण (म्हणजेच प्रवृत्तिनिमित्त), त्या तिघांचा एकच असणारा जो रक्तणुण त्याचा जातिविशेष म्ह० रक्तत्व हें एकच असल्यानें, त्या तिघांही शब्दांचा एकच अर्थ असल्याची प्रतीति होते.” यावर आमचें (म्ह० जगन्नाथाचें) उत्तर असें :--- तुमचें म्हणणें (वर वर पाहतां) खरें आहे; (पण)
‘सूर्य उगवतांना ताम्र (लाल) असतो, व ताम्र असूनच अस्ताला जातो. संपत्ति व विपत्ति ह्या दोन्हींही अवस्थांत मोठे लोक एकरुपच असतात.’
ह्या ठिकाणीं ताम्र ताम्र असा दोन्हीं ठिकाणीं एकच ताम्र सब्द आल्यानें, अर्थामध्यें ज्याप्रमाणें संपूर्ण एकरूपता प्रतीत होते त्याप्रमाणें, ‘उदेति सविता ताम्रो रक्त एवास्तमेतिच’ ह्या ठिकाणीं, ताम्र व रक्त हे दोन शब्द निरनिराळे असल्यामुळें, अर्थ संपूर्ण एकरूप वाटत नाहीं, ही सर्वांच्या अनुभवानें सिद्ध झालेली गोष्ट आहे. अशा रीतीनें अर्थाच्या प्रवृत्तिनिमित्त या विशिष्ट विशेषणाहून निराळें असें ‘शब्द’ हें (अर्थाचें आणखी एक) विशिष्टविशेषण (शक्यतावच्छेदक म्हणून), निश्चितच असेल; व (समानार्थक दोन निराळ्या शब्दांच्या) अर्थांत जो निराळेपणा दिसतो त्याची उपपत्ति, ‘शब्द हा अर्थाचे विशिष्टविशेषण असतो,’ असें मानल्यावांचून लागतच नसेल; आणि अनुभवाचे बलावरही, ‘शब्द हा अर्थाचे विशिष्ट - विशेषण असतो हें सिद्ध असेल तर, ह्या (ठाम सिद्धांता) ला अनुकूल अशीच शब्दाची व्युत्पत्ति (म्ह० शब्दाची अर्थबोधक शक्ति) कल्पिणें भाग आहे. ही शब्दाची शक्ति, वृत्तिसंबंधानें अथवा प्रतिपाद्यप्रतिपादक भावानें अथवा अभिधादि संबंधानें सामान्यत: कार्यकारणभावरूप असते. (म्ह० शब्दज्ञान हें कारण व अर्थोपस्थिति हें कार्य असा शब्द व अर्थ यांच्यांत सामान्य कार्यकारणभावरूप संबंध असतो.) या कार्यकारणभावरूप संबंधांत, अर्थविशिष्ट शाब्दज्ञान हें कारण व शब्दविशिष्ट अर्थाची उपस्थिति हें कार्य असतें. (हा झाला शब्द व अर्थ यांच्यांतील सामान्य स्वरूपाचा कार्यकारणभाव). परंतु जेव्हां शब्द व अर्थ यांच्यांतील विशिष्ट वृत्तिसंबंध सांगायचा असेल तेव्हां (उदा० घट वगैरे शब्दाचा अर्थ सांगायचा असेल अशा विशिष्ट स्थलीं) होणार्‍या शाब्दबोधांत घटत्व (वगैरे) प्रवृत्तिनिमित्त प्रकार (म्ह० विशेषण) असतो; व वृत्तिसंबंधानें घटत्वविशिष्ट पदार्थाचें ज्ञान हें त्या शाब्दबोधांत कारण असतें. व असा (सामान्यानंतरचा) विशेषरूप कार्यकारणभाव असतो, (कारण विशेषाला घेऊनच सामान्य हे जनक म्ह० कार्याचे जनक होऊ शकते) म्हणून असें करण्यांत कांहींही दोष नाहीं. अथवा (पदालाही अर्थोपस्थितीचें विशेषण मानून यापेक्षांही जास्त समर्पक शाब्दबोध असा :---) वृत्तिसंबंधानें (म्ह० प्रतिपाद्य - प्रतिपादकभावरूप संबंधानें घट वगैरे अर्थानें विशिष्ट घट वगैरे पदांचें ज्ञान हें कारण, व घट (वगैरे) पद व घटत्व वगैरे (प्रवृत्तिनिमित्त) हीं दोन्हीं ज्यांत विशेषणें आहेत, व घट वगैरे पदार्थ ज्यांत विशेष्य आहेत अशी जी उपस्थिति (म्ह० शाब्दबोध) हें कार्य, असा येथें कार्यकारणभाव मानावा. कारण कीं, पदार्थोपस्थिति ज्या स्वरूपाची असेल तत्समान स्वरूपाचा (आकाराचा) शाब्दबोध होत असल्यानें (प्रस्तुत स्थलीं) शाब्दबोधांतही (ताम्र वगैरे) पदांचें (विशेषणत्वानें) भान होईल. (आणि तेंच इष्ट आहे.) आतां विशेषणकोटींत पद हें प्रवृतिनिमित्ताच्या जोडींत घाटल्यानें गौरवदोष होतो असेंही म्हणतां येणार नाहीं’ कारण अनुभवाच्या बळावर व प्रमाणाला धरूनच हें सर्व केलें आहे. (म्हणूनच तें गौरवदोषरूप व प्रमाणाला धरूनच हें सर्व केलें आहे. (म्हणूनच तें गौरवदोषरूप नाहीं.) ह्या अभिप्रायानेंच म्हटलें आहे कीं, “न सोऽस्ति प्रत्ययो लोके.” अथवा वृत्तिसंबंधानें घटादिरूप शक्य अर्थानें विशिष्ट पदज्ञान हें कारण, व घटादि पद व घटार्थाचें प्रवृत्तिनिमित्त जें घटत्व हीं दोन्हीं ज्यांत विशेषणें आहेत असा घटरूप जो विशेष अर्थ त्याची उपस्थिति हें कार्य, अशा रीतीचा विशिष्ट प्रकारचा कार्यकारणभाव मानण्यांतही हरकत नाहीं. पदार्थाची उपस्थिति व शाब्दबोध हीं समान प्रकारानें होत असल्यानें शाब्दबोधांतही पदाचें विशेषण म्हणून भान मानलें पाहिजे, तसें मानणें हे अनुभवाचें असल्यानें ते प्रामाणिकच आहे, त्यांत गौरवरूपी दोष होत नाहीं. हें सर्व मनांत घेऊन, ‘न सोऽस्ति प्रत्यय:’ असें (भर्तृहरीनें) म्हटलें आहे.

येथें रसगंगाधरांतील कारणमाला प्रकरण समाप्त झालें.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP