मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|लीळा चरित्र|पूर्वार्ध|भाग २| लीळा ३०१ ते ३१० भाग २ लीळा १९९ ते २१० लीळा २११ ते २२० लीळा २२१ ते २३० लीळा २३१ ते २४० लीळा २४१ ते २५० लीळा २५१ ते २६० लीळा २६१ ते २७० लीळा २७१ ते २८० लीळा २८१ ते २९० लीळा २९१ ते ३०० लीळा ३०१ ते ३१० लीळा ३११ ते ३२० लीळा ३२१ ते ३३० लीळा ३३१ ते ३४० लीळा ३४१ ते ३५० लीळा ३५१ ते ३५८ भाग २ - लीळा ३०१ ते ३१० प्रस्तुतचे भागात श्रीचक्रधरस्वामींचे सेंदुरणीस आगमन झाल्यानंतर भटोबासांस ईश्वरप्रतीत होऊन स्वामींचे खडकुलीस प्रयाण होईपर्यंतचा इतिवृतांत आला आहे. Tags : chakradhara swamilila charitraचक्रधर स्वामीलीळा चरित्र लीळा ३०१ ते ३१० Translation - भाषांतर लीळा ३०१ : घानदरी प्रातपुजा आरोगणमग उदीयांचि परिश्रया बीजें केलें : तैसेचि गोसावी : घानदरीएसि आसन : घाणेयांपासि आंगणीं कांटी होतीं : तेथ आसन : पटिसाळे दक्षीणीली कडे आसन जालें : मग गोसावी तेथौनि बीजें केलें : मग मार्गी डोंबलांकाटिए तळि आसन : चरणक्षाळण : गुळळा : वीडा : मग तेथौनि बीजे केलें : मार्गीहुनि उपाध्ये पींपळगावां तांबोळ आणुं धाडीले : मग सोमनाथीं रिगतां उजवेया कडे आसन : तथा डावेया कडे गुळळा : ए पानें सीरपुरूनि तेधवांचि आणिलीं : तदा काळीं तीये गावीं सीत भरे : उपाध्ये एति तवं सोमनाथीं होते : ॥लीळा ३०२ : विज्ञानेश्र्वरा वीडा वाणेंमग तेथौनि गोसावी आपेगावां बीजें केलें : वेशी पासि माहाजन बैसले होते : तेंहीं गोसावीयांतें देखीलें : आणि अवघेचि उठीले : दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागले : (हे रामेश्र्वरबास) : मग गोसावी विज्ञानेश्र्वरां बीजें केलें : पटिसाळेवरि आसन : चरणक्षाळण जालें : गुळळा : मग गोसावी भितरि बीजें केलें : चौकीं आंगी टोपरें फेडीलें : मग फुटा प्रावर्ण करूनि भितरि बीजें केलें : गाभारां आसन : मग माधानीचें उदक घेउनि लिंगासि स्तर्पण केलें : मग उपध्यातें ह्मणीतलें : ‘बटिका : वीडा देया’ : तेंहीं साधारणें ऐसीं दोनि असा : आणिकें द्या’ : मग तेंहीं बरवीं पानें : बरवें पोफळ : ऐसा वीडा वोळगवीळा : मग गोसावी माध्यानिसि वीडा वीसूळीला : मग लिंगासि वाइला : दोहीं श्रीकरीं लिंग स्परिशीलें : मग गोसावी बाहीरि बीजें केले : नासी पासि आडदांडी होती : तेथ गोसावी उभे राहीले : तेथ गोसावी निरूपण केलें : उपाधी गोसावीयांतें पूसीलें : ‘जी जी : देववीडा ह्मणीजे : सर्वज्ञे ह्मणीतलें : ‘कव्हणि एक सदर्थ देवा जाति : हडुपीयातें वीडे मागति : तो चोखटु दे : देववीडा देहा ठेवि : मग काळीं पानें : घोटें पोफळ : मग वाये : ते देवते वंचिति : तरि देवता कोणें कामें नाराए’ : तैसेंचि गोसावी देऊळ सव्ये घालुनि बीजें केलें : ॥लीळा ३०३ : निंबातळि आसन : विष्णु भटां भेटिमग गोसावी तेथौनि बीजें केलें : निंबातळि आसन : पींपळ असे : तेयाचा वाव्य पालवीं परता ऐसा निंबू होता : तेथ आसन : तवं विष्णुभट गंगेकडौनि विज्ञानेश्र्वरासि जात असति : हातीं तांबवती : तुळसी : तवं गोसावीयातें देखीलें : आणि गोसावीयांकडे आले : दंडवतें घातली : श्रीचरणा लागले : मग गोसावीयांचे श्रीचरण उदकें सींचन केलें : तुळसी वाइलिया : गोसावी श्रीकरें पाठि स्परिशिली : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘बाइ : कैसा ब्राह्मणु तापसू : तीन्हीं रितु साधलिया असति’ : ‘जी जी : गोसावी केव्हळि बीजें केलें’ : ‘हें आतांचि आले’ : गोष्टी : मग वीनवीले : ‘जी जी : आवघेया सांघो जाओ नां : ते नेणति : गोसावी आले : ऐसें सांघों : गोसावी बीजें केले असे’ : मग तैसेचि ते निगाले : महाजन माहालक्ष्मीचां दउळीं बैसले असति : तवं वीष्णुभटीं ह्मणीतलें : ‘हांगा काइ बैसले असा : उठा उठा : गोसावी बीजें केलें असे’ : तेहीं ह्मणीतलें : ‘कोणे ठाइं’ : ‘ना वीज्ञानेश्र्वराचेया निंबातळि बैसले असति’ : तैसेचि ते उठीले : आपुलालेया घरासि गेले : भेटीची आइत केली : ॥लीळा ३०४ : बल्हेग्रामीं गुंफे वोवाळणीमग जे जेयातें असे : तेणें तें दरिसनां घेतलें : गावीं घरोघरीं गुढीया उभिलिया : वेसि दारीं तोरण बांधलें : ऐसें नगर श्रींघारुनि थोर मोहोउछावो केला : मग दरिसनां निगाले : गोसावीयांसि दरिसन जालें : दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागले : जेयातें जें होतें : तें तें दरिसन केलें : मंत्रु ह्मणीतलें : मग वीनवीलें : ‘गोसावी बल्हेग्रामासि बीजें करावें : तेथें सत्यादेवीचें देउळ असे : बरवी गुंफा असे : तेथ गोसावी बीजें करावें जी’ : गोसावी वीनवणि स्वीकारीली : मग गोसावी बल्हेग्रामा बीजें केलें : सरिसें भक्तजन : माहाजन : गोसावी उपाध्यांचीया खांद्यावरि श्रीकरू घातला : वरि भक्तजनीं चांदोवा धरिला : ऐसे गोसावी बल्हेग्रामासि बीजें केलें : गुंफेसि पटिसाळेवरि उजवीया कडे आसन : तव लाखाइसे आपूली सून श्रींघारूनि वोवाळणिए लागि आणीलीं : गोसावीयांतें वोवाळीलें : त्यातें देखौनि एरी घरिचिया : एरी घरीचिया : आखेवाणेंसीं वोवाळीति : ऐसीया अवघीयाचि नगरिचीया सोवासनी वोवाळावीया आलीया : गोसावी आसनीचा वीडा : जातां त्याचिये थाळां घालिति : एरांचा वीडा एरां देति : आवघीया गावां आंतु एकीसी गोसावीयांचें दर्शन नाहीं : तीएचा भातारू तीएसि एवों नेदीचि : ऐसी वीळवेर्ही वोवाळणी जाली : तथा पाहारू रात्रि : सभा घनदाट बैसली असे : दाटणि जाली : कोनटेया पसौनि गोसावीयाचा अवसरू पाहात होते : ते आले : मग बसले : श्रीचरण गोसावीयांचे चुरूं लागले : गोसावी दोन्ही श्रीचरण दोघांचीया मांडीयां वरि घातले : मग चुरूं लागले : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘काइ गा विरोध जाला’ : ‘ना जी’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘रायाचिए वोळगे : राणे मंडळिक एति : वोळग भरे : आंगाजवळिकेचे धाकुटे परते सरति : पाठवणी होए : मग तेचि : तथा मग तेचि : मां तेचि : मग तेहींचि घेपजे दीजे गा’ : मग लाखाइसीं उपाहारालागि वीनवीले : मग बाइसीं गोसावीयांसि पुजावस्वर केला : रात्री लाखाइसीं ताट आणिलें : गोसावीयांसि व्याळी जाली : गुळळा : वाडा : बाइसीं : वोटेयावरि शएनासन रचीलें : गोसावीयांसि पहुड : गुंफे अवस्थान : दीस सात पाच जाले : ॥लीळा ३०५ : राणाइ वेशी पावो लावणेंते दीसींचि राणाइसे गोसावीयांचेया दरिसनांसि आलीं : रात्रीं : दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागली : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘वेशी पावो लाउनि या’ : ‘हो कां जी’ : मग गेलीं : व्येशी पावो लावीला : तवं बाहीरिला कडे : बाबरू झांटि : गुंजावर्ण डोळे : खांदावरि आगळ : तथा लोहाचा मूदगल : उंच थोरू महाप्रचंडु : ऐसा देखीला : आणि भियालीं : तैसीचि गोसावीयांपासि आली : दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागलीं : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘बाइ : काइ देखीलें’ : सांघीतलें : ‘जी जी मीं तेथें गेलिये : तवं बाबर झांटि : गुंजावर्ण डोळे : खांदावरि लोहाचा मुदगलु : उंच थोरू ऐसा देखीला : जी जी’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘भियाचि ना’ : ‘जी : जी : तरि तो कोणु’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘बाइ : तो ब्रह्मनाथु : एथीचीए वोळगे आला होता’: ॥लीळा ३०६ : हटें राखसेयाचा नमस्कारू घेणेंएकुदीसीं गोसावीयांसि वीळीचां, वेळीं गोसावी सत्यादेवीचां आंगणीं उभे असति : आवघें माहाजन गोसावीयांसि दंडवतें करीति : राखसे रामदेवो ते न करीति : गोसावीयां जवळि उभे असति : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘एथ येहीं अवघां नमस्कारू केला : तुम्हीं न करा ते काइ’ : तेहीं ह्मणीतलें : ‘जी जी : आह्मीं कव्हणाहीं न करू : माहादेवा करूं : कां माहादेवातें दाखवी तेयां करूं’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘तुमचा नमस्कारू एथ घेणें आति’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘तुम्हीं माहादेवातें वोळखा’ : ‘हो जी’ : ‘कैसा असे’ : ‘कर्पुर गौरू : व्रषभ वाहान : अर्धांगी पार्वती : पंच वगत्र : त्रीनेत्रू : खड्वांग कपाळ : पींगटा जटै : वाघांबर प्रावर्ण : त्रीशूळ डौर : ऐसा असे जी’ : मग गोसावी वरती वास पाहिली : आणि ह्मणीतलें : ‘हा घेया गा : तुमचा माहादेवो’ सः मग तेहीं पाहीला : तवं गगनमार्गे एतु देखीला : खड्वांग कपाळ : हातीं त्रीशूळ : डबरू : वृषभारूढ : अर्धांगी पार्वती : ऐसा येत देखीला : तेहीं चांग पाहीलें : मग दंडवतें घातली : उठीति तवं न देखति : मग गोसावीयांसि दंडवतें घातलीं : ‘जी जी : गोसावीचि माहादेवो’ : तिये दीउनि गोसावीयांसि दंडवत करीति : ॥ लीळा ३०७ : तथा नामकरणएकुदी : राखसे गोसावीयांचेया दरिसनासि आले : दंडवतें घातलीं : श्रीचरणापासि बैसले : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘तुह्मा नांव काइ’ : ‘जी जी : मज नांव राखसा रामदेवो’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘लंकानाथु : दशानयन ह्मणा : तथा वदन’ : ‘जी’ : नावेक होते : मग निगाले : ॥लीळा ३०८ : जोमाइ नृत्यें दपिनशक्ति देणेंएकुदीसीं : गोसावीयां जवळि वीळिचां वेळीं : भक्तजनें चरस्थळीं करीतें होतीं : रूची अरूचीचीया गोष्टी होत होतीया : कव्हणा कांहीं साहे : कव्हणा काइ रूचे : ऐसे गोसावी आवघेयांतें पूसीलें : जोमाइसीं ह्मणीतलें : ‘जी जी : मज लांकाचे दीढरे आवडे : तथा रूचे : परि साहे ना’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘नृत्य करा : मग साहे ऐसें कीजैल’ : तवं एकीं ह्मणीतलें : ‘जी जी : यांतें जाखेरांचा देव्हारा असे : एं सूपलीया नाचवीति : गावां जाणति : नाचां जाणति’ : ॥ मग लाखाइसाचीय घरीचीं ढीडरीं आणवीलीं : एकांचीय घरूनि सूपलिया आणिलिया : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘नृत्य करा पां : घांसू घेया पा : गावें : नाचावें : सूपली वाजवावी : एथीची वास पाहावी’ : मग तीयें नाचों रिगालीं : तीयें नाचों जाति तवं घांसू घेवों जाति : तवं गाणें ठाके : नाचों जाति तवं सूपली वाजवणें ठाके : ऐसे एकेक ठाकत जाए : तवं तवं गोसावी हास्य करिति : तोंडें उसीसां फेणु निगे : गोसावी इखीत हास्य करीति : ऐसी गोसावी लीळा केली : मग गोसावी पुरें केलें : ते श्रीचरणीं लागली : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘साहाति’ : मग तीयें दीउनि तेयां लांकाचें अन्न पचे :॥लीळा ३०९ : तथा नामकरण : कामाइ पंचनामकरणएकुदीसीं ब्रह्मनाथासि गोसावी बीजें केलें : चौकीं आसन : कामाइसें तिये राणाइसाची बहीण : तीयें दुहवें : आवेया ऐसी डोइ : इउलें ऐसे केस : मग वेखंडे ऐसे दात : मुडीया बाहीयाची चोळी : ऐसीं राणाइसासंसरिसीं : गोसावीयाचेया दरिसना आली : दंडवतें घातली : श्रीचरणा लागलीं : गोसावीयांजवळि बैसलीं : मग गोसावी पूसीलें : ‘यां नांव काइ’ : ‘जी जी : इये नांव कामाइ’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘काइ : कावसना : कामाक्षा : कावीणीचें खेळणें’ : ऐसें गोसावी पांच नांवे ठेवीलीं : ॥लीळा ३१० मांडवी कथानिरूपणएकुदीसी गोसावी मांडवखडकासि बीजें केलें : खडकावरि आसन : मग मांडवरिषीची गोष्टि सांघीतली : ॥ N/A References : N/A Last Updated : June 27, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP