TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

संघ न्याययंत्रणा - कलम १४६ ते १४७

भारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा असून डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत .

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व २६ जानेवारी १९५० पासून राज्यघटना अंमलात आली .


कलम १४६ ते १४७

सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारी व सेवक आणि खर्च . १४६ .

( १ ) सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारी आणि सेवक यांच्या नियुक्त्या भारताचा मुख्य न्यायमूर्ती अथवा तो निदेशित करील असा त्या न्यायालयाचा अन्य न्यायाधीश किंवा अधिकारी यांच्याकडून केल्या जातील :

परंतु . राष्ट्रपती नियमाद्वारे असे आवश्यक करु शकेल की . त्या नियमात विनिर्दिष्ट करण्यात येतील अशा बाबतीत , त्या न्यायालयाशी आधीपासून संलग्न नसलेल्या कोणत्याही व्यक्तीस . त्या न्यायालायाशी संबंधित असलेल्या कोणत्याही पदावर संघ लोक सेवा आयोगाचा विचार घेतल्यावाचून नियुक्त केले जाऊ नये .

( २ ) संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदींना अधीन राहून . सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारी आणि सेवक यांच्या सेवाशर्ती . भारताच्या मुख्य न्यायमूर्तीने अथवा त्याने त्या प्रयोजनार्थ नियम करण्यासाठी प्राधिकृत केलेल्या त्या न्यायालयाच्या अन्य न्यायाधीशाने किंवा अधिकार्‍याने केलेल्या नियमाद्वारे विहित केल्या जातील अशा असतील :

परंतु . या खंडाखाली केलेल्या नियमांना , जेथवर ते वेतन , भत्ते . रजा किंवा निवृत्तिवेतन यांच्याशी संबंधित असतील तेथवर . राष्ट्रपतीची मान्यता आवश्यक असेल .

( ३ ) सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारी आणि सेवक यांना किंवा त्यांच्या बाबतीत द्यावयाचे सर्व वेतन . भत्ते आणि निवृत्तिवेतने यांसह त्या न्यायालयाचा प्रशासकीय खर्च भारताच्या एकत्रित निधीवर प्रभारित केला जाईल . आणि त्या न्यायालयाने घेतलेली कोणतीही फी किंवा अन्य रकमा त्या निधीचा भाग बनतील .

अर्थ लावणे . १४७ .

या प्रकरणात आणि भाग सहा , प्रकरण पाच यामध्ये , या संविधानाचा अर्थ लावण्यासंबंधीच्या कोणत्याही कायदेविषयक सारभूत प्रश्नाच्या निर्देशांमध्ये . " गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँक्ट . १९३५ " ( त्या अधिनियमात सुधारणा करणारी किंवा त्यास पूरक असलेली कोणतीही अधिनियमिती यासह ) अथवा त्याखाली केलेली कोणतीही ऑर्डर इन कौन्सिल किंवा आदेश अथवा " इंडियन इंडिपेंडन्स अँक्ट . १९४७ " किंवा त्याखाली केलेला कोणताही आदेश . याचा अर्थ लावण्यासंबंधीच्या कोणत्याही कायदेविषयक सारभूत प्रश्नाचे निर्देश समाविष्ट आहेत . असा त्या निर्देशांचा अर्थ लावला जाईल .

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2012-12-30T04:30:10.5270000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

haematologic

  • रुधिरशास्त्रविषयक 
  • रुधिरविषयक, रुधिर- 
  • (also haematological) 
RANDOM WORD

Did you know?

सुतकात वर्ज्य कार्ये कोणती? गोड सुतक म्हणजे काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site