षष्ठः स्कंध - अध्याय तिसरा

श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.


श्रीगणेशायनमः । नृपम्हणेमुनिराया । अदभुत असेमहामाया । सुखदुःखमोहमाया । देवांकेवींव्यापीतसे ॥१॥

शंभरयज्ञजेणेंकेले । इंद्रपदप्राप्तझालें । पुनःपुनःतेभ्रंशले । कारणकायसांगिजे ॥२॥

व्यासम्हणेनृपति । गहनजाणकर्मगती । संचितकर्मनिश्चिति । फळायेतेंमध्येमध्यें ॥३॥

क्षयनसेंचिकर्माचा । भोगणेंअवश्यत्रिवाचा । कर्मक्षयींजन्मकैचा । देहधारणनसेची ॥४॥

दहधारणजेथेंझालें जाणकर्मतेथेंसंचलें । अवश्यपाहिजेभोगिलें । ब्रम्हादिकांचुकेना ॥५॥

पूर्वींचेंजेंसंचित । पुढेंतैसेंचिकरवीत । पापपुण्य अवघेकरीत । देवमानवराक्षस ॥६॥

सुंदरबलिष्टधीर । धनीविद्वान्गुणगंभीर । देवांशम्हणावातोनर । पूर्वकर्मेंफळतींत्या ॥७॥

श्लोक । नाऋषिःकुरुतेकाव्यं । नारुद्रोरुद्रमर्चती । नादेवांशोददात्यन्न । नाविष्णूः पृथिवीपतिः ॥१॥

अर्थ । काव्यकरीजोनर । पूर्वजन्मीतोऋषिवर । काव्यकर्णेसाचार । ऋषीवांचूननघडेतें ॥८॥

जोरुद्रार्चनकरी । पूर्वींतोरुद्रनिर्धारी । रुद्रनसतांजन्मांतरी । रुद्रार्चननकरीतो ॥९॥

पूर्वींजोदेव असे । तोचिअन्नदेतसे । अन्नदानजेथेंनसे । देवांशनाहींजाणिजे ॥१०॥

विष्णुअंशावांचून । नमिळेंकदानृपासन । पुर्वकर्माचीओळखण । जाणाएवंसर्वत्र ॥११॥

पूवेंकृतपापपुण्य । अवश्यलागतींभोगणें । गतीत्यांचीकोणजाणें । महामायेवांचुनी ॥१२॥

रावम्हणेभूभार । हरायाकृष्णावतार । दुष्टपापीजारचोर । कांनहरिलेंश्रीकृष्णें ॥१३॥

व्याससांगेनृपती । ज्यायुगाचीजैशींस्थिती । प्रजातैशाचिवाढती । अन्यथाकेवींघडेल ॥१४॥

जेअसतींधर्मरत । तेकृतींउपजत । धर्मार्थींजेरत । त्रेतामाजीजन्मती ॥१५॥

धर्मार्थकामीप्रीती । द्वापरीतेजन्मायेती । अर्थकामचीजाणती । कलियुगींयेतीते ॥१६॥

कृतयुगीचेजेनर । धर्म आचरुनिनिरंतर । देवलोकींसुखविहार । चारीवर्णकरिताती ॥१७॥

सत्यदयाआणिदान । समत्वस्वदारगमन । धर्माचारसाधारण । करुनीस्वर्गभोगिती ॥१८॥

तैसेजनद्वापरों । कलींमाजीदुराचारी । नरकामाजीनिर्धारी । पडतींयावद्विपर्यय ॥१९॥

कृतयुग आरंभकाली । स्वर्गांतूनिपुण्यशाली । जन्मघेतींउत्तमकुळीं । स्वकर्मसूत्रबंधनें ॥२०॥

कलींमाजीनरकांतून । प्राणीसर्वजन्मायेऊन । पुनःपापसांठवून । नर्कीजातींभोगाया ॥२१॥

दैवयोगेंकलींत । जेधर्मासीआचरीत । द्वापारींतयाजन्मयोत । त्रेतामाजीकृतयुगी ॥२२॥

नृपम्हणेयुगरीती । सांगाकवींवर्तती । व्याससांगेयुगस्थिती । सावधानपरिशीजे ॥२३॥

कृतयुगीचेंवर्तन । विप्रकरितीवेदाध्ययन । गायत्रीचेंसेवन । मायाबीजजपतीते ॥२४॥

परांबिकेचेंपूजन । वेदत्रयाचेंअनुष्टान । सत्यशौचदयाज्ञान । ब्राम्हणसर्वब्रम्हनिष्ठ ॥२५॥

क्षत्रियतेनीतिमान । धर्माचेकरितींरक्षण । पुत्रवतप्रजापोषण । करितीनित्यविप्रसेवा ॥२६॥

कृषिगोरक्षणव्यापार । वैश्यकरितींनित्यनुसार । विप्रसेवानिरंतर । शूद्रकरितींसत्ययुगीं ॥२७॥

येतायुगींकांहींनून । द्वापारीकमीत्याहून । कलियुगाचेंवर्तन । सांगतोऐकनृपाळा ॥२८॥

पूर्वयुगीजेराक्षस । तयेतीविप्रजन्मास । वाढावतीपाखंडास । वेदोक्तसर्वबुडविती ॥२९॥

बहुधासर्वविप्रजाती । मुर्खसर्वनिपजती । धर्मकर्मतेनेणती । शिश्नोदरपरायण ॥३०॥

कोणीजाहलाविद्वान । सवेचिवाढेअभिमान । करीसर्वांचाअपमान । कर्मतयासीनावडे ॥३१॥

पूर्वीचेंनमानीवचन । भलतेंचिस्थापींबळान । मुर्खसर्वकरितीग्रहण । सशास्त्रयुक्तजाणुनी ॥३२॥

कोणीनिपजलाकर्मट । फळाशाजडेंबळकट । यथार्थनोहेकर्मदुर्घट । पापमात्रसांठवें ॥३३॥

दोषसांगेपराशी । आपणस्वयेपापराशी । परीमानीपुण्यराशी । आहोऐसेंमानितो ॥३४॥

मुखेंबोलेदिव्यनीती । स्वयेकरीअनीति । परधनावरीप्रीती । परदाराआवडे ॥३५॥

वरीकेलीदिव्यरचना । तपस्वीदिसेसर्वजना । परीअंतरीविवंचना । लागलीसेंधनाची ॥३६॥

ठकवीलोकनानापरी । गोष्टीसांगेपरोपरी । कलियुगींपातकाचारी । एवंविप्रसर्वत्र ॥३७॥

दंभाचारटिळेमाळा । भस्भचर्चीवस्त्रनिर्मळा । यज्ञसूत्रशोभेंगळां । परीगायत्रीनजपेची ॥३८॥

लौकिककरीरक्षण । अंतरीअतीमळीण । गुप्तकरीपापाचरण । अनृतसदाजिव्हेसी ॥३९॥

कन्यारसवेदविक्रय । ब्राम्हणकरीपापह्रदय । धनलोभेनिर्भय । अधमसेवीअंधळा ॥४०॥

नकोसंध्यानकोस्नान । कैंचातेथेंब्रम्हयज्ञ । वैश्वदेवनापूजन । भोजनमात्रटळेना ॥४१॥

याचकपाहतांनयनीं । वाटेंसमस्तझालीहानी । दुष्टवाक्येंकरुनी । अतिथ्यकरीचांडाळ ॥४२॥

स्त्रीपाहतांचिसुंदर । प्रसन्नहोय अंतर । नानायत्नदुराचार । भोगूंपाहेसवर्था ॥४३॥

परद्रव्याचाअपहार । करीतसेनिरंतर । नानाछलयत्नथोर । करिसर्वदादुरात्मा ॥४४॥

स्वयेचतुरजाणवी । परदोषातप्रेमटवी । स्वदोषास्वयेलपवी । मानरक्षीआपुला ॥४५॥

मातापितागुरुज्येष्ट । यासीछळी पिष्ठ । स्त्रीवश्यहोनष्ठ । आज्ञांकितसर्वदा ॥४६॥

गुरुहोऊनीआपण । शिष्याचेहरीधन । उपदेशीतयाज्ञान । स्वयेंदगडकोरडा ॥४७॥

कामक्रोधलोभमोह । मत्सरदंभसर्वद्रोह । कार्यभरेनिःसंदेह । पापपर्वतसांठवीं ॥४८॥

कालकर्मस्वभाव । शमदमादीवैभव । पाहतांम्हणेदंभसर्व । पोटासाठींमांडिल ॥४९॥

शूद्रापरीआचार । विप्रकरितीअनिवार । क्षत्रिवैश्यपरस्पर । स्वधर्मत्यागकरिताती ॥५०॥

शूद्रकरितीद्विजाचार । म्लेंछराजेदुर्धर । बुडवितीधर्माचार । द्रव्यहरींतींप्रजेचे ॥५१॥

शस्त्रभूमीविद्याधन । नृपघेतींहिरुन । अनितीनेंवर्तन । करितीनृपसर्वही ॥५२॥

वैश्यकरितीअनृत । चोरीकरीतिदेखत । चातुर्यएवंसंपादित । धर्महीनकलियुगीं ॥५३॥

शूद्रपतितचांडाल । उन्मत्तहोतीप्रबळ । विप्रकर्मकरितीखळ । कायविरोधम्हणतीते ॥५४॥

उत्पंनझालीलिपीयंत्रें । पुस्तकविक्रयस्वतंत्रें । चांडालेंजाणिलोंकर्मतंत्रें । परीनेणतीब्राम्हण ॥५५॥

धनिकचतुरदेखणा । धनिकसर्वत्रशाहणा । धनिकांसर्वमोठेंपणा । कलीमाजीमिळतसे ॥५६॥

दरिद्रीतोमहाभ्रष्ठ । दुर्बुद्धीअतिपापिष्ट । विद्याजरीअसेस्पष्ठ । माननाहींतयाचा ॥५७॥

स्त्रियावंचितीभ्रतारा । तोषवितींस्वयेंजारा । पातिव्रत्याचातोरा । वरीवरीमिरवती ॥५८॥

सासुनणंदाभावेदीर । अतिथिविप्र आणिस्वशुर । नकोतहेडोळांसमोर । पृथक्संसार आवडे ॥५९॥

असतांएकत्रस्वपती । तीसवाटेबहुखंती । कलहकरीनित्यप्रती । कानफुंकीपतीचे ॥६०॥

नठसेजरी उपदेश । सिद्धहोयजीवनाश । नानायत्नेअहिर्निश । दादुल्यातेंवळवीतसे ॥६१॥

नचलेयत्नपरोपरी । देवऋषीमगपाचारी । जादूटोणाकूसरी । वेडाकरीलनिश्चयें ॥६२॥

असोऐसेदुराचार । कलीमाजीविस्तार । सर्वकरितींअनाचार । सदाचारनसेच ॥६३॥

पापयोगेंऐकनृपती । दोषदुष्काळव्यापिती । अनावृष्टीरोगसंतती । पीडाजनांबाधते ॥६४॥

अशक्तरोगीअंधळे । लूलेमुकेपांगळे । उत्पन्नहोतींपापबळें । पापभोगभोगाया ॥६५॥

नाहीद्रव्यनाहींवस्त्र । नमिळेंअन्नकैचेंपात्र । सदाराहतीअपवित्र । परांन्नपिंडधुंडिती ॥६६॥

अल्पायुषीहोतीनर । विधवावाढतीअपार । तयांशींच आयुष्यपूर । मृत्यूभयेंस्पर्शेना ॥६७॥

पातकाचामुख्यठेवा । कलिभांडारसांठवा । रचिल्यातेणेंचिविधवा । अधर्मवाढवीयुगधर्म ॥६८॥

नरकींयांचीबोळवण । यावतजातींयुगेंतीन । कलीमाजीमागुत्यान । जन्मायेतींनरकी ॥६९॥

कलिस्वभावदारुण । असत्यकरीलकोण । यांसीउपायसाधारण । नचलेजाण उद्धारा ॥७०॥

उपायएक अस । देवीनमसुरसे । उच्चारितांपापनासे । अनंतजन्मीसंचित ॥७१॥

पापदहनशक्ति । आहेजितुकीनामाप्रती । तितुकेंपापत्रिजगतीं । अनंतजन्मीघडेना ॥७२॥

अजपामंत्रसदाकाळ । जपहोतसेचिरकाळ । परीनेणवेंएकवेळ । जाणेंतरीकृताथ ॥७३॥

अंबाऐसेंयेतांवाणीं । काळवाहेतेथेंपाणी । जन्ममृत्युमागुत्यानी । नोहेनोहेसर्वथा ॥७४॥

युगधर्मसविस्तर । कथिलातुजसाचार । आणिककायसुंदर । ऐकावयाइच्छिशी ॥७५॥

एकशतसहाश्लोक । युगधर्मवर्णनदेख । श्रवणेंपावेंसवसुख । पापनाशहोतसे ॥७६॥

देवीविजयेषष्ठेतृतीयः ॥३॥  

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP