मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्री विष्णुदासांची कविता|स्फुट कविता| मागणी स्फुट कविता गुरुचें पद श्रीगुरुस्तवन सांप्रदायिक प्रार्थना मागणी आत्मकथनपर पोवाडा स्फुट कविता - मागणी श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा. Tags : kavyapoemvishnudasकविताकाव्यपदमराठीविष्णुदास मागणी Translation - भाषांतर ( वृत्त : मालिनी ) ऋतुशिल जलवृष्टी, तुष्टिपुष्टी असों दे ।सुखमय करि सृष्टी, दुःख दृष्टी नसों दे ।हरि - हर - परमेष्ठी, पृष्ठिं रक्षोत मागें ।जयजय जय वंदे, मातरं - मातरं गे ॥१॥हरशिल भय चिंता, संकटें माउली तूं ।करिशिल स्वकरांची, सर्वदा साउली तूं ।म्हणवुन गुण गायी, विष्णुस्वामी अभंगे ।जयजय जय वंदे, मातरं - मातरं गे ॥२॥( वृत्त : वसंततिलका )शक्ती असो जग - हितास्तव अंगिं बाकी ।यावीण कांहिं नलगे, मजलागि बाकी ।हे विष्णुदास विनवी, मृगराज - यानी ।तूं एकवेळ तरि दर्शन दे भवानी ॥३॥बोल भवानी की जयश्रीदत्त महाराज की जय !!श्रीसदगुरुनाथार्पणमस्तु N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP