मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|रसगंगाधर|विचित्र अलंकार| लक्षण २ विचित्र अलंकार लक्षण १ लक्षण २ विचित्र अलंकार - लक्षण २ रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे. Tags : grammerrasagangadharमराठीरसगंगाधरव्याकरण लक्षण २ Translation - भाषांतर ह्या ठिकाणीं लोकांना जीवरूपानें प्रत्यक्ष सिद्ध असलेला जो परमेश्वर, त्याच्या प्राप्तीकरितां दुसर्यांना प्रश्न करणें ही क्रिया वरवर अनुकूल भासणारी असली तरी ती वस्तुत: अनुकूल नाहीं. परमेश्वराच्या शोधाचें अनुकूल साधन म्हणजे ज्याचें त्याचें स्वत:चें ह्रदय; कारण ‘यत् साक्षाद परोक्षात्’ (जें ब्रम्हा प्रत्यक्ष डोळ्यांनीं दिसतें) असें श्रुतीचें वचन आहे. कोणी अशी शंका घेतील कीं, “यांत कारणाला (म्ह० इष्ट साधनाला) अयोग्य असें कार्य असतें; या द्दष्टीनें, या (विचित्र) अलंकाराला विषमाचा एक प्रकार म्हणावें.” पण हें म्हणणें बरोबर नाहीं; कारण विषम अलंकारांतील कार्याला पुरुषकृत प्रयत्नाची जरूर नसते. पण विचित्र अलंकारांत मात्र, कार्याकरतां पुरुषालाच प्रयत्न करावा लागतो. शिवाय विषमालंकारांत कार्य व कारण या दोहोंमधील गुणांचा निराळेपणा हा (या विषमाच्या) प्रकाराला कारण असतो. (विचित्र अलंकारांत इष्ट साधनाकरितां इष्टाच्या विरुद्ध कृति करणें हा विशिष्ट प्रकार असल्यामुळें, विषम व विचित्र हे दोन्ही अलंकार एकच आहेत असें म्हणतां येत नाहीं.) येथें रसगंगाधरांतील विचित्रालंकार हें प्रकरण समाप्त झालें. N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP