वास्तुशांती - स्वस्ति पुण्याहवाचन

वास्तु्शांती म्हणजे वास्तु उभारताना यजमानाच्या हातून विविध चुका होतात किंवा दोष घडतात, त्यांची शांती. वास्तुपुरुषाची शांती नव्हे.

While entering a new house, as per the Vedic tradition, a Vastushanti homam (shanti) is performed, this acts as a remedy for whatever malific influences are present in the house and removes the vastu doshas.


मंगलार्थं स्वस्ति पुण्याहवाचन

आकृतीत दाखविल्या प्रमाणे पुण्याहवाचनासाठी दोन कलश मांडावेत. ( चांदीचे, तांब्याचे, अन्य कोणतेही ) कलशात पाऊण तांब्या भरुन पाणी, त्यात, गंध, अक्षता, फुले, दूर्वा, बेल, तुळस, पंचपल्लव, पैसे, सुपारी वाहून ठेवावीत ( एक पळी पंचगव्य वाहावे. ) शुभ कार्याच्या वेळी २ कलश मांडावेत.

कलशाच्या बाहेरच्या बाजूस लाल गंधाच्या उभ्या रेषा ५ ठिकाणी ओढाव्यात. डेख, आत करुन आंब्यांचा टहाळा ठेवावा कलशामध्ये वरुणाचे आवाहन केल्यावर नारळाची शेंडी वर राहील अशा पद्धतीने कलशावर नारळ ठेवावे कलशाच्या मागे कापड ठेवावे. कलशाला किंवा नारळाला जानवे वाहावे. किंवा ( वाटीत तांदूळ ठेवून त्यावर सुपारी मांडून वरुण पूजन करण्याची प्रथा आहे. ) कोणताही उपचार प्रथम उजवीकडे नंतर डावीकडे वाहावा.

दोनही कलशाची ( वरुणाची ) स्थापना व पूजा एकाचवेळी करावयाची आहे. आपले दोन्ही हात उताणे करुन कराग्रांनी भूमीला स्पर्शकरुन भूमीची प्रार्थना करावी.

प्रत्येक मंत्राच्या आरंभी ॐ म्हणावा -

कर्त्याने आपले दोनही हात उताणे करुन आपल्यासमोर कलश मांडलेल्या पाटाजवळ कराग्रांनी भूमीला स्पर्श करावा.

मंत्रावृत्यादक्षिणोत्तरतोभूमिंस्पृष्टा ॥

( प्रत्येक मंत्र दोन वेळा म्हणावा. ) व्यवहारात एकदाच म्हणतात.

ॐ महीद्यौः पृथिवीचन इमंयज्ञंमिमिक्षतां ॥
पिपृतां नोभरीमभिः ॥

कर्त्याने आपलेद दोनही हात उताणे करुन कराग्रांनी धान्यराशींना स्पर्श करावा.

ॐ ओषधयः संवदंतेसोमेनसहराज्ञा ॥
यस्मैकरोतिब्राह्मणस्त राजन्पारयामसि ॥

कर्त्याने उताण्या हातांनी कलशांना स्पर्श करावा.

ॐ आजिघ्रकलशंमह्युरुधारापयस्वत्यात्वाविशंत्विंदवः समुद्रमिवसिंधवः सामासहस्त्र आभज प्रजयापशुभिःसहपुनर्माविशताद्रयिः ॥

कर्त्याने १ / १ पळी पाणी ( अगोदर दक्षिणेकडील नंतर उत्तरेकडील ) कलशात वाहावे. ( या नंतरचा प्रत्येक उपचार वाहताना हाच क्रम ठेवावा. )

ॐ इमंमेगंगेयमुनेसरस्वतिशुतुद्रिस्तोम सचतापरुष्णिया ॥ असि क्नियामरुद्धधेवितस्तयार्जीकीयेश्रृणुह्यासुषोमया ॥

दोनहीद कलशात गंध, अक्षता, फूल वाहावे.

ॐ गंधद्वारांदुराधर्षांनित्यपुष्टांकरीषिणीं ॥ ईश्वरी सर्वभूतानांतामिहोपह्वयेश्रियं ॥

दोनही कलशात दूर्वा वाहाव्यात.

ॐ कांडात्कांडात्प्ररोहंतीपरुषः परुषः परि ॥ एवानो दूर्वेप्रतनुसहस्त्रेणशतेनच ॥

१) पंचपल्लव - पिंपळ, उंबर, प्लक्ष, वड, आंब्याची प्रत्येकी १/१ पाने.
१ पंचपल्लव कलशांमध्ये ठेवावेत. ( पंचपल्लव नसल्यास आंब्याचा टहाळा डेख कलशात बुडवून ठेवावा. )

ॐ अश्वत्थेवोनिषदनंपर्णेवोवसतिः कृता ।
गोभाज इत्किलासथयत्सनवथपूरुषं ॥

प्रत्येक कलशात सुपारी वाहावी.

ॐ याः फलिनीर्याअफलाअपुष्पायाश्चपुष्पिणीः ।
बृहस्पतिप्रसूतास्तानोमुंचंत्व हसः ॥

दोनही कलशात ( सुवर्ण ) व्यावहारिद्रव्य अर्पण करावे. ( ५ रु. /१ रु. )

ॐ अग्नेरेतश्चद्र हिरण्यं ॥ अदभ्यः संभूतममृतंप्रजासु ॥ तत्संभरन्नुत्तरतोनिधाय ॥ अतिप्रयच्छनदुरितिंतरेयं ॥

कलशात पंचरत्ने वाहावीत ( सुवर्ण, रजत, मोती, हिरा, प्रवाळ ) / नसल्यास अक्षता वाहाव्यात.

ॐ बृहस्पते जुषस्वनोहव्यानि विश्वदेव्या ॥ रास्वरत्नानिदाशुषे ॥

कलशाभोवती / जवळ वस्त्र वाहावीत. ( ठेवावीत. )

ॐ युवासुवासाःपरिवीत आगत्स उश्रेयान्भवतिजायमानः ॥ तंधीरासःकवय उन्नयंतिस्वाधियोमनसादेवयंतः ॥

दोनही कलशावर वाटीत / लहान ताम्हनात, तांदूळ ठेवून मधोमध १, १, सुपारी ठेवावी / नारळाची शेंडी वर राहील अशा पद्धतीने नारळ ठेवावेत.

ॐ पूर्णादर्विपरापतसुपूर्णापुनरापत ॥ वस्नेवविक्रीणावहाइषमूर्ज शतक्रतो ॥

पूर्णपात्रातील दोनही सुपार्‍यांवर व कलशांवर वरुणाचे आवाहन करावे.

ॐ तत्त्वायामिब्रह्मणावंदमानस्तदाशास्तेयजमानोहविर्भिः ॥ अहेडमानोवरुणेहबोध्युरुश समान आयुः प्रमोषीः ॥ ॐ भूर्भुवःसुवः । अस्मिन्कलशे वरुणाय नमः । वरुणंसांगंसपरिवारंसायुधंसशक्तिकमावाहयामि ॥

यानंतर दक्षिणेकडून उत्तरेकडे अशी दोनही वरुणांची पूजा करावयाची आहे. ( फक्त उत्तरेकडील वरुणाची पूजा करण्याची प्रथा आहे. )

ॐ भूर्भुवःसुवः वरुणाय नम्ह ।

या मंत्राने, गंध, अक्षता, हळद, कुंकू, फुले, दूर्वा, तुळस, बेल, धूप, दीप, नैवेद्य, विडा, दक्षिणा, फळ अर्पण करावे. मंत्रपुष्प, ॐ तत्त्वायामिब्रह्मणा ० या मंत्राने, मंत्रपुष्पार्थे अक्षतान् समर्पयामि उदक सोडावे -

अनेन कृतपूजनेन वरुणः प्रीयताम् ।

कर्त्याने दोनही कलशांना आपल्या कराग्रांनी स्पर्श करावा.

कलशस्यमुखेविष्णुः कंठेरुद्रः समाश्रितः ॥
मूलेतत्रस्थितोब्रह्मामध्येमातृगणाः स्मृताः ॥
कुक्षौतुसागराः सर्वेसप्तद्विपावसुंधरा ॥
ऋग्वेदो थयजुर्वेदऋग्वेदोः सामवेदोह्यथर्वणः ॥
अंगैश्चसहिताः सर्वेकलशंतुसमाश्रिताः ॥
अत्रगायत्रीसावित्रीशांतिः पुष्टिकरीतथा ॥
आयांतुममशांत्यर्थंदुरितक्षयकारकाः ॥
सर्वेसमुद्राः सरितस्तीर्थानिजलदानदाः ॥
आयांतुममशांत्यर्थंदुरित क्षयकारकाः ॥

कर्त्याने उत्तरेकडील कलशावर आपल्या पूर्वजांचे स्मरण करीत पाच वेळा अक्षता वाहाव्यात. नंतर गुरुजींच्या मस्तकावर अक्षता वाहाव्यात.

मातृदेवोभव ॥ पितृदेवोभव ॥ आचार्यदेवोभव ॥ अतिथिदेवोभव ॥ सर्वेभ्योदेवेभ्यःनमः ॥ सर्वेभ्योब्राह्मणेभ्योनमोनमः ॥ अवनिकृतजानुमंडलःकमलमुकुलसदृशमंजलिंशिरस्याधाय,

कत्याने स्वतःच्या आसानाच्या मागे सरकून आपले गुडघे जमिनीवर टेकावेत. नंतर आपले दोनही हाताचे तळवे एकमेकांसमोर करुन दोनही अंगठे व करंगळी एकमेकांना टेकवून ( उमलल्या कमळाचा आकार करुन मनगटे स्वतःच्या कपाळाला टेकवावीत. त्यानंतर आसनावर बसावे.

उत्तरेकडील कलश उचलून पत्नीच्या, नंतर स्वतःच्या मस्तकी लावावा ( कपाळाला टेकवावा ) पाटावर टेकवावा व गुरुजींनी आशीर्वाद द्यावा, म्हणून त्यांची प्रार्थना करावी. ही कृती तीन वेळा करुन नंतर कलश होता तेथे ठेवावा.

दक्षिणेनपाणिना, सुवर्णपूर्णकलशंधारयित्वाऽऽशिषः प्रार्थयन्ते ॥ प्रार्थनामह ।

एताःसत्याआशिषःसंतु ॥ दीर्घानागानद्योगिरयस्त्रीणिविष्णुपदानिचतेनायुः प्रमाणेनपुण्याहंदीर्घमायुरस्तु ॥ इति भवन्तः ब्रुवन्तु ।

गुरुजींनी म्हणावे -

दीर्घानागा नद्यो ० दीर्घमायुरस्तु ।

यानंतर कर्त्याने, गुरुजींच्या हातावर पळीने पाणी वाहावे, नंतर गंध अक्षता फूल, विडा, दक्षिणा देऊन नमस्कार करावा.

कर्त्याने म्हणावे                   गुरुजींनी म्हणावे.

शिवाआपःसंतु ।                    संतुशिवाआपः ॥
सौमनस्यमस्तु ।                  अस्तुसौमनस्यं ॥
अक्षतं चारिष्टंचास्तु ।             अस्त्वक्षतमरिष्टंच ॥
गंधाःपांतुः ।                          सुमंगल्यंचास्तु ॥
अक्षताःपांतु ।                        आयुष्यमस्तु ॥
पुष्पाणिपांतु ।                       सौश्रियमस्तु ॥
तांबूलानिपांतु ।                     ऐश्वर्यमस्तु ॥
दक्षिणाःपांतु ।                       बहुदेयंचास्तु ॥

दीर्घमायुः श्रेयः शांतिः पुष्टिस्तुष्टिश्वास्त्विति भवंतः ब्रुवंतु ।

गुरुजींनी म्हणावे

दीर्घमायुः श्रेयः शांतिः पुष्टिस्तुष्टिश्चास्तु ॥

कर्ता - श्रीर्यशो, विद्याविनयोवित्तंबहुपुत्रंचायुष्यंचास्तु इति भवंतः ब्रुवंतु ॥

गुरुजींनी म्हणावे

श्रीर्यशोविद्याविनयोवितंबहुपुत्रंचायुष्यं चास्तु ॥

कर्त्याने म्हणावे

यंकृत्वासर्ववेदयज्ञक्रियाकरणकर्मारंभाः
शुभाः शोभनाः प्रवर्तंते ॥
तमहमोंकारमादिंकृ त्वाऋग्यजुः सामाशीर्वचनं
बह्रषिमतंसंविज्ञातं भवद्भिरनुज्ञातः
पुण्यंपुण्याहंवाचयिष्ये ॥

गुरुजींनी म्हणावे - वाच्यताम् ॥

कर्त्याने हात जोडून बसावे । गुरुजींनी स्वस्तिमंत्र म्हणावेत. कर्त्याच्या मस्तकावर अक्षता वाहाव्यात.

ॐ भद्रंकर्णेभिः शृणुयामदेवाः । भद्रंपश्येमाक्षभिर्यजत्राः ॥
स्थिरैरंगैस्तुष्टुवा सस्तनूभिः व्यशेमदेवहितंयदायुः ॥
ॐ द्रविणोदाद्रविणसस्तुरस्यद्रविणोदाः सनरस्यप्रयंसत् ॥
द्रविणोदावीरवतीमिषन्नोद्रविणोदारासतेदीर्घमायुः ॥
ॐ सवितापश्चातात्सवितापुरस्तात्सवितोत्तरात्तात्स विताधरात्तात् ॥
सवितानः सुवतुसर्वतातिंसवितानोरासतांदीर्घमायुः ॥
ॐ नवोनवोभवतिजायमानोह्नांकेतुरुषसामेत्यग्रं ॥
भागंदेवेभ्योविदधात्यायन्प्रचंद्रमास्तिरतिदीर्घमायुः ॥
ॐ उच्चादिविदक्षिणावंतोअस्थुर्येअश्वदाः सहतेसूर्येण ॥
हिरण्यदाअमृतत्वंभजंतेवासोदाः सोमप्रतिरंताआयुः ॥
ॐ आप उंदंतुजीवसेदीर्घायुत्वायवर्चसे ॥
यस्त्वाह्रदाकीरिणामन्यमानोमर्त्यंमर्त्योजोह वीमि ॥
जातवेदोयशोअस्मासुधेहिप्रजाभिरग्नेअमृतत्वमश्यां ॥
यस्मैत्व सुकृतेजातवेद उलोकमग्नेकृणवः स्योनं ॥
अश्विन सपुत्रिणंवीरवंतंगोमंत रयिंनशतेस्वस्ति ॥
ॐ संत्वासिंचामियजुषाप्रजामायुर्धनंच ॥
व्रतनियमतपः स्वाध्यायक्रतुदमदानविशिष्टानां ब्राह्मणानांमनःसमाधीयंतां ॥

गुरुजींनी म्हणावे - समाहितमनसः स्मः ॥

कर्त्याने म्हणावे - प्रसीदंतुभवंतः ॥

गुरुजींनी म्हणावे - प्रसन्नाः स्मः ॥

कर्त्याने उत्तरेकडील वरुण कलशातील १ पळीभर पाणी काढून ते पूजेला घेतलेल्या कलशात घ्यावे. फुलपात्र भरुन ठेवावे. पळीने फुलपात्रातील पाणी आपल्या उजव्या हातावरुन डावीकडील ताम्हनात सतत समोर सोडावे. ( अन्य गुरुजींनी प्रत्येक वेळी " अस्तु " असे म्हणावे. ) पतीच्या उजव्या हाताला पत्नीने आपला उजवा हात स्पर्श करुन ठेवावा.

शांतिरस्तु ॥ पुष्टिरस्तु ॥ तुष्टिरस्तु ॥ वृद्धिरस्तु ॥ अविघ्नमस्तु ॥ आयुष्यमस्तु ॥ आरोग्यमस्तु ॥ शिवंकर्मास्तु ॥ कर्मसमृद्धिरस्तु ॥ धर्मसमृद्धिरस्तु ॥ वेदसमृद्धिरस्तु ॥ शास्स्त्रसमृद्धिरस्तु ॥ पुत्रसमृद्धिरस्तु ॥ धनधान्यसमृद्धिरस्तु ॥ इष्टसंपदस्तु ॥

पुढील दोन वाक्यांनी उजवीकडील ताम्हनात समोर पाणी सोडावे. या वेळी पतीच्या हाताला पत्नीने हात लावू नये.

॥ सर्वारिष्टनिरसनमस्तु ॥ यत्पापंतत्प्रतिहतमस्तु ॥

यानंतर डावीकडील ताम्हनात समोर पाणी सोडावे.
पत्नीने पतिच्या उजव्या हाताला स्पर्श करावा.

यच्छ्रेयस्तदस्तु ॥ उत्तरेकर्मण्यविघ्नमस्तु ॥ उत्तरोत्तरमहरहरभिवृद्धिरस्तु ॥ उत्तरोत्तराः क्रियाः शुभाः शोभनाः संपद्यंतां ॥ इष्टाः कामाः संपद्यंतां ॥ तिथिकरणमुहूर्तनक्षत्रसंपदस्तु ॥ तिथिकरणमुहूर्त नक्षत्रग्रहलग्नाधिदेवताः प्रीयंतां ॥ तिथीकरणे मुहूर्त नक्षत्रेसग्रहेसदैवतेप्रीयेतां ॥ दुर्गापांचाल्यौप्रीयेतां ॥ अग्निपुरोगाविश्वेदेवाः प्रीयंतां ॥ इंद्रपुरोगामरुद्गणाः प्रीयंतां ॥ ब्रह्मपुरोगाः सर्वेवेदाः प्रीयंतां ॥ विष्णुपुरोगाः सर्वेदेवाः प्रीयंतां ॥ माहेश्वरीपुरोगा उमामातरः प्रीयंतां ॥ वसिष्ठपुरोगाऋषिगणाः प्रीयंतां ॥ अरुंधतीपुरोगाएकप त्न्यः प्रीयंतां ॥ ऋषयश्छंदांस्याचार्यावेदादेवायज्ञाश्चप्रीयंतां ॥ ब्रह्मचब्राह्मणाश्चप्रीयंतां ॥ श्रीसरस्वत्यौ प्रीयेतां ॥ श्रद्धामेधेप्रीयेतां । भगवतीकात्यायनीप्रीयंतां ॥ भगवतीमाहेश्वरीप्रीयतां ॥ भगवती पुष्टीकरी प्रीयतां  भगवतीतुष्टिकरीप्रीयतां ॥ भगवतीऋद्धिकरीप्रीयतां ॥ भगवतीवृद्धिकरीप्रीयतां ॥ भगवंतौविघ्नविनायकौप्रीयेतां ॥ भगवान्त्स्वामीमहासेनः सपत्नीकः ससुतः सपार्षदः सर्वस्थानगतः प्रीयतां ॥ हरिहरहिरण्यगर्भाः प्रीयंतां ॥ सर्वाग्रामदेवताः प्रीयंतां ॥ सर्वाः कुलदेवताः प्रीयंतां ॥ सर्वावास्तु देवताः प्रीयंतां ॥

पुढील सात वाक्यांनी उजवीकडील ताम्हनात समोर पाणी सोडावे. यावेळी पतीच्या हाताला, पत्नीने स्पर्श करु नये.

१. अन्य गुरुजींनी प्रत्येक वाक्यानंतर " हताः " म्हणावे.

हताब्रह्मद्विषः ॥ हताः परिपंथिनः ॥
हताअस्यकर्मणोविघ्नकर्तारः ॥ शत्रवः पराभवंयांतु ॥ शाम्यंतुघोराणि ॥ शाम्यंतु पापानि ॥ शाम्यंत्वीतयः ॥

यानंतर डावीकडील ताम्हनात समोर पाणी सोडावे. पत्नीने पतीच्या उजव्या हाताला स्पर्श करावा.

( अन्य गुरुजींनी अस्तु म्हणावे. )

शुभानिवर्धंतां ॥ शिवाआपः संतु ॥ शिवाऋतवः संतु ॥ शिवाअग्नयः संतु ॥ शिवाआहुतयः संतु ॥ शिवाओषधयः संतु ॥ शिवावनस्पतयः संतु ॥ शिवाअतिथयः संतु ॥ अहोरात्रेशिवेस्यातां ॥ निकामेनिकामेनः पर्जन्योवर्षतुफलिन्योनओषधयः पच्यंतांयोगक्षेमोनः कल्पतां ॥ शुक्रांगारकबुधबृहस्पतिशनैश्वरराहुकेतुसोमसहिताआदित्यपुरोगाः सर्वेग्रहाः प्रीयंतां ॥ भगवान्नारायणः प्रीयणां ॥ भगवान्पर्जन्यः प्रीयतां ॥ भगवान्त्स्वामीमहासेनः प्रीयतां ॥ पुण्याहकालान्वाचयिष्ये ॥

गुरुजींनी म्हणावे - वाच्यतां ॥

कर्त्याने व पत्नीने नमस्कार करुन बसावे. गुरुजींनी कार्य करावयास बसलेल्या व्यक्तींच्या मस्तकावर अक्षता वाहाव्यात.

ॐ उद्गातेवशकुनेसामगायसिब्रह्मपुत्र इवसवनेषुशंससि ॥ वृषेववाजीशिशुमतीरपीत्यासर्वतोनः शकुनेभद्रमावदविश्वतोनः शकुनेपुण्यमावद ॥ याज्ययायजतिप्रत्तिर्वैयाज्याः पुण्यैवलक्ष्मीः पुण्यामेवतल्लक्ष्मींसंभावयतिपुण्यांलक्ष्मींसंस्कुरुते ॥

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP