वेगळं व्हायचंय‌ मला - अंक तिसरा

जुन्या जमान्यातील एक अतिशय गाजलेले नाटक .


[ स्थळ तेंच . सजावटहि तीच . परिस्थिति बरी असली तरी भपका ही अण्णांची वृत्ति नसल्यानें आहे तसेंच घर त्यांचें आहे . माधव टेबलावर लिहीत बसला आहे . कागदाचे बोळे करून टोपलींत टाकतो आहे . पुन्हा लिहितोय ‌. काका बाहेर येतात . माधवजवळ येऊन --]

काका : काय माधव ? लिखाण चाललंय ‌ वाटतं ? सुचतंय ‌ का कांहीं ? नाहींच सुचायचं !

माधव : कशाला आलांत तुम्ही ?

काका : अरे , माझ्यावर कां भडकतोस ? काय म्हणा ! परिस्थितीनंच भडकवलंय ‌ तुला . घरांतल प्रत्येकजण तेंच करतोय . कसं लिखाण सुचेल ! इतरांना काय होतंय ‌ ? तूं मिळवत होतास तोंपर्यंत सगळे तुझे होते . आतां कोण आहे ? आहे कुणी ? कुणी नाहीं . वडिलांचा राष्ट्रपतींकडून गोरव होणार आहे दिल्लींत , म्हणून ते तिथं आहेत चैनीत ; आणि तूं --? तुझी चाललीय ‌ उपासमार . चालूं दे . घाबरूं नको . स्वातंत्र्यांत पडणार्‍या उपासांतहि गंमत आहे . वेगळा झालायस ना तूं ! आतां वेगळाच राहा पायांतला त्राण गेला तरी मान वांकवूं नको . तुझी किंमतच कळलेली नाहीं या घरांत कोणाला , तुझ्या बायकोलासुद्धां . तिला खायला घालणं , हें कर्तव्य समजतेय ‌ ती तुझं . मूर्ख कुठली ! तूं शहाणा आहेस ना ? पटवून दे तिला ! मिळवून आणणं ही जबाबदारी आहे ना तुझी ? झुगारून दे ; असहकार कर . संप करतात ना ते लोक हल्लीं , तसा संप कर . तुझी भाषा खरी करून घेऊन तुकडा पाडून घेतला आहेस ना तूं ? तूं मिळवलं आहेस ना स्वातंत्र्य मोठया सायासानं ? मग ? हें तुझ्या कर्तबगारीनं मिळालंय ‌ हे कळायला नको जगाला ? दिवस गेलेत म्हणे तिल -- तुझ्या बायकोला . तिचे हाल होतील ,-- होऊं देत . तुझी किंमत कळेल का नाहीं ? ( आंतून येणार्‍या सुलभाचा आवाज ऐकून उठतो . ) चला , मी जरा बाहेर जाऊन येतों . तुझ्या बापानं आपल्या घराची जबाबदारी टाकलीय ‌ माझ्यावर . तुझ्यावर कांहीं विश्वास नाहीं त्याचा . येतों मी . [ जातो . ] ( माधव उठतो . चार फेर्‍या मारतो . सुलभा शिवणार्‍या मशिनवर दुपटें शिवत बसते . पुन्हा टेबलबर येऊन बसतो . शिवणाच्या मशिनचा आवाज ऐकून --)

माधव : ए , जरा आवाज बंद कर कीं ! जेव्हां पाहाचं तेव्हां आपली कटकट चालूं असते कानाशीं . मी लिहितोंय् ‌; तुला दिसतंय ‌ ना ?

सुलभा : हो . पण हें कामसुद्धां व्हायलच हवं ना ? दुसरं कोणी नाहीं घरांत दुपटीं शिवून द्यायला .

माधव : अक्कल शिववूं नकोस ! जेव्हां पाहावं तेव्हां घरांत दुसरं कोणी नसल्याच्या टोचण्या कशाला देत असतेस मला तूं ? मला ठाऊक आहे तें .

सुलभा : म्हणूनच मी काम करून ठेवतें आहें . पुढं लागणार्‍या गोष्टी आहेत या . नंतर कोण शिवून देणार आहे दुपटीं ?

माधव : मग काय मी लिहिणं बंद करूं ? बाळंतपणासाठीं डॉक्टरला बिल द्यायचंय ‌ ना ? का हीं दुपटीं विकून भर करणार आहेस त्याची ? काम करूं दे मल जरा ! ( ती उठते . मान हलवत व हुंदका दाबून आंत जाते . माधव पुन्हा उठतो . पुन्हा चार बोळे , पुन्हा चार फेर्‍या , पुन्हा जाग्यावर येऊन बसतो . एवढया अवघींत मंदा पलीकडच्या घरांतून अण्णांचे . सुरेशचे आणि स्वतःचे कपडे आणून घडया करून ठेवते . इकडे माधवच्या दारार्शी टक् ‌ टक् ‌ ऐकूं येते . ) अरे , कोण टक ‌ टक् ‌ करतंय् ‌ ? काय कटकट आहे ! कोण आहे ? [ कोटिबुद्धे आंत येतो . ]

कोटिबुद्धे : मी आहे . सहस्त्रबुद्धे आणि मंडळी ,-- किराणा आणि भुसार मालाचे व्यापारी ,-- यांच्या दुकानांत असतों ; बसुली -- कारकून . मी कोटिबुद्धे .

माधव : काय त्रास आहे हा ! मी कामांत आहें दिसत नाहीं तुम्हांल ?

कोटिबुद्धे : नाहीं . तुम्हांला पाहण्यासाठीं नाहीं आलों मी ; मालकांनी विल मागितलंय ‌.

माधव : देतों म्हणावं . का बुडवून पळतों काय पैसे ? मी येऊन भेटतों . म्हणावं . निरोप पोहोचवा माझा त्यांना .

कोटिबुद्धे : त्यांनीं मला पैसे घेऊन यायला सांगितलं आहे तुमचा निरोप नाहीं . तीन -- चार बायदे झाले आत्तांपर्यंत . या घरांतला बायला कधीं चुकलेला नाहीं .

माधव : एवढी किंमत किंमत नाहीं का माणसाच्या शब्दाल ?

कोटिबुद्धे : शब्द ठेवला जात होता तोंपर्यंत : होती . आपले वडील शब्द देत असतील तर चालेल . मग काय तें सांगा .

माधव : जा बंधूं इथून ! याद राखा पुन्हां घरांत याल तर . लिहीत असतांना त्रास द्यायला !

कोटिबुद्धे : घेणेकर्‍यांचा त्रास होतो , त्यानं देणेकरी होऊं नये . इतकी कटकट होत असेल माणसांची तर माथेरानला बंगला बांधा एक . पण त्याआधीं आमचं बिल भागवा .

माधव : देत नाहीं पैसे ! फिर्याद करा म्हणावं ! चालते व्हा इथून ! सम्य माणसाला बाजारांत अब्रू असते , ती बाहेरच्या माणसांना मिऊन घरांत बसत नाहीं . तिलाच आम्ही पत म्हणतों . क्रिडित ! क्रिडित !!

माधव : गेट आऊट आय से ! फिर्याद करा म्हणून सांगितलं ना ? निघा !

कोटिबुद्धे : ठीक आहे ! हो , म्हणजे हें आतां रीतसर झालं . कायदेशीर झालं . येतों . ( जातो आणि माधव पुन्हां लिहायला बसतो . दरवाजांत सुलभा )

सुलभा : कोण आलं होतं ?

माधव : तुला काय करायचंय ‌ ? का आलीस तूं पुन्हां ?

सुलभा : असं चिडचिडल्यासारखं काय करतां पुन्हा पुन्हा ?

माधव : तुला काय हवं असेल तें सांग , जास्त बडबड नको . कां आलीस इथं ?

सुलभा : आज मला बरं वाटत नाहीं सकाळपासून , तुमच्याजवळ दिलासा मागायल यायच नाहीं तर जायचं कोणाजवळ ? माझी हौस नाहीं . माझे डोहाळे नाहींत , कांहीं मागत नाहीं मी . पण गरज तरी भागवायला नको का कुणीं ? या परिस्थितींत आम्हां बायकांना फक्त आधार हवा असतो . ( ती जवळ येते . माधव उठतो . ) तुम्हीसुद्धां असे वागायला .

माधव : माझ्या वागणुकीवर चर्चा नको . जो उठतो तो मला कसले उपदेश करतो ?

सुलभा : उपदेश नाहीं करत . पण डॉक्टरकडे जायची वेळ आली . तर व्यवस्था नको का करून ठेवायला . कांहीं चमत्कारिक प्रसंग आला . तर मामंजीसुद्धां नाहींत इथं !

माधव : त्यांचं नांव घेऊं नकोस .

सुलभा : मग , जाऊं कुठं मी ?

माधव : म -- म . मीच जातों तोंड काळं करून तरी . एक अक्षर सुचत नाहीं मला , लिहून झाले नाहीं तर पैसे कुठुन आणूं ? कुठुन बिल भागवूं डॉक्टरचं ? ( ती डोळे पुसते ) रडा , जेव्हां पाहावं तेव्हां रडणं , कचकच . माझ्या मनाचा कोणी विचारच करीत नाहीं . ( कोट चढवतो . ) कामाला चाललोंय ‌ मी . जातांना जरा चेहरा हंसरा ठेवा , अपशकुन नको तुमच्या रडण्याचा . ( तो जातो . मंदा आपलें काम करते आहे आणि इकडे सुलभा मशिनवर कपडयांचे तुकडे तुकडयांना जोडून दुपटें शिवटे आहे . शिवतां शिवतां म्हणते --)

सुलभा : भेटाल का कोणी माझ्या माणसांना माहेरीच्या ।

लोक सुखी आहे सांगा , सावलींत सासरीच्या ॥१॥

माझ्या माहेराची वाट , नाही आडवळणाची ।

नाहीं कलहाचं ऊन . छाया मायेच्या वेलीची ॥२॥

दोन भाऊ भावजय . माझे बाबा आणि आई ।

एका ताटांतला घांस , पांचामुखीं गोड होई ॥३॥

तिथें नाहीं हेवा दावा , नाहीं भांडणतंडण ।

सर्वांसाठीं आहे एक , एका मातीचं अंगण ॥४॥

चार जोडलेले तुकडे . पांधरुण तान्हुल्याचें ।

मनें मनें जुळुनी झालें , महावस्त्र माहेराचें ॥५॥

दूर राहिलें माहेर . दिसेनाशी झाली वाट ।

आम्हां वेडयाबायकांदी . सासराशीं जन्मगांठ ॥६॥

पूर आसवांचा आल , वाट वाहून जायाची ।

नको नको आठवण , आतां वेडया माहेराची ॥७॥

जरी भेटाल कोणीहि , माणसांना माहेरीच्या ।

लेक सुखी आहे सांगा , सावलींत सासरीच्या ॥८॥

( पलीकडे ओव्य ऐकत मंदा उभी आहे , तिचे डोळे भरून आलेले आहेत . आणि डोळे मरून आलेले असल्यामुळेंच बोट सुईखालीं येतें , आणि ती ओरडते -- )

सुलभा : आई ‍ ऽऽ !

मंदा : ( फ्लीकडून ) काय झालं वहिनी ?

सुलभा : कुठं काय ? कांहीं नाहीं .

मंदा : मग एकदम आई म्हणून म्हणालीस ? आठवण आली का माहेरची ?

सुलभा : हो .

मंदा : पण अण्णांना तर सांगत होतीस तूं , इथ आल्यापासून तुला माहेरची आठवण येत नाहीं असं .

सुलभा : हें सासर आहे असं वाटत नव्हतं तोंवर नव्हती येत . तुमचं काय चाललंय ‌ ?

मंदा : सुरेशची वाट पाहतें आहें . आज रिझल्ट आहे आमचा .

सुलभा : मग तुम्ही नाहीं गेलांत ?

मंदा : घरीं कुणीच नाही . जाऊं कशी दार उघडं ठेवून ! काकाहि गेलेत रिझल्ट बघायल . दादा आहे का घरीं ?

सुलभा : नाहीं . आत्तांच बाहेर गेलेत .

मंदा : कुठं ?

सुलभा : कसं सांगूं वन्सं ! घरीं असतात तेव्हां नेहमीं संतापलेले असतात ; विचारून कधीं जात नाहींत , सांगून कधीं येत नाहींत !

मंदा : म्हणजे एकटी आहेस तूं ?

सुलभा : एकटी कुठंय ‌ ? एकटीसुद्धां नाहीं . या घरांत माणसं राहतात , असं इथं वाटतं का कुणाला ? तुम्हीसुद्धां चार दिवसांनीं आज बोलतां आहांत माझ्याशीं . एका चाळींत ती बिर्‍हाडं असतात ना ?-- एकाची दुसर्‍याशीं ओळख नसते ,-- तसं वाटतं या घरांत हल्लीं .

मंदा : मग काय करायचं वहिनी ! चुकून तुझ्या घरांत आलें आणि अचानक दादा आला , तर हंच तसं तोंड वाजेल त्याचं . परवां नाहीं नाहीं तें बोलला अण्णांना .

सुलभा : नाहीं नाहीं तें रोज ऐकतें मी हल्लीं .

मंदा : पण अण्णा जातांना सांगून गेलेत , तुला आतां कसलाहि त्रास होतां कामा नये .

सुलभा : पण इथं माझा त्रास दुसर्‍याला होतो त्याला काय करायचं ?

मंदा : किती तारीख दिलीय ‌ डॉक्टरांनीं >

सुलभा : सत्तावीस .

मंदा : सत्तावीस ? म्हणजे आलीच कीं ! पण वहिनी , पहिलं वाळंपण माहेरीम करतात ना ? तूं का नाहीं गेलीस ?

सुलभा : ( डोळे पुसून ) आलं होतं पत्र बापूंचं , तूं इकडे निघून ये म्हणून , पण नाहीं गेलें .

मंदा : कां ?

सुलभा : कसं सांगूं वन्सं ? यांनीं पाठवतों म्हणून सांगितले . आणि . वेळीं . ऐन वेळीं नाहीं पाठवलं .

मंदा : स्वभावच विचित्र आहे त्याचा !

सुलभा : स्वभावापेक्षां परिस्थिति . घरीं जायचं म्हटलं तर दोन धड पातळंसुद्धां उरलीं नाहींत मला . तिथं जायचं म्हणजे भाडेंखर्च आला , देणं करणं आलं आणि इथं तर बँकेच्या पुस्तकावर ब्रह्मांड उभं आहे ,-- शून्याच्या आकारांत !

मंदा : कुठल्या दवाखान्यांत नांव घातलंय् ‌ ?

सुलभा : घालणार होतें समोरच्याच ; पण डॉक्टरांनीं मामंजीचा हवाला मागितल तेव्हां दुसरीकडं कुठं तरी . पाठवायल हवं . म्हणून पैशाची व्यवस्था करायला गेले असतील .

मंदा : अण्णांच्याकडून का नाहीं घेतले पैसे ?

सुलभा : थोरल्या मामंजींच्या सांगण्यावरनं . वडिलांच्याकडानं पैसे घेण्यापेक्षां ‘ कर्ज काढ जा साबकाराकडुन ’ असं कांहीं तरी भलतंच सांगत असतात ते . या आठवडयाचं धान्यहि आणलं नाहीं अजून , गेल्या महिन्याचं बिल पोहोंचलं नाहीं म्हणून .

मंदा : इतके दिवस कधीं नव्हतं अडवलं सहस्त्रबुद्धयांनीं . इतकासुद्धां घरावर विश्वास नाहीं त्यांचा ?

सुलभा : त्यांचा विश्वास किनई वन्सं , घरावर होता . पण मामंजी यांच्या पाठीशी नाहींत हे कळल्यापासून हात काढून घेतलाय ‌ त्यांनीं . जाऊं दे तें . जन्मभर आतां असंच चालायचं .

मंदा : काळजी करूं नको वहिनी , सगळं व्यवस्थित होईल .

सुलभा : जशी इच्छा ईश्वराची ! माझं एक काम करतां वन्सं ?

मंदा : सांगितल्या कामाला मी कधीं नाहीं म्हटलंय ‌ का तुल ? काय करूं ? कांहीं शिवणाटिपणाला मदत करूं का ?

सुलभा : इकडे येऊन ? या घरांत ? नको ; माझं काम दुसरंच आहे . कुणीं ऐकत नाहीं ना तिकडं ?

मंदा : नाही कुणी .

सुलभा : कुणी नाही ना घरांत ?

मंदा : कुणी आंलच नाही अजून . काय हवंय ‌ तुला ?

सुलभा : मला ? मला किनई वस्नं , थोडंसं लोणचं हवंय ‌, गुपचुप आणून द्या .

मंदा : गुपचूप कशाला ? त्याला कांहीं चोरी आहे ? तूंच तर वर्षाचं लोणचं घालून ठेवलं आहेस घरांत . अन ‌ त्याच दिवशी वेगळे झालांत . तुमचंच आहे ते .

सुलभा : या वर्षाच्या कांहींच संबंध नाही माझ्याशी . या वर्षींत मी नाहीच आहे . आयुष्यांतून कमी झाल्यासारखं वाटतंय ‌ हे एक वर्ष , वर्षाचं लोणचं घालून ठेवलं आहे ना घरांत ? खरंच आहे ते . सबंध वर्षाचंच लोणचं घालून ठेवलंय़ू भवितव्याच्या बरणींत ! नासलंय सगळं वर्ष .

मंदा : असं काय बोलतेस वहिनी ?

वे . ५

सुलभा : चमत्कारिक बोलले का कांहीं ? आज सकाळपासनं बरंच वाटत नाही मला .

मंदा : मी डॉक्टरना बोलावूं का ?

सुलभा : दुपटी विकून भर करूं त्यार्‍या बिलाची

मंदा : काय म्हटलंस ?

सुलभा : काम म्हटलं ? कांहीं म्हटलं . मीं ? कुठं काय म्हटलं ? लोणचं आणून द्या असं म्हटलं .

मंदा : लोणचं ?

सुलभा : हो . दादरा नीट बांधून ठेवा बरणीच्या तोंडाला . नाहीं तर बुरा येईला . असंच म्हटलं .

मंदा : तसं नाहीं म्हटलंस ; लपवून कां ठेवतेस वहिनी ?

सुलभा : लपवून कां ठेवतें ! जें हौसेनं सगळ्यांना सांगायचं . तें सगळंच लपवून ठेवतेय ‌ मी . सासरीं आहें ना मी . माहेरीं असतें तर किती लळे पुरवले असते आईनं माझे ! आईनं विचारलं असतं , काय हवंय तुला सुलु ? चांदण्यांत जेवावंसं वाटतं का ? आंबट तिखट कांहीं करून हवंय ‌ का ? म्हणाली असती , माझी मुलगी वाळलीय ‌ , करत जाऊं नकोस बाबी इतके कष्ठ . बाधा म्हणाले असते , डॉक्टरकडे चल . टॉनिक घेत जा . छोटा बाळकृष्ण घरी येणार म्हणून दादानं माझी थट्टा केली असती . वहिनींनीं डोहाळजेवणे केलीं असती . पहिलटकरणीला फार त्रास होतो म्हणतात . मला भीति बाटते . सारखी भीति वाटते . आई . नाहीं का ग येतां यायचं मल तुझ्याकडं ? कोणी नाही काळजी करायला . कोणी नाहीं जपायला . स्वतंत्र झालो ना आम्ही . आईनं तर्‍हेतर्‍हेचीं दुपटीं शिवलीं अससीं . अंगडी शिवली असतीं , टोपडी शिवलीं असतीं . तान्ह्या मुलाच्या अंगावर नवा कपडा घालायचा नसतो , म्हणून वहिनींनी आपल्या मुलाचीं सुद्दाम जपून ठेवलेलीं अंगडीं टोपडीं दिलीं असतीं . इथं मीच शिवतेंय ‌ दुपटीं अन् ‌ कटकट होतेय ‌ त्यांना , वन्सं , एकदां वायां गेलेले कपडे उपयोगांत आणण्यासाठीं सुताच्या धाग्यांनीं तुकडयांना तुकडे जोडून दुपटं शिवतां येतं , तसं एकदां वायां गेलेलीं माणसं उपयोगांत आणण्यासाठी जिव्हाळ्यांच्या धाग्यांनीं घराल घर जोडून एकत्र कुटुंब नाहीं का करतां यायचं ? मामंजी म्हणतात , आहे त्या परिस्थितींत समधान मानावं , म्हणजे दुःखाचं ओझं हललं होतं . इथं काय समाधान मानायंच ? धाकटे मामंजी म्हणतात की घरं वेगळीं होतात नेहमीं बायकांच्यामुळं . पण या घरांत तसं नाहीं हो ! मला थोडंसं लोणचं देतायू ना ? ( बाहेरून सुरेश प्रवेश करतो . )

सूरेश : अक्का , काका झिंदाबाद ! कर्नक काका झिंदाबाद !! वेगळं घर झिंदाबाद !!

मंदा : ए , ओरडतोय केवढयानं !

सुरेश : तोंड बंद कर , पेढे खाऊन ,

मंदा : रिझल्ट आला ?

सुरेश : येस ‌ ! निकाल लागला .

मंदा : फर्स्ट क्लास ?

सुरेश : येस ‌ !

मंदा : वहिनी , निकाल आला ग .

सुलभा : तुकडे तुकडे जोडुनी शिवतें , तुझें पांघरूण बाळा ।

ठिगळ कोणतें लावूं न कळे . विरलेल्या आभाळा ॥

( पलीकडे काका येऊन तिच्यापुढें उभे राहतात . )

सुरेश : आधीं पेढे खा . ( पुडा फेकतो . काका झेलतात ) त्या दादाला म्हणावं , बरं झालं वेगळा झालास तें , आमच्या पदरांत फळ पडलं .

मंदा : असं बोलूअ नको रे ! वहिनीला वाईट वाटेल .

सुरेश : ज्यांना वाईट वाटत असेल . त्यांनीं बसावं मूग गिळून , त्या काकाच्या भीतीनं . आम्हांला आनंद झालाय ‌ आम्ही बोलणार . घरं वेगळीं झालीं . आमचा फायदा झाला . काकांची कवळी खरी ठरली . खरे दांत आहेत कुठं त्यांना ? खायचे वेगळे , दाखवायचे वेगळे . त्यांचे दांत खोटे आहेत . कुठं त्यांना ? खायचे वेगळे , दाखवायचे वेगळे . त्यांचे दांत खोटे आहेत . खोटी बत्तीशी खरी ठरली . बापाचं नांव गाजवणार म्हणत होते ना ? घ्या ; गाजवलं म्हणावं ! न बघतांच काय दिवे लावणार तें दिसतंच आहे , म्हणत होते ना ? लावले दिवे म्हणावं ; आतां बघा , वहिनी , काका आले म्हणजे दोन पेढे द्या त्यांना , ख म्हणावं पेढे .

सुलभा : माझ्या माहेराची वाट , नाहीं आडवळणाची ।

( काका तिला हातानं थांबवतो . )

मंदा : सुरेश !

सुरेश : का ग ? असं का करतेय ‌ वहिनी ?

मंदा : कोणास ठाऊक ? सकाळपासून असंच करतेय ‌. मघाशीं लोणचं मागत होती . एकसारखी रडतेय ‌.

सुरेश : रडतेय ‌ वहिनी ? कां ?

मंदा : डॉक्टरचं विल द्यायलासुद्धां तिच्याजवळ पैसे नाहींत म्हणून .

सुरेश : मग त्यांत काय ? मी देतों . आमचीच वहिनी आहे .

मंदा : तूं देतोस ? मग ते काका यायच्या आंत दे . नाहीं तर ते देऊ देणार नाहींत .

सुरेश : अग जा ! त्याला नाहीं दाद देत मी आतां . व्हिमजिकलच आहे ! आपल्याल ज्या जगाची माहिती नाहीं , त्यांत तोंड घालावं कशाला ? अण्णा नाहींत इथं ; आता घराचा मालक मी आहें , सुद्दाम त्यांच्या देखत देतों . काय करतात बघतों .

मंदा : तुझ्याजवळ आहेत ?

सुरेश : हो . अण्णांनीं नाहीं का दिलेले ? पास झालों तर सूट शिवण्यासाठीं . ते वहिनींच्यासाठीं खर्च केले आणि तें अण्णांना कळलं तर त्यांच्या डोळ्यांतून आनंदाचं पाणी नाहीं का यायचं ? अण्णांना कळलं तर त्यांच्या डोळ्यांतून आनंदाचं पाणी नाहीं का यायचं ? मुद्दाम काकांच्या देखत देतों . होपलेस माणूस आहे ! माझ्यासमोर येऊं दे . या घरची चूल . त्या घरचा तवा ; यांची पोळी भाजतेय ‌ खुसखुशीत . चावायला अडचण नको . दांत खोटे आहेत ना !

सुलभा : माझ्या माहेराची वाट , नाहीं आडवळणाची ।

[ आंत जाते . ]

मंदा : सुरेश , आतां गप्प बसायला काय घेशील ?

सुरेश : मी नाही ; आतां गप्प बसायचं त्यांनीं . वहिनी आपल्याशीं सरळ कां नाही बोलत , माझ्या घ्यानांत आलंय ‌, चुकून ती आमच्याशीं बोलायल लागली , अन ‌ ते काका आले तर पेटवून देतील ना सगळं जंगल ! वहिनीला म्हणतील , " किंमत नाहीं का ग तुला नवर्‍याची ? सासर्‍याची फूस आहे . म्हणून नवर्‍याची बेअब्रू करतेस काय ?" त्या बिचार्‍या कांहींच करायच्या नाहींत ; अन् ‌ हे जाऊन सांगतील दादाला . " तुझी बायको सासर्‍याची मदत मागतेय ‌. घेऊं नको त्याची मदत . स्वतंत्र आहेस ना तूं ! आपल्या पायावर उभा राहा . " इकडं अण्णांच्याकडं आग लावतील . " पोराला मदत करत नाहींस , बाप कशाला झालास ? हात दे पोराल . " बस्स , यांनीं हात द्यावा त्यांनीं पाय काढावा . दोघं दोन बाजूला कोलमडले म्हणजे वहिनी बसेल रडत , आणि काका राहतील करमणूक बघत त्यांच्या रडण्याचं ह्यांना काय दुःख ? अण्णांच्या घरची होळी , दादाच्या घरची पोळी , काका वाजवतोय ‌ टाळीं ! आपण आतां ठरवलंय ‌, जाम ऐकायचं नाहीं त्या काकाचं . आमचं घर आहे हें . कसं ठेवायचं तें आम्हांल कळतं . नो डिक्टेटरशिप इज वॉन्टेड ! नाऊ कम्फ्लीट डेमॉक्रसी ! आमच्या घराच्या समृद्धीसाठीं यांच्या योजनांची आम्हांला गरज नाहीं !

काका : ( टाळ्या वाजवत इकडे येत ) छान बोललास ! जरा चुकलास , गरज प्रत्येकाला प्रत्येकाची असते बेटा , पण त्याची जाणीव आयुष्यांत केव्हां तरी व्हावी लागते . तुझं सगळं बोलणं ऐकलंय ‌ मीं .

सुरेश : थँक् ‌ यू ! तें मला माहीत नव्हतं , म्हणून मी बोललों .

काका : कां ? समोर बोलायला भितोस ?

सुरेश : आतां नाहीं भीत ; कारण आतां तुम्हीं सगळं ऐकलेलं आहे .

काका : ते नाही उपयोगी . वडिलांचा उपमर्द तोंडावर करण्यांत खरी मर्दाई आहे .

सुरेश : सॉरी ! मर्दाई नाहीं . तुमचा आमचा शब्दकोश वेगळा आहे . आम्ही त्याला निर्लज्जपणा म्हणतों ; तो माझ्याजवळ नाहीं .

काका : म्हणजे तुम्हांला लाज आहे ?

सुरेश : ऑफ कोर्स ! याचाच अर्थ तो . आमच्या कॉलेजमधल्या कुठल्याहि मुलीला विचारा . त्या आमच्याकडं बघतांना लाजत नाहींत , इतका मी त्यांच्याकडं बघतांना लाजतों .

काका : आश्चर्य आहे !

सुरेश : म्हणूनच तें खरं आहे .

काका : तें मला कसं कळणार ?

सुरेश : त्यांत काय अवघड आहे ? विचारा कोणालहि .

काका : मी ? मी कसं विचारूं ?

सुरेश : तुम्हांला काय ? ना ओळख ना देख , तुझा बाप माझा लेक ; असं नातं तुमचं सगळ्या जगाशीं . तुम्हांला काय ? कुठल्याहि मुलीचा ढळलेला पदर भर रस्त्यांत तुम्ही सरळ करतां .

मंदा : कांहीं तरीच काय बोलतोय‌स सुरेश ?

सुरेश : मीं पाहिलंय ‌ स्वत : !

काका : मग काय विघडलं त्यांत ? बरा दिसत नाहीं ढळलेला , म्हणून सरळ केला .

सुरेश : पण तुमचं लक्ष गेलं कसं नेमकं तिकडं ? त्या कुंदा गुप्तेच्या अंगाला हात लावल नसता तुम्ही तर मी इतका रागावलोंहि नसतों . अरे , भलत्या मुलीच्या खोडया काढायची गरज काय यांना ?

काका : खोडया ? अरे ! इतका धीटपणा अंगीं असायला , नतिक सामर्थ्य लगतं !

सुरेश : हे खूप आहे . मुलीच्या पदराल हात लावण्यांत कसलं आहे सामर्थ्य ? तें काय शिवधनुष्य उचलयचंय ‌ ?

काका : तूं लावून पाहा .

सुरेश : मला लाज वाटेल .

काका : म्हणजे मला वाटाली नाहीं ?

सुरेश : तें तुम्ही पाहा .

काका : तिला काय वाटलं ?

सुरेश : तिल कसंसंच वाटलं !

काका : तिची -- तुमची ओळख ?

सुरेशा : होती .

काका : होती म्हणजे ?

सुरेश : आज संपली .

काका : कां ?

सुरेश : तुमच्या धीटपणामुळं , नैतिक सामर्थ्यामुळं ! तुम्ही आमच्या घरीं राहतां हें तिला कळल्यामुळं

काका : अरे , अरे ! म्हणजे तुमचं आतां शिक्षण नीट होणार . अरे , अरे , अरे !

सुरेश : काळजी करूं नका . तुमच्या कुठलहि फ्लँन यापुढं मीं पार पडूं देणार नाहीं , हाच माझा मास्टर -- फ्लँन . उलट यामुळं तर तिची माझी ओळख जास्त पक्की झाली आहे .

काका : संपल्यामुळं ?

सुरेश : येस ‌ ! हीरो आणि हिरॉईनची ओळख पक्की व्हायका अशीच एखादी सिच्युएशन यावी लागते . दादाच्याच पिक्चरमध्यें पाहिलंय ‌ मी .

काका : आतां कशी पक्की होईल ?

सुरेशा : त्यांत काय ? पुढच्या वर्षीं तर आम्ही दोघं एका क्लासमध्यें , ती आणि मी बरोबर , बी . ए . ! बँचलर ऑफ आर्टस !! लगेच दोन यर्षोत एम . ए . ! मँरिड अँट लास्ट !! फिनिशड ‌. शिवाय बरोबर .

मंदा : बरोबर कसे ? अरे कुंदा यंदा ज्युनिअरल आहे ना ?

सुरेश : म्हणूनच सांगितलं . पुढल्या वर्षीं आम्ही एका क्लासमध्ये .

मंदा : म्हणजे तूं नापास झालास की काय ?

सुरेश : नाहीं . ड्रॉप घेतलाय ‌ ; पुढल्या वर्षीं क्लास मिलवण्यासाठीं !

मंदा : अरे , मघाशीं तूं पेढे कसले दिलेत ? फर्स्ट क्लास फर्स्ट आल्याचं सांगितलंस ते कोण ?

सुरेश : ती तूं . फर्स्ट क्लास तूं आली आहेस .

मंदा : मी !

सुरेश : येस ‌ .

मंदा : म्हणजे तूं नापास झालास ?

सुरेशा : जा , जा , जा , हुशार आहेस . आतां वाजवा टिमक्या ! आमचा भाऊ गाढव , आम्ही शहाणे . पुन्हा पुन्हा विचारतेय ‌. तूं नापास झालास ? झालों बरं बाई ! पास होऊन तुम्ही काय दिवे लावणार तें ठाऊक आहे . लावून लवणार लग्नच कुणाशी तरी . जा . उगीच फुगून जाऊं नको . आणखीन ‌ फुगलीस तर लग्नाल अडचण पडेल . लोणचं हवं आहे ना वहिनील ? आणून दे ! नाहीं तर स्वतःच्या सुखांत तिचे हाला विसरशील .

काका : कसलं लोणचं ?

सुरेश : आंब्याचं .

काका : कुणाला ?

मंदा : वहिनीला .

काका : द्यायचं नाहीं .

सुरेश : अक्का , आपण मुलं कुणाची आहोंत ? अण्णांचीं . हे कोण आहेत ? काका . इतके दिवस होते का इथं ? मग ह्यांचं ऐकायचं आपल्याल कारण नाहीं . जा तूं . जा , जा . शहाणी माझी बाई ती . पास झालीस . जा . जा . [ मंदा आंत जाते . ]

काका : आपल्या उत्साहाला इतकं उधाण आलंय ‌ तें आपण नापास झाल्यामुळं कीं काय ?

सुरेश : येस ‌ !. तो पिंडच आहे माझा . दुःखांत सुख .

काका : अरे , पण तूं नापास झालास असं कळलं , तर अण्णांना काय वाटेल ?

सुरेश : नापास झालों असंच वाटेल /

काका : म्हणजे तुम्हांला त्याचं सुखदुःख कांहींच नाहीं ?

सुरेश : नाहींच . पैसे मिळवून आणायला त्यांना कष्ट पडतात थोडेच ? पैसे वायां गेलेत ना त्यांचे ! जाईनात . पश्वात्ताप त्यांनीं करायचा , आम्हांल जन्म दिलाय् ‌ ना ? तुम्हीच म्हणत नव्हतां का , आम्ही दिवे लावणार म्हणूनबघा , लवले का नाहीं ? वडिलांचं नांव गाजवणार ! गाजवलं का नाहीं ? वडील गेले आहेत दिल्लीला , राष्ट्रपतींकडून कौतुक करून घ्यायला . मोठा मुलगा दरिद्री असून स्वातंत्र्याचा हक्क सिद्ध करतोय ‌; दुसरा मुलगा अक्कल नसून गुण उधळतोय ‌ ,-- म्हणजे मी . वहिनीच्या बाळंतपणाला पैसे नाहींत म्हणून ती घरींत तडफडते आहे . मुलीच्या आयुष्यांत पुढं काय तें ठरलेलंच नाहीं . वा !. काय आदर्श चित्र आहे संसाराचं ! खरं आहे का नाहीं . काका ?

काका : तुमच्या वडिलांच्या जागीं जर मी असतों तर --

सुरेश : आम्ही जन्मच घेतला नसता .

काका : दुसरं कोणी असतं तर इतकी बडबड ऐकून त्यांनीं तुम्हांला शूटच केलं असतं .

सुरेश : म्हणूनच त्यांच्या जागेवर ते आहेत . त्यांनीं या वेळीं मला पोटाशीं धरलं असतं आणि गद‌गदूग रडले असते . तें कां तें तुम्हांला कधींच कळायचं नाहीं . कारण जन्मभर तुम्ही एकटेच आहांत . बापाल मुलाबद्दल काय प्रकारचा जिव्हाळा असतो त्याची तुम्हांला जाणीवच नाहीं .

काका : आपल्यापुढं कोणीं बोलायचं ?

सुरेश : या घरांत कुणींच कुणाल बोलायचं नाहीं . दुसरा करील तें डोळे मिटून पाहायचं !

काका : वडिलांचाच कित्ता गिरवतां आहांत आपण .

सुरेश : हा माझ्या वडील भावाचा कित्ता आहे .

काका : चाललंय ‌ तें छान चाललंय ‌ ! दोष कुणीं कुणाला द्यायला ?

सुरेश : तुम्हांला काय ? समोर दिसेल त्याल द्यायचा दोष , बाहेरचं जग हेंच करणार . त्यांचेच प्रतिनिधि तुम्ही . करा थट्टा ! सहानुभूतीनं विचार करायचं तुम्हांला कारण काय ? तुमचं म्हणणं बरोबर आहे . मीं पासच व्हायला हवं होतं ! ऐन अभ्यासाच्या मोसमांत दादा वेगळा झाला होता , आमच्या वडिलांना वाटेल तें बोलत होता : एकीकडं आम्हीं ते ऐकत होतों आणि दुसरीकडं संस्कृतच्या ऋच्या पाठ करत होतों . स्वतंत्र झाल्यामुळं आलेल्या दारिद्यानं , नवरा बायकोचा छळ करतोय ‌ हें द्दश्य शेजारच्या खोलींत बघात होतो ; आणि त्याच वेळेल विरहानं पीडित झालेला कालिदासाचा यक्ष मेघाला दूत करून आपल्या पत्नील पाठवत असलेल्या निरोपाचं रसग्रहण करत होतों . वातावरण सगळं तंग होतं . आमचा अभ्यास चाललेला होता ; आणि त्याच वेळेला तुमच्यासारखा पाहूणासुद्धां आम्ही काय दिवे लावणार तें कळतंच आहे हें सुनावून भविष्याचा आधार आमच्यापुढं ठळक करून ठेवत होता . सगळेच निराधार . सगळेच ऐकून घेणारे , सगळेच पेंचांत , थट्टा करतांना तुमचं काहींच नुकसान होत नव्हतं . ऐकणाराचं होतंय का याचा विचार करायचं तुम्हांला काहींच कारण नव्हतं . तरी आम्हीं पासच व्हायल पाहिजे होतं . तुमचं बरोबर आहे . पण कां ? कशासाठी ? हें शक्य आहे का याचा कां कुणीं विचार करत नाहीं ? तुम्हां मोठयांच्या झगडयांत आम्हां छोटयांचीं मनं कां अशीं चुरगाळून टाकतां ? कसले आदर्श मांडतां आमच्या डोळ्यांपुढं हे ? मी उडाणटप्पू असेन , मूर्ख असेन , उद्धट असेन ; पण मी लहान आहें हें कसं कुणाच्या लक्षांत येत नाहीं ? नाहीं येणार , कारण हॆं कुणाला कळतच नाहीं . आमच्या अण्णांना तें कळलं असतं , आणि म्हणूनच म्हणालों मी , कीं ते मला पोटाशी धरून गदगदां रडले असते .

काका : ( हंसतो ) बरोबर आहे तुझं !

सुरेश : तरी तुम्ही हंसतां आहांत !

काका : हो , मी हंसणारच . कारण विरोध करून वस्तुस्थिति दाखवायची ही माझी कँरँक्टर आहे . पण हें ज्याला पटायला हवं , त्याला पतलेलं नाहीं . म्हणून मी इथं राहिलेलों आहें . नाहीं तर तुमचा कोवळ्या कोवळ्या मनाचा कोंडमारा करायल अरे , मी राक्षस का आहें ? हुशार आहेस बेटा ! हुशार आहेस !

सुरेश : पोल्सन नको ! मी हुशार नाहींय ‌. ही तुमची पॉलिसी आहे . कुठल्या जभिनींत हरभर्‍याचं झाड रुजतं तें तुम्हांला ठाऊक आहे .

काका : अरे , मला ज्याला सांगायचंय त्याला तें कळत नाहींय ‌, तुला कळतंय ‌ , उपयोग काय ? कुटुंब विभक्त केल्यानं काय यातना होतात . याचा त्याला प्रत्यक येईपर्यंत मला इथं थांबायचंय . तुम्हांला माझा राग येतो , ठाऊक आहे . पण काय करूं ? तुझ्या अण्णांसाठीं हें सगळं करायचं . कारण तीच माझी भूमिका आहे . राग येईल असं वागायचं आणि प्रेम कसं करावयांच तें शिकवायचं .

सुरेश : प्रेम तुम्ही शिकवणार ! जमलं ! तुमचं काम नाहीं तें . प्रेम करतात अण्णा नेहमीं . संतापानं प्रेम पटतं का काय कुठं ?

काका : हो . कुठं कुठं पटतं . तांब्याचि तार वांकवायला दोन हात पुरतात . पण लोखंडाला धगधगीत विस्तवाची आंच द्यावी लगते ; शिवाय घण मारावे लगतात वरून , तुझं मन वांकवणं सोपं आहे , कोवळं आहे तें ; पण तुझ्या दादाचं काय ? त्यासाठींच हा उद्योग चाललाय ‌ माझा , परिस्थितीची आंच लावतोंय , उपहासाचे घण घालतोंय ‌, वांकेल तेव्हां वांकेल लोखंड . मींच हीं कुटुंबं वेगळीं केलीं आहेत , एका ठिकाणीं यावींत म्हणून , आपल्याल जेम हवं असतं , तें आपल्याला नको असं सांगितलं म्हणजे तें नेहमीं जगांत मिळत राहातं .

सुरेश : आपल्याला नाहीं पटत .

काका : नाहींच पटायचं . कारण तूं लहान आहेस .

सुरेश : लहानच राहूं दे मल . तुमचं मोठेपण मला नको . मोठं होऊन वेगळं होण्यापेक्षां लहान होऊन एकत्र राहाणं चांगलं . तुमचं कांहीं ऐकायचं नाहीं मला .

काका : ऐकावं लागेल . तुझा बाप दिल्लीला गेला आहे . त्यानं तुमची जबाबदारी माझ्यावर टाकली आहे .

सुरेश : लिहून दिलंय ‌ तुम्हांला तसं ?

काका : लिहून म्हणजे ?

सुरेश : लिहून म्हणजे कायदेशीर .

काका : तुला कधीं कळायला लागला कायदा ?

सुरेश : आमचे दादा आहेत ना मास्तर आमचे . त्यांनीं नाहीं का घर लिहून दिलेलं त्या विघ्न्याला .

काका : तुला कधीं कळालं हें ?

सुरेश : भेटला होता मला मघाशीं विघ्ने . जप्तीसुद्धां आणणार आहे तो घरावर . त्यांत काय आहे ?

काका : त्यांत काय आहे ? अरे , जप्ती म्हणजे अँकँडमी अँबॉर्ड नाहीं आणणार तो तुझ्या दादासाठीं .

सुरेश : मी कांहीं अडाणी नाहीं आहें . एवढंसुद्धां कळत नाहींय ‌, काय ? जप्ती आणणार आहे , म्हणजे जप्ती आणणार आहे ! म्हणजे भांडीकुंडी काढणार आहे घरांतलीं बाहेर .

काका : मग तूं काय करणार आहेस ?

( आंतून मंदा लोणच्याची बरणी घेऊन बाहेर येते . )

मंदा : ( हळूच ) सुरेश , दादा आला ना रे पलीकडं ?

सुरेश : नाहीं .

काका : कुठं चाललीच ग तूं ?

सुरेश : उत्तर देऊं नकोस ! लोणचं दे नेऊन वहिनीला . ( मंदा पलीकडे जाते . ) करा काय करायचं तें . चहाडया करतात . मी हॉटेलांत जातों म्हणून तुम्हीं सांगितलं होतंत अण्णांना , तुम्हांला काय करायचं आहे ? आम्हीं आमच्या घरांत वाटेल तें करूं .

काका : मग येऊं दे ना घरावर जप्ती .

सुरेश : येऊं देना , नाहीं तरी तुम्हीं काय करणार आहांत ? शेवटीं सल्लाच देणार का नाहीं नुसता ? अमक्याल हें कर , तमक्याला तें कर , आणि स्वतःची करमणूक कर . दुसरं काय केलंय ‌ तुम्हीं या घरांत ; या घरासाठीं ?

काका : ( या वेळच्या त्यांच्या बोलण्यांत बेगळीच तळमळ दिसते आहे . ) मीं या घरासाठीं काय केलंय ‌ तें तुझ्या बापाला विचार . ज्या मातींत आम्ही वाढलों , खेळलों , लोळलों त्या मातीच्या रक्षणासाठीं आम्हीं काय हाल सोसले तें एकया मातीलाच माहीत , घर एक राहावं , त्याचे तुकडे होऊं नयेत , दरवाजा एक असावा सगळ्यांच्यासाठी , दोन चुली मांडल्या जाऊं नयेत एका घरांत , यापरता दुसरा कुठलाहि स्वार्थ नाहीं माझ्या डोक्यांत , नाहीं कळायचं तुला लहान आहेस तूं . अरे , जें व्हायला नको म्हणून आम्ही धडपडलों तें प्रत्यक्ष होतांना बघून काळीज तडफडल्याशिवाय कसं राहील पोरा ! जी कांहीं उमेद आहे मला , ती तुझी आहे . असं कांहीं तरी कर वेटा , कीं तुझ्या मोठया भावानं लाजेनं मान खालीं घालावी . ऐक एवढा उपदेश . वाग त्याप्रमाणें . अरे , मला असं का वाटतं , तुझ्या वहिनीचे हाल व्हावेत , बापाच्या डोळ्यांतून घळघळां पाणी गळावं , तुम्हां पोरांच्या शिक्षणाची आबाळ व्हावी ? नाहीं रे नाही ! सुशाल कर तुल काय करायचं असेल तें . पण घर तुझं आहे हें लक्षांत ठेव . तुझं आहे तसंच त्याचंहि आहे . त्याचं आहे . तसंच तुझ्या बापाचंहि आहे . माझंहि आहे . तुझा जन्म तेवढा स्वयंपाकघरांत झाला , तुझ्या भावाचा माजघरां झाला आणि आमचा काय मागच्या परसांत झाला ? नाहीं रे नाहीं . या घरांत बाळंतिणीची खोली एकच आहे , पिढयापिढयांनीं चालत ‌ आलेली . जन्मदात्री हीच आहे . एकाच घरांतील एकच माती . नका पाडूं तुकडे तिचे ! राहूं दे अखंड सगळं घर ! कोणाला वेदना व्हावयाच्या नाहींत . झालं तर सुखच होईल , एकमेकांपासून एकमेकांना , आयुष्यांत गरज प्रत्येकाल आहे बेटा ; पण ती जाणीव आयुष्यांत केव्हां तरी व्हावी लागते .

[ आंतून मंदा धांवत येते . ]

मंदा सुरेश , वहिनीला दवाखान्यांत न्यायला पाहिजे , त्या कशा तरी करताहेत .

[ काका आंत जातात . ]

सुरेश : ( आंतून काका -- मंदा वहिनींना घेऊन येतात . सुरेश वहिनींचा हात धरतो . ) काका , दादाल सांगूं नका ! नाहीं तर तो तिथं येऊन वहिनीला बोलेल .

काका : नाहीं बोलत बेटा , नाहीं बोलत . ( काकाहि आपले डोळे पुसतात , माधवच्या घराच्या बाहेरच्या दरवाजाशीं जातात , खालीं वांकून बघतात , या बाजूनं नको नेऊस , तुमच्या घरांतून ने , माधव येतांना दिसतोय . ) सूनबाई , अष्टपुत्रा सौभाग्यवती भव !

( सुरेश आणि मंदा सुलभाल घेऊन पलीकडच्या दरवाजांतून बाहेर जातात . बाहेरून माधव प्रवेश करतो . )

माधव : सुलभा ! ( अशी हांक मारतो . ) आपल्या घरावर जप्ती आली आहे विनायकाची .

काका : दवाखान्यांत गेली आहे ती .

माधव : पैसे कुणी दिले तिला ?

काका : तुझ्या धाकटया भावानं !

माधव : आपल्या घरावर जप्ती आलीय़ ‌ अण्णाहि इथं नाहींत , मला भीति वाटतेय ‌ ?

काका : काळजी करूं नको माधव , कशी जप्ती घरवर येते पाहतो मी . या मातीशीं माझा रक्ताचा संबंध आहे . जितका तुझ्या बापाचा आहे . घाबरूं नकोस !

[ विनायक प्रवेश करतो . ]

विनायक : तरी जप्ती आणण्यापूर्वी मी तुला सांगितलं होतं माधव , लग्न करायला तयार आहे मी तुझ्या बहिणीशीं . त्या वेळेला माझी योग्यता तिच्या जोडयाजवळ उभा राहण्याची केली होती तुझ्या बायकोनं ! आतां तुमच्यासाठीं मी कुठं जागा बघूं तें सांग ! तुम्हांला पैसे दिले आहेत . सिनेमा काढायचा होता ना तुम्हांल ? गुन्हा झाला होय माझा ?

काका : त्याच्या षोकासाठीं नाहीं , स्वत : च्या षोकासाठीं पैसे दिले आहेत तुम्हीं .

विनायक : मान्य आहे . मीं त्यांचा षोक पुरा केला , त्यांनीं माझा करायचा होता .

काका : ती रीत तुमच्या घरांतली असेल . या घरांतली नाहीं . भाऊ आहे तो तिचा . दलाल नव्हे .

विनायक : पैसे घेतांना हे नातं ठाऊक नव्हतं त्यांना ?

काका : मोहाच्या भरांत मूर्खपणा होऊन जातो माणसाच्या हातून ,

विनायक : त्यांचा मूर्खपणा हा कांहीं माझा अपराध नाहीं , वाटेल ते अपमान सहन केलेत मी या घरांत , पैसे देऊन ! माला जास्त बोलायला वेळ नाहीं . वेलिफ खालीं उभा आहे . माधव . तुरुंगाचा बंद दरवाजा तुझ्यासाठीं उघडावा असं तुला वाटत नसेल तर अंगावरच्या कपडयानिशीं घर खालीं कर .

काका : करणार नाहीं ! घर त्याचं नाहीं . त्याचे वडील जिवंत असे पर्यंत हा प्रकार तुम्हांल करतां येणार नाहीं .

विनायक : त्यांच्या मरणाची वाट पाहायला मला वेळ नाहीं .

( पलीकडच्या बाजूनं सुरेश धांबत येतो . इतक्यांत तारवाला तार घेऊन येतो . ती वाचून .

सुरेश : अण्णा :---

[ धाडकन ‌ कोसळतो ]

( काका तार उचलून वाचतात . )

काका : गेला . सुटला ! ( भरल्या कंठानं ) सोडवलंन ‌ माधव त्यानं तुला आणखी एका पेचांतून , जन्मभर तुझेच पेंच सोडवत आला तो . जन्मभर तूं त्याच्यापासून . जन्मभर एकत्र कुटुंब ठेवण्यासाठीं धडपडला , आणि शेवटीं स्वत : च कुटुंबापासून विभक्त होऊन मेला . जन्मभर ताठ राहिला माझा अण्णा ! शेवटीसुद्धां वांकला नाहीं ! घरीं आल्यावर सुलासमोर मान खालीं घालावी लागेल , म्हणून इकडंसुद्धां आला नाहीं . परस्पर गेला . मरतांनासुद्धां या घराच्या मातीला इभ्रत देऊन गेला ! माझा बहाद‌दूर अण्णा अमर होऊन मेला ! एक रहा , म्हणून तुम्हांला सांगून सांगून थकल , आणि तो थकल , भागला जीव शेवटीं एकटाच गेला .

सुरेश : अण्ण . काका , असे कसे गेले हो अण्णा ? मीं तुम्हांल खोटं सांगितलं मघाशीं . मी नापास झालेलों नाहीं . फर्स्ट क्लास -- फर्स्ट आलोंय ‌ ; अण्णा , मी फर्स्ट क्लास फर्स्ट आलोंय ‌, त्यांच्या डोळ्यांतील आनंदाचं पाणी बघायचं होतं मल , आतां कधींच भेटायचे नाहींत का मल ते ! दादा . तूं घालवलंस अण्णांना ! तूं छळ केलास त्यांचा ! हाल तूं केलेस वहिनीचे ! तुझी भीति वाटते आम्हांल . आम्ही दोघे लहान लहान आहोंत . वेगळं व्हायचंय ‌ ना तुला ? जा तूं , हो वेगळा ! तूं जा ; घरांतून जा . !!

( इथें विनायकहि हादरतो . )

काका : ( सुरेशला कुशींत घेऊन डोळे पुसत . ) पूस डोळे .

सुरेश : अण्णा ! काका , तुम्ही डोळे पुसतां ? मला वाटलं अण्णाच आहेत .

माधव : ( मधला पडदा एकदम बाजूल करून ) थांब ! सुरेश / सगळींचजण नका रे अशी मला एकटयाला टाकून जाऊ . जन्मभरांत मीं कुणालाच सुख दिलेलं नाहीं . मी दुष्ट आहें . निष्टुर आहें . अविचारी आहें . पण मीसुद्धां तुमच्यासारखाच पोरका झालोंय ‌ रे ! ( सुरेशचे पाय धरतो व मिठी मारतो . )

विनायक : माधव . जप्ती परत नेतोंय ‌ मी .

काका : जप्ती परत नेऊं नका . या घरानं आजपर्यंत कुणाचीहि दया स्वीकारली नाहीं . या मातीनं आम्हांला भिकेवर जगायला शिकवलेलं नाहीं . हा तुमचा ! के ( चके देतो . विनायक चेक घेऊन निघून जातो . ) एका घरकुलांतल्या एका जिवाच्या पांखरांनों , आपल्या घरटयांत राहा ! पंखा फुटले म्हणून केवळ स्वातंत्र्याच्या सुखासाठी घरटं मोडूं नका ! पांच पांढव एक झाले तर शंभर कौरवांना भारी होतात हा या आमच्या भरतभूमीचा इतिहास आहे . घर एक ठेवा ! अखंड ठेवा ! त्याचे तुकडे करूं नका !

मंदा : ( दारांतूनच ) दादा , सुरेश , आपल्या वहिनीला मुलगा झालाय ‌. चला लवकर . ( सुरेश तिच्या मागें निघून जातो . )

काका : माझा अण्णा परत आला ! वेगळा झालेला मुलगा परत आपल्या घरीम आला हें पाहण्यासाठीं तुझा बाप तुझ्या पोटीं आलाय् ‌ माधव . चळ तिकडं .

( दूर कुठें तरी अण्ण " याचसाठीं केला होता अट्टाहास , शेवटचा दीस गोड व्हावा " ही ओवी म्हणत असल्याचा भास होतो व माधवला घेऊन काका बाहेरच्या दरवाजाकडे जात असतांनाच -- पडदा पडतो . )

समाप्त

N/A

References : N/A
Last Updated : May 19, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP