प्रथम स्कंध - अध्याय तिसरा

श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.


श्रीगणेशायनमः । मातापितृभ्यांनमः । ऐकूनिऐशियावचना । संशय आला श्रोतेजना । शिरच्छेदनारायणा । केविझाला आश्चिर्य ॥१॥

अदभुतचरित्र वर्णावें । पुसतीऋषीप्रेमभावें सूतसांगेतेंऐकावें । श्रोतीजनीसादर ॥२॥

करितांयुद्धदारुण । श्रमितझाला नारायण । अयुताब्दप्रमाण । काळगेलाझगडता ॥३॥

दैत्यसर्वपराभविले । श्रमेअंगविकळझालें । निद्रेनेंतैंवेष्ठिले । दैवयोगेकरुनिया ॥४॥

समपाहुनीधरणी । पद्मासनेंशार्डपाणी । सज्ज धनूभूटेकूनी । माथावरीठेविला ॥५॥

अतिगाढनीज आली । शुद्धीसर्वविसरली । विवशीतीगळापडली । भावीबळेंहरीच्या ॥६॥

असुरजैंपराभविले । देवीकार्यविचारिलें । यज्ञेंकरुनतोषविले । पाहिजेह्मणतीगोविंदा ॥७॥

ह्मणोनिवैकुंठीपातले । हरीसीजैनदेखिलें । ज्ञानदृष्टीनिरखिलें । गेलेतेथेंतत्काळ ॥८॥

हरीसीपाहुनिनिद्रित । ब्रह्महरादिचिंताक्रांत । निद्राभंगपापबहूत । यज्ञकार्य अवश्य ॥९॥

तेंव्हारचिलीवाळवी । ब्रह्मदेवेसहजमावी । धनुष्यदोरीतोडावी । आज्ञापिलेंतियेसी ॥१०॥

तोवंम्रीनामेंकीट । ह्मणेहेंतोपापदुर्घट । लोभदावीपापवाट । तोनसेनायकेमी ॥११॥

होमसमईजेंसांडेल । तेंकीटातुजलाधेल । कार्यकरीउतावेळ । त्यासीसांगेविरंची ॥१२॥

ऐकताचिझगडली । मौर्वींतेव्हांकातरली । धनुष्कोटीउसळली । शब्दगगनीं कोंदला ॥१३॥

सवेंचिज्ञालाअंधःकार । वायूवेगावलाफार । धुळींव्यापिलेंव्योमांतर । सूर्यचंद्रलोपावले ॥१४॥

हाहाकारझालादारुण । नक्षत्रांचींझालीरिचवण । चिंताक्रांतदेवगण । समस्तझालेतेधवां ॥१५॥

मुहूर्तामाजीसर्वशमले । सर्वजेव्हांदिसूंलागले । विष्णुकलेवर पाहिलें । शिरविरहितदेवानी ॥१६॥

अत्याश्चर्यातिभय । अतिदुःखविपर्यय । सर्वहीरडतीहायहाय । शंकरब्रह्म इंद्रादि ॥१७॥

म्हणती वासुदेवाहेकाय । तूंअजन्म आणि अव्यय । कोठेंमस्तकमृत्यूकाय । ग्राशीतुजअघटितहे ॥१८॥

मरणजरीआलेंतुज । आह्मीमगमेलोसहज । अमरनामव्यर्थ आज । बुडालीसर्वमर्यादा ॥१९॥

तुजसाठींनरडूंदेवा । स्वसुरवाचाबुडालाठेवा । स्वर्थापरवासुदेवा । शोकसागरींबुडालों ॥२०॥

सात्विकीराजसीतामसी । शक्तित्रयेंतूंवर्तशी । मायाबाधूंनशकेतुजशीं । मायेशतूंचिपरमेश्वर ॥२१॥

नेणोहीमायाकोणाची । जिणेबुद्धीनेलीआमुची । तनूपाडिलीविष्णूची । दुजासमर्थकोणतेथे ॥२२॥

एवंविलपतीएकसरे । तैंवाचस्पतीपुढेंसरे । म्हणे एवंशोकाचेनिभरे । होणेंकाय ऐसेनी ॥२३॥

धीरधरुनियाचित्ति । पुढेंउपायकरणें निगुती । कार्यसाधावेंअनेकयुक्ती । उद्योगफलदसर्वदा ॥२४॥

इंद्रम्हणे गुरुराया । धिक्कार असोपुरुषकार्या । पाहतांसमस्तदेवाचिया । जावेंमस्तक विष्णूचें ॥२५॥

ब्रह्माम्हणेकालप्राप्त । अवश्यभोगणेंलागत । देहधरासीझगडत । सुखदुःखसर्वदा ॥२६॥

ऐसाकालवशेशंकर । छेदिताझालाममशिर । शिवलिंगपातसाचार । शापयोगेंजाहला ॥२७॥

तैसाआजिसमुद्रांत । हरीचाझालाशिरः पात । सहस्रभग इंद्राशीहोत । स्वर्गभ्रंशपुनः पुनः ॥२८॥

दुःखीनाहींऐसाक्षिती । आहेकोणत्रिजगतीं । शोकसांडूनएकचित्तीं । महामायेशीस्मरावें ॥२९॥

तीच आपुलेंकार्यकारी निर्गुणाप्रकृतीखरी । ब्रह्मविद्याजगद्वरी । सर्वजननीपरांबा ॥३०॥

सूत म्हणेऋषीसी । बोलूनिऐसेदेवाशी । आज्ञापिलेंमगवेदाशी । तयेवेळींचतुर्मुखें ॥३१॥

आज्ञाहोताचिनिगम । मूर्तिमानऋग्यजुः साम । अथर्वजोडूनकरपरम । देवीस्तव आरंभिला ॥३२॥

माहामायेविश्वजननी । निर्गुणेशंकरकामिनी । सर्वभूतमयेजननी । सर्वधारकेभूमिके ॥३३॥

नमनकरावेंतुजसी । तूंचिबुद्धीप्राणेशी । लक्ष्मीकांतिक्षमेशी । शांतिश्रद्धेनमोस्तु ॥३४॥

तूंचिमेधाधारणा । स्मृतीतूंचिअंतः कर्णा । अर्धमात्रागीतवर्णा । गायत्रीतूव्याह्रती ॥३५॥

जयाधात्रीविजया । लज्जा कांतिस्पृहादया । नमस्कारुंमहामाया । जगद्धिधानकारिणी ॥३६॥

सर्व जनींदयाकरिसी । सकलांचेंहितवांछिशी । वाणीरुपेंसर्वांशी । आदिमाया दुःखहा ॥३७॥

ब्रह्महर आणि शौरी । इंद्राग्नीरावभस्किरी । हे सर्व झाले अधिकारी । कृपालेशेंतूझिया ॥३८॥

तुझेंरुपतुझेंगुण । जाणेल ऐसाजगींकोण । नामाचेतुझ्यापरिमाण कर्ताकोणी असेकीं ॥३९॥

नदेवींनामानवीं । असेजोतुज अनुभवी । यासीप्रमाणजाणवी । आमुचेचिवचन ॥४०॥

आह्मांशींचनसेठावें । इतरातेथेंकायपवे । तवचरित्र अघवें । तूंतरीजाणसीकीं ॥४१॥

हरीचेशिरोकृंतन । तुजनसेकींभान । अथवाबळाचेअनुमान । पाहसीकींतयाचे ॥४२॥

अथवाविष्णूचे दुरित । तरीतवभक्तानसंभवत । उपेक्षाहीनह्मणवत । अनुचिततूतेंतें ॥४३॥

सर्वदेवांचीपापें । हरीशिरींआपोआपें । शिर ऐसें दोषरुपें । छेदिलेंकींदयाळें ॥४४॥

अथवा गर्वेंकरुन । भरलाकीनारायण । ह्मणोनिमस्तकहीन । केलासकींकळेना ॥४५॥

कोणीपराजित असुर । तुजपासूनलाधलावर । तेणेंगुप्तझालेंशिर । कींविनोदतुझाहा ॥४६॥

कींआजपद्मेवरी । क्रोधावलीसभारी । तवांशातीतरी । सनाथकीजेतियेशी ॥४७॥

हे देवसमस्त । तुजलागींनमस्कारित । मूर्धानाहींगवसत । अन्योपायसुचेना ॥४८॥

जीवनद्यायाजेविसुधा । तेविमातेतूविबुधा । संतोषवीहरीबाधा । जीवदानकरावें ॥४९॥

सूतह्मणेश्रोतेजन । ऐकतांऐसेवेदवचन । माउलीझालीप्रसन्न । नभोवाणीबोलली ॥५०॥

संतुष्टझालेप्रसन्न । तुमचेंसंकटवारीन । चिंताटाकिजेमनांतून । ऐकासमस्तदेवहो ॥५१॥

हीप्रेमळस्तुति । नरजेगातीऐकती । त्यासीभोगमोक्षगती । होईलमत्प्रसादें ॥५२॥

मस्तकछेदाचेंकारण । झालेंअपूर्वविंदान । कार्यनोहोंविनाकारण । अवश्यभावीचुकेना ॥५३॥

एकेसमईंएकांती । पाहूनियारमेप्रती । हांसलाहारमापती । पाहुनीकोपलीलक्षुमी ॥५४॥

म्हणेमजविरुपदेखिलें । डोळादुजेंरुपरेखिलें । कायकारण हांसले । उपहासकेलाकीं ॥५५॥

दूजी आणिलीकींसवत । म्हणोनिमजहांसत । कोपेमनींविचारित । तवप्रवेशेतामसी ॥५६॥

कालयोगेंकरुन । देवकार्याचेंसाधन । दैवयोगेकरुन । हळूंचपद्माशापदे ॥५७॥

पडोमस्तकतुटोनि । बोलेस्त्रीस्वभावानी । सपत्नीचेदुःखाहूनि । वैधव्यबरेंवाटल ॥५८॥

श्लोक । अनृतंसाहसंमायामूर्खत्वंअतिलोभता । अशौचत्वंनिर्दयत्वंस्त्रीणांदोषाः स्वभावजाः ॥१॥

खोटेंआणिधाडस । तसीचममताबहुवस । मूर्खपणाआणिसोस । अशुद्ध आणिनिर्दय ॥५९॥

स्वभावदोष हेसात । स्त्रियेमाजींराबत । परीसंसारीझालाभ्रांत । लोकमाझेमायेनें ॥६०॥

अन्य असे कारण । हयग्रीवदैत्यदारुण । तेणेंमजतोषऊन । वांछिलेंमरणहयमुखें ॥६१॥

तरीविष्णूंचे शरीर । जोडिजे तेथेंहयशीर । ममप्रसादेचक्रधर । उठोनवधीलदैत्यातें ॥६२॥

बोलूनवाणीविरमली । सर्वदेवाशांतीआली । विधिवाक्येंत्वराकेली । त्वष्टयानेंसर्वादेखता ॥६३॥

कापूनिएकहयशिर । हरीदेहीं जोडीसत्वर । सचेतझालारमावर । महामाया प्रसादें ॥६४॥

हेंसुरसचरित्र । गाताऐकतांनरपवित्र । हयग्रीवाख्यानविचित्र । सूत सांगेऋषीशी ॥६५॥

शतश्लोकद्वादशोत्तर । हयग्रीवाचावतार । निरुपिलाश्लोक सार । परांबेनेंक्षेमार्थ ॥६६॥

इतिश्रीदेवीविजयेप्रथमस्कंदेतृतीयोध्यायः श्रीपरांबाप्रीतये भवतु । श्रीचिदग्निकुंडसंभूतायैनमः  ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP