मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत कर्ममेळांचे अभंग| अभंग १ ते ५ संत कर्ममेळांचे अभंग अभंग १ ते ५ अभंग ६ ते १० अभंग ११ ते १५ अभंग १६ ते २० अभंग २१ ते २७ संत कर्ममेळांचे अभंग - अभंग १ ते ५ संत कर्ममेळा हे संत चोखामेला यांच्या कुटुंबीयांपैकी एक होत. Tags : abhangkarmamelasantअभंगकर्ममेळासंत अभंग १ ते ५ Translation - भाषांतर १) अखंड तें मन ठेवलें चरणीं । आणिक तें ध्यानीं आहे माझे ॥१॥गोड गोजिरी विठोबाचीं पाउलें । सुखें म्यां ठेविलें मस्तकासी ॥२॥वायां तोंडपिटी करा कशासाठी । तुमची तो रहाटी कळों आली ॥३॥कर्ममेळा म्हणे लोटांगण पायीं । मागणे तें देई हेंचि एक ॥४॥२) आजिवरी धरली आस । परी मनीं झाली निरास ॥१॥आतां शरण जाऊं कवणा । तुजविण नारायणा ॥२॥दु:खसागरी लोटलें । कोण काढील वहिलें ॥३॥ म्हणे चोखियाचा कर्ममेळा । देवा येऊं द्या कळवळा ॥४॥३) आणिक वासना नाहीं दुजी मना । संतचरणीं जाणा मस्तक हें ॥१॥घालीन लोटांगण वंदीन पायधुळी । पूर्व कर्मा होळी होय तेणें ॥२॥नामाची आवडी सर्वकाळ वाचे । दुजें साधनचि नेणें कांही ॥३॥कर्ममेळा म्हणे ही माझी वासना । पुरवा नारायणा सर्वभावें ॥४॥४) आतां येथवरी । मज नका बोलूं हरी ॥१॥तुमचें आहे तुम्हा ठावें । माझें म्यांच करावें ॥२॥आमुच्या संचिता । तुम्हां बोल काय आतां ॥३॥माझें मन मज ग्वाही । वायां बोलिनियां काई ॥४॥कर्ममेळा म्हणे जाणा । तुमचें माझें नारायणा ॥५॥५) आपण वाढवावें आपण बुडवावें । ऐसी रिती बरवें तुमचे घरीं ॥१॥पाळिल्या पोसिल्या विसर पाडावा । समर्थाच्या नांवा लाज येते ॥२॥रंक मी भिकारी उच्छिष्ठाचा अधिकारी । काय भीड हरि माझी तुम्हां ॥३॥कर्ममेळा म्हणे पंढरीनिवासा । उगवा हा फांसा लवकरी ॥४॥ N/A References : N/A Last Updated : July 10, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP