मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|रसगंगाधर|विरोधमूलक अलंकार| लक्षण २ विरोधमूलक अलंकार लक्षण १ लक्षण २ लक्षण ३ लक्षण ४ लक्षण ५ लक्षण ६ लक्षण ७ विरोधमूलक अलंकार - लक्षण २ रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे. Tags : grammerrasagangadharमराठीरसगंगाधरव्याकरण लक्षण २ Translation - भाषांतर आतां क्रमानें वरील विरोधालंकाराचीं उदाहरणें सांगतों :---“या सुंदरीला, फुलें बाणासारखीं वाटू लागलीं; कमळांचे देठ लोखंडासारखे कठिण वाटू लागले; पौर्णिमेची रात्र अग्नीप्रमाणें पेटली आहे असें भासूं लागलें; व घरांतलें आकाश समुद्रासारखें वाटू लागलें.” या ठिकाणीं फुलें व बाण या दोन जातींत विरोध आहे, कमळाचे देठ या जातीचा कठिण या गुणाशीं विरोध आहे. चांदण्या रात्रीचा, पेटणें या क्रियेशीं विरोध आहे; व समुद्र या जातीचा आकाश या द्रव्याशीं विरोध आहे; एवंच, हा श्लोक चार प्रकारच्या विरोधाचें उदाहरण. आहे)या ठिकाणीं जाति वगैरेंमध्यें प्रारंभी भासणारा विरोध, विरहिणीला दु:ख देणारे हे सर्व पदार्थ आहेत, या विचारानें शेवटीं नाहींसा होतो. उदाहरण दुसरें :---“हे राजा ! या पृथ्वीवर तूं पाहिला गेला असतां व तुझ्याकडून पाहिले गेले असतां (अनुक्रमें) मोठाले पदार्थ अणुसारखे व अणु अत्यंत मोठे भासतात” येथें अणुत्व या गुणाचा महत्व या गुणाशीं विरोध आहे. N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP