मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|रसगंगाधर|तुल्ययोगिता अलंकार| लक्षण ५ तुल्ययोगिता अलंकार लक्षण १ लक्षण २ लक्षण ३ लक्षण ४ लक्षण ५ तुल्ययोगिता अलंकार - लक्षण ५ रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे. Tags : grammerrasagangadharमराठीरसगंगाधरव्याकरण लक्षण ५ Translation - भाषांतर ह्या ठिकाणीं, उग्र व सौम्य या दोन रूपांनीं दोन ठिकाणीं एक धर्मान्वय होऊन होणारी एक तुल्ययोगिता, राजाविषयीं कवीला वाटणार्या रतीला उपस्कारक म्हणून, राहिली आहे. ज्या ठिकाणीं सर्व प्रकृत अथवा सर्व अप्रकृत अशा क्रियांचा, एकाच कारकाशीं अन्वय होतो तेथे, कारकतुल्ययोगिता होते. उदा० :---“ धन देण्याचे बाबतींत, यश धारण करण्याचे बाबतींत, शत्रूंचा संहार करण्याचे बाबतीत व सगळ्या पृथ्वीचें रक्षण करणाचे बाबातींत, तूं (एकटा) अत्यंत निपुण आहेस” (येथील सर्व क्रिया प्रस्तुत मानल्या तरच कारकतुल्ययोगिता होईल.)ह्या ठिकाणीं असलेल्या, राजाच्या स्तुतिपर वाक्यांत, प्रकृत क्रियांचा, कर्ता (राजा) ह्या एककारकरूपी साधारण धर्माशीं अन्वय होत असल्यानें त्या सर्व क्रियांचें आपापसांत साद्दश्य सूचित झालें आहे. अथवा (ह्याच कारकतुल्ययोगितेचें) हें दुसरें उदाहरण :---“वाईट बुद्धीला दूर करते; मन स्वच्छ करते; फारा दिवसांचें पाप (गटागट) पिऊन टाकते; प्राणिमात्राविषयींची दया वाढविते. (अशा रीतीनें) सज्जनांची संगति काय काय मंगल करीत नाहीं ?” येथें कारकतुल्ययोगिता अर्थान्तरन्यासानें युक्त आहे.“कुणी तुझें स्मरण करतात; कुणी तुझ्या मागून जातात; कुणी तुला पाहतात; कुणी पुण्यशाली पुरुष तुला स्पर्श करतात; विष्णूच्या चरणकमलांतील मध असणार्या हे आई गंगे ! (पण) ज्यांचें भाग्य थोर असे कांहींच फक्त तुला पितात.” ह्या ठिकाणीं गंगा हें एकच कर्म (हा कर्मरूपी एकधर्म) सर्व क्रियांना साधारण आहे.आतां व्यंग्य तुल्ययोगितेचें उदाहरण हें :---“सहजलीलेनें शिवधनुष्याच्या मोठेपणाला ज्यानें तोडून टाकलें आहे अशा हे रामचंद्रा ! अतुल धैर्य व बल असणार्या अशा तुझी कथा जेथें प्रकट होते तेथें, ज्याच्या पसरलेल्या फणेच्या एक कोपर्यावर पृथ्वी ठेवलेली आहे अशा शेषाची व कच्छपांच्या (कासवांच्या) कुलाचा चूडामाणि असलेल्या कूर्मावतारांतील भगवान् कच्छपाची तरी काय किंमत ?”ह्या ठिकाणीं ‘को वा,’ या शब्दांनीं वाच्य व लक्ष्याहून निराळ्या अशा, ‘काय किंमत,’ ह्या व्यंग्यार्थरूपी एक धर्माचा, शेष व कच्छप ह्या अप्रकृतांशीं अन्वय सूचित झाला आहे. (म्हणून ही व्यंग्य तुल्ययोगिता). येथें रसगंगधरांतील तुल्ययोगिता प्रकरण संपलें. N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP