मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|लीळा चरित्र|पूर्वार्ध|भाग २| लीळा २११ ते २२० भाग २ लीळा १९९ ते २१० लीळा २११ ते २२० लीळा २२१ ते २३० लीळा २३१ ते २४० लीळा २४१ ते २५० लीळा २५१ ते २६० लीळा २६१ ते २७० लीळा २७१ ते २८० लीळा २८१ ते २९० लीळा २९१ ते ३०० लीळा ३०१ ते ३१० लीळा ३११ ते ३२० लीळा ३२१ ते ३३० लीळा ३३१ ते ३४० लीळा ३४१ ते ३५० लीळा ३५१ ते ३५८ भाग २ - लीळा २११ ते २२० प्रस्तुतचे भागात श्रीचक्रधरस्वामींचे सेंदुरणीस आगमन झाल्यानंतर भटोबासांस ईश्वरप्रतीत होऊन स्वामींचे खडकुलीस प्रयाण होईपर्यंतचा इतिवृतांत आला आहे. Tags : chakradhara swamilila charitraचक्रधर स्वामीलीळा चरित्र लीळा २११ ते २२० Translation - भाषांतर लीळा २११ : मासरौहीं अवस्थानमग गोसावी मासरौळांसि बीजें केलें : देव्हारचौकीए अवस्थान दीस तीन : तथा मासु एकू : तेयातें एक ब्राह्मणाचें भानवस होतें : तेथ भक्तजना लागि अन्न निफजे : गोसावीयां लागि ताट ए : पुर्वे विहीरिचीये पाळि आंबा : तेथ विहरण होए : पिंपळगांवी वसति : भोगवर्धनीं रामीं वसति : सेलवडे बामेश्र्वरीं वसति : आनवांबनिं अवस्थान : गावां उत्तरे बन : तेथ गुढरू आंबा होता : तेया तळिं गोसावीयांसि अवस्थान : दीस वीस : तथा पाखू : उदयाची बनकर हात पावो धुवावेया एति : हातुपाए धुति : पांच पांच आंबे : प्रतदीनी गोसावीयांसि दर्शन करिती : ॥लीळा २१२ : देमती अंबग्रासूगोसावीयांसि आंबेयातळि आसन : गुढरू आंबा : तेयाचे आंबे खाली लोंबति : गोसावी देमाइसातें ह्मणीतलें : ‘देमती : ऐसेया निजावें : आं करावा : लवकरि आंबा तोंडी रीगैल’ : ऐसें गोसावी दाखविलें ॥लीळा २१३ : तथा भिक्षान्न प्रशंसाएकुदीसीं देमाइसें झोळीया धुवावीया पाटासि गेलीं : अन्न उरले होतें : तें पाटीं पुंजा केलें : मागील कडुनि गोसावी तेथेंचि बीजें केलें : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘हे कोणें गा केलें’ : ‘जी जी : देमाइसीं झोळी धुतली’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘देमती ऐसें कां केलें’ : ‘जी जी : खाती बापूडे मासे’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘देमती जैसीं तुह्मीं तैसे पोरे : हे तुमची महीमा’ : ऐसें गोसावी सीक्षापण केलें : ॥लीळा २१४ : तथा राहावणेंएकूदीसा बाइसां आणि देमाइसा भांडण जालें : मग बाइसी ह्मणीतलें : ‘बाबा : दवडावीया : भांडती असति’ : मग उदियांचि देमाइसें गोसावीयांचेया पुजावसरा आलीं : पुजावसर जाला : मग देमाइसातें गोसावी पाठौं आदरिलें : देमाइसीं वोवीया दोनी ह्मणीतलीया : ‘‘पाउलें ह्मणीतलें : न करीती हरी : कवर्णे परी : जावों आह्मी ॥१॥ : तुझां चरणीं : रंगलें मन : काइसीया कान्हा : पाठविसी ॥२॥ तुझेनि वेधें : असों संभ्रभीतें : निर्वीकारा जोगीयाचें : चीत कैसें निष्ठुर : ॥३॥’’ मग सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘देमती : तुह्मां मासु दीसु असों देइजैल’ : (शोधु) तथा ‘देमती : एथ तुह्मां असों आवडैल तवं असों दीजैल’ : (रामेश्र्वरबास) हे लीळा एथ : ॥ (परशरामबास) गणपतिमढीं ॥लीळा २१५ : द्रीढ पुरूखु आयागमनीं आंब्रवेचानुवादआंबे बहुत सांचले : बाइसीं पुसीलें : ‘बाबा : आंबे बहुत सांचले : काइ करू’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘बाइ : द्रीढपूरूखु जरी येती : तथा एत : तरि आंबेया वेचु होए’ : ॥लीळा २१६ : उपाध्या भेटितवं उपाधे परमेश्र्वरपुरूनि आले : गोसावी क्षेमालिंगन दीधलें : तेहीं दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागले : पुढां बैसले : मग गोसावीयां पूढें सांधों आदरीलें : निगाले तेथौनि श्रीप्रभूचे भेटीवरि सांधीतलें : श्रीप्रभु आंबेयाचा प्रसादु दीधला : या उपरि सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘नेणिजे श्रीप्रभुची लीळा’ : मग गोसावी आपुलीए पांती रसू घालविति : प्रसादु देति : मध्यें बाइसांकरवि आंबे देवविति : मागुतां विळीचां रसू वाढविति : ऐसें गोसावी तृप्तपर्यंत आंबे खावविलें : सराए केली : ॥लीळा २१७ : संसारू मोचकूएकू दीसीं गोसावी वीहरणा बीजें करीत असति : सवें भक्तजनें असति : तवं एका आंबेयाचे आंबे : वरि तैसेचि असति : आणि खालि तैसेचि असति ते दैखोनि भक्तजनीं पूसीलें : ‘जी जी : हे आंबे अवधे काढीत असति : तरि या आंबेयाचे आंबे कोण्ही काढीति ना : नेति ना’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘हा आंबा संसारूमोचकू : तथा मोचकू गा’ : ‘संसारमोचकू ह्मणीजे काइ जी’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘आंबा खाइजे : आणि संसारापासौनि मूचीजे’: मग भक्तजनीं बनकरातें पूसीले : हां गा : हे आंबे अवघे उतरिता : तरि या आंबेयाचे आंबे नूतरा तें काइ’ : तेंही ह्मणीतलें : ‘हे आंबे खाए तेयासि ज्वरू ए : याचे आंबे पाखीरूवेंहीं न खाति’ : ‘तरि हे काइ कीजति’ : ‘ना : हे मीठ मोहरीयांतु दाटीजति : मग एरे वरीखीचे एरें वरीखें खावों एति’ : मग तेयां साच मानलें : ॥लीळा २१८ : (लखुबाइसाते ‘आपुली वाटी धुवा’ म्हणणें)गोसावी चारनेरा बीजें करीत असति : ऐसा मार्गी कव्हणे एके ठाइं गोसावी आसनीं उपविष्ट असति : देमाइसें लखुबाइसें जेवीली : देमाइसें वरि वाटी सांडौनि गेलीं : देमाइसें तेयाची वाटी घेउनि निगों बैसलीं : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘देमती : हे वाटी ठेवा’ : गोसावी लखुबाइसातें ह्मणीतलें : ‘बाइ : वाटी धुवा’ : मग तीयें आपुली वाटी घेउनि गेली : तीयें दीउनि लखुबाइसें देमाइसासि आपुली वाटी धों नेदीति : ॥लीळा २१९ : देमाइसासि जाडी ठेववणेंएकुदीसीं गोसावी मार्गीं बीजें करीत असति : तवं देमाइसाचे डोइए लखुबाइसाची जाडी देखीली : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘देमती : हे जाडि कवणाची’ : ‘जी जी : हे लखुबाइसांची’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘ठेवा’ : तवं मागीला कडौनि एकाइसें आलीं : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘बाई : जाडि वाहावेना : तरि एकू कडीवळ कां खडाना : मग तेंही आपुली जाडि घेतली : तीयें दीउनि आपुली जाडि देमाइसां घेओं नेदीति : ॥लीळा २२० : चारनेरीं वसति : मार्तंड रोगा उपावोमग गोसावी चारनेरा बीजें केलें : पूर्वाभिमुख लिंगाचे देउळ : तेयाचां आंगणीं पींपळु : तेथ गोसावीयांसि आसन : बाइसा गोसावीयांसि अखंड वीनवीति : ‘अवघेयांसि बाबा कांहीं करींति : परि या मार्तंडासि कांहींचि न करौति : ते अखंड खोवीतेंचि असति’ : तीये दीसीं सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘मार्तंडा गावांतु जा : भिक्षा करूनि या : एथ अठरा घास भिक्षा संपादा : तुमचे अठरा रोग धाडीजति’ : (परशरामबास) ॥ : तेहीं ह्मणीतलें : ‘हो कां जी’ : म्हणौनि तेहीं दंडवतें घातली : श्रीचरणा लागले : (शोधु) आपुलेनि श्रीकरें गोसावी झोळीयेसि गांठी घातलीया : झोळि दीधली : मग गांवातु गेले : ते आपुलिए मामिचिया घरा गेले : तेहीं पाय धुतलें : उटिलें : न्हाणीलें : उन्हतिन जेउं सूदलें : मग निजैले : भिक्षा अवसरीं उठीले : ‘मामी तुमतें कांहीं भातु असे : तरि घेउनि या’ : ‘भातु काइ कराल’ : ‘तुम्हां काइ तेणें : आणां पां’ : ‘सांधा ना का : काइ गोसावी बीजें केलें असे’ : ‘ना हो’ : ‘कटकट गा भास्करा : सांघतेति कां : तरि मीं गोसावीयां कारणें उपाहारू निफजवीतीयें’ : ‘ना तें काहीं न लगे : भातु आणां’ : तेहीं भातु रांधीला : झोळी भरिली : गोसावीयापासि घेउनि आले : गोसावीयांसि झोळी दृष्टपूत केली : मग सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘मार्तंडा : हें अन्न एकें घरिचें ऐसें दीसत असे’ : ‘ना जी : गांवीं एकचि पेव काढीलें : सारिखेचि जोन्हळे : अवघां घरि सारिखाचि भातु’ : या उपरीं बाइसीं ह्मणीतलें : ‘काइ बाबा : एथ काइ याची मायबहिण असे : मा ते घालिल : बापुडें उदास भीक्षा करूनि आले’ : गोसावी उगेंचि राहीले : तवं ते मागील कडौनि : ताक : मिठ : भाजी : ऐसे घेउनि आलीं : गोसावीयांसि दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागलीं : बैसलीं : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘बाइ : अन्न अपार धाडीलें’ : तेंही ह्मणीतलें : ‘जी जी : काइसा भातु’ : मागील अवघेंचि सांधीतलें : गोसावी बाइसाची वास पाहिली : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘बाइ : ऐसा असे मुर्ख तुमचा भार्तंडु’ : मग बाइसीं घागरा बांधला : ‘पोरा : तुज कारणे बाबातें उरोधिले’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘एथौनि ह्मणीतलें तें करीतेति तरि तुमचे रोग धाडिजेति : मार्तंडा इतुले दीस आपुले हीताहीत नेणा : परि ऐसें कां होइल : पसेयाचें पाइलिये कां एइल’ : ॥ गोसावीयांसि तेथ वसति जाली : ॥ N/A References : N/A Last Updated : June 26, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP