TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

संघ न्याययंत्रणा - कलम १३१ ते १३२

भारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा असून डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत .

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व २६ जानेवारी १९५० पासून राज्यघटना अंमलात आली .


कलम १३१ ते १३२

सर्वोच्च न्यायालयाची अव्वल अधिकारिता .

१३१ .

या संविधानातील तरतुदींना अधीन राहून ,---

( क ) भारत सरकार आणि एक किंवा अधिक राज्ये यांच्यामधील ; किंवा

( ख ) एका पक्षी भारत सरकार व कोणतेही राज्य किंवा राज्ये आणि दुसर्‍या पक्षी एक किंवा अधिक अन्य राज्ये यांच्यामधील ; किंवा

( ग ) दोन किंवा अधिक राज्यांमधील ,

कोणत्याही तंटयामध्ये . ज्यावर एखाद्या वैध अधिकाराचे अस्तित्व किंवा व्याप्ती अवलंबून आहे असा कोणताही प्रश्न ( मग तो कायदेविषयक असो वा वस्तुस्थितिविषयक असो ) अंतर्भूत असेल तर आणि तेथवर . त्या तंटयात सर्वोच्च न्यायालयास अव्वल अधिकारिता असेल - अन्य कोणत्याही न्यायालयास नाही :

[ परंतु , कोणताही तह . करार . प्रसंविदा , वचनबंध , सनद किंवा अन्य तत्सम संलेख या संविधानाच्या प्रारंभापूर्वी करण्यात आल्यावर किंवा निष्पादित करण्यात आल्यावर , अशा प्रारंभानंतर अंमलात राहिलेला असेल अथवा त्यामधून उद‌भवणारा तंटा उक्त अधिकारितेच्या व्याप्तीत येणार नाही अशी तरतूद केली असेल तर , असा तंटा उक्त अधिकारितेच्या व्याप्तीत येणार नाही .]

१३१क . * * * *

विवक्षित प्रकरणी उच्च न्यायालयांवरील अपिलांमध्ये सर्वोच्च न्यायालयाची अपील अधिकारिता .

१३२ .

( १ ) भारताच्या राज्यक्षेत्रातील उच्च न्यायालयाचा कोणताही न्यायनिर्णय . हुकूमनामा किंवा अंतिम आदेश यावर - मग तो दिवाणी , फौजदारी किंवा अन्य कार्यवाहीतील असो - त्या प्रकरणात या संविधानाचा अर्थ लावण्यासंबंधीचा कायदेविषयक सारभूत प्रश्न अंतर्भूत आहे असे [ त्या उच्च न्यायालयाने अनुच्छेद १३४क खाली प्रमाणित केल्यास ], सर्वोच्च न्यायालयाकडे अपील होऊ शकेल .

( २ ) * * * * *

( ३ ) असे प्रमाणपत्र देण्यात आले असेल ५ * * * * तेव्हा त्या प्रकरणातील कोणत्याही पक्षकारास पूर्वोक्त अशा कोणत्याही प्रश्नावर चुकीचा निर्णय दिला गेला आहे . या कारणावरुन ५ * * * सर्वोच्च न्यायालयाकडे अपील करता येईल .

स्पष्टीकरण .--- या अनुच्छेदाच्या प्रयोजनार्थ , " अंतिम आदेश " या शब्दप्रयोगात . जो वादप्रश्न , त्याचा अपीलकर्त्याच्या बाजूने निर्णय झाल्यास ते प्रकरण अंतिमरीत्या निकालात काढण्यासाठी पुरेसा होईल . त्या वादप्रश्नांचा निर्णय करणार्‍या आदेशाचा समावेश आहे .

दिवाणी प्रकारणांविषयी उच्च न्यायालयांवरील अपिलांमध्ये सर्वोच्च न्यायालयाची अपील अधिकारिता . १३३ .

[( १ ) भारताच्या राज्यक्षेत्रातील एखाद्या उच्च न्यायालयाचा दिवाणी कार्यवाहीतील कोणताही न्यायनिर्णय , हुकूमनामा किंवा आदेश यावर [ जर त्या उच्च न्यायालयाने १३४क खाली असे प्रमाणित केले ] की ---

( क ) त्या प्रकरणात एखादा सर्वसाधारण महत्त्वाचा कायदेविषयक सारभूत प्रश्न अंतर्भूत आहे ; आणि

( ख ) उच्च न्यायालयाच्या मते उक्त प्रश्नाचा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय करणे जरूर आहे , तर सर्वोच्च न्यायालयाकडे अपील होऊ शकेल .]

( २ ) अनुच्छेद १३२ मध्ये काहीही असले तरी . खंड ( १ ) खाली सर्वोच्च न्यायालयाकडे अपील करणार्‍या कोणत्याही पक्षकाराला . या संविधानाचा सर्थ लावण्यासंबंधीच्या एखाद्या कायदेविषयक सारभूत प्रश्नावर चुकीचा निर्णय झाला आहे . असे कारण अपिलाच्या कारणांपैकी एक म्हणून मांडता येईल .

( ३ ) या अनुच्छेदात काहीही असले तरी , संसदेने कायद्याद्वारे अन्यथा तरतूद केलेली नसल्यास . उच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशाचा न्यायनिर्णय . हुकूमनामा किंवा अंतिम आदेश यावर सर्वोच्च न्यायालयाकडे कोणतेही अपील होऊ शकणार नाही .

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2012-12-30T04:22:36.0270000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

concentric jaw chuck

  • संकेंद्री जंभ बंधक 
RANDOM WORD

Did you know?

ऐश्वर्याचे प्रकार किती व कोणते?
Category : Dictionary
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site