अंक तिसरा - प्रवेश पहिला

गडकर्‍यांची नाटके मराठी भाषेचे कायमचे अलंकार बनलेले आहेत, आपली नाटके वाङ्मयदृष्ट्या वरच्या दर्जाची व्हावी याची त्यांनी फार खबरदारी घेतली होती.


[यमुना व रमा भीत भीत येतात. माधवरावांची खोली]
यमुनाः हं, या आतां लौकरआणि घ्या पाहून सारी व्यव्हस्था !
रमा बा ई: यमुनाबाई, माझ्या किनई उरांत धडकीच भरली आहे !
यमुनाः जाऊबाई, भारीच मित्रा स्वभाव बाई तुमचा ! माधव भावोजी आतां इकडे मुळींच यायचे नाहींत.
रमा: त्याचा कुणी नेमसांगावा ! जरयेणें झालें तरआणखी संतापायचें होईल ! कांहीं नाहीं तरआज सातआठ वर्षे नांव टाकिलें आहे; मग संतापाला कारन मिळाल्यावरतरकाय होईल नी काय नाहीं ? म्हणून म्हणतें, अजून चला माघार्‍या !
यमुना: कांहीं होत नाहीं नी जात नाहीं ! मला इकडून अगदीं चांगलें सांगणें झालें आहे कीं माधवदादाला बाबांच्याजवळ बसवून ठेवितों, घरांतील सारीं माणसें तिथेंच बसलीं आहेत, तेव्हां आतां रमावहिनीला नेऊन सारी जागा दाखीव म्हणून ! आतां तरझालें ना ? आणखी मी सुद्धां येतांना पाहिलें तरमाधवभावोजी मामंजींच्या पायाला तेल चोळीत बसले आहेत ! ते कांहीं इतक्यांत इकडे येत नाहींत !
रमा: खरेंच, मामंजींची तब्बेत एकदोन दिवसांत इतकी कशी बरें बिघडली ? पुण्यास‘ बरे होतें ना अगदीं ?
यमुना: अहो, बिघडली कशाची ? वसंतदादाची आणि इकडची सारी खटपट ! वसंतदादानें दिलेलें कसलेंसें औषध इकडून मामंजींच्या तळपायाला लावायचें झालें ! त्याचा मामंजींच्या पायांत आला बळंघा ! झालें, पिलंभटाने मेलेला उंदीरघरांत टाकलाच होता, मामंजींना आणखीं तें काय हवें ! लागलीच ते घायक्‌त होऊन बसले ! एकदां त्यांच्या मनांत संशयानें घरघेतलें कीं, झालें ! इकडचा सूर्य तिकडे होईल पण त्यांचा संशय कांहीं दूरव्हावयाचा नाहीं !
रमा: पण इतकें करून पुढें काय करायचें तें नाहींच सांगितलें मुळीं !
यमुनाः अहो, तें सारें सांगत बसलें तरभारत होईल आणि इथें तरकुडाला सुद्धां कान फुटायचे ! वेणू वन्संनासुद्धां यांतलें अगदीं अवाक्षरमाहीत नाहीं. त्या आहेत हळव्या मनाच्या ! फटदिशीं बोलून जायच्या ! वसंतदादाच बैरागी होऊन येणारआहे हें सुद्धां त्यांना ठाऊक नाहीं.
रमा: वसंतरावाचें करणें तरी अघटितच ! बायकोसाठीं बैरागी येणार?
यमुना: आणि बैराग्यासाठीं बायको आणणारहें नाहीं म्हटलेंत कुठें ! बरें, तें राहूं दे. सध्यां आपलें पायापुढेंचं पाहिलें म्हणजे पुरे झालें. ही पहा दाराची कडी; बाहेरच्या बाजूनें या बिजगर्‍या खिळखिळ्या केल्या आहेत. त्या फिरविल्या म्हणजे कोयंडा मोकळा होईल. तो सुटला कीं त्याला बांधलेला तो दोरसैल सोडा, म्हणजे कोयंडा हळूहळू खालीं येईल; घाई केलीत तरआवाज होईल ! आलें लक्षांत ! वसंतदादानें टाळी वाजवून खूण दिली कीं हळून या युक्तीनें दारउघडून आंत शिरा. दारलावून घ्या आणि या पडद्यामागें उभ्या राहा. पुढें काय करायचें आणि कसें बोलायचें हें कांहीं सांगायला नको. भिऊंबिऊं नका म्हणजे झालें !
रमा: काय होईल तें खरें ! माझें मन आपलें सारखें मागतें पाऊल घेतें.
यमुना: अहो, होणें जाणें दैवाधीन ! प्रयत्न आपल्या हातीं, तेवढा करून पाहावयाचा झालें. चला आतां. सांगितलेलें नीट लक्षांत ठेवा. [जातात.]

N/A

References : N/A
Last Updated : December 08, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP