मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|पाचवीची गाणी| आशीर्वाद पाचवीची गाणी बालाचा अगसेर बाळाचे नशीब उंबराचा फ़ुलू मोंगरा आशीर्वाद दाराचे दारकशी सतीराचा साया वाढा रं पाचवीची गाणी - आशीर्वाद वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात. Tags : folkliteraturesongwarliलोकगीतवारलीसाहित्य आशीर्वाद Translation - भाषांतर आशीर्वादबारीक काड्यांची बारीक नेसली साडीजाऊन ओणवेली सासर्याचे पायीसासर्यानं आशीर्वाद दिलासुने तू होशील ग असात पोरांची मायूबारीक काड्यांची बारीक नेसली साडीजाऊन ओणवेली सासर्याचे पायीसासूनं आशीर्वाद दिला सुने तू होशील ग सात पोरांची मायूबारीक काड्यांची बारीक नेसली साडीजाऊन ओणवेली सासर्याचे पायीभावल्यानं आशीर्वाद दिला सुने तू होशील ग सात पोरांची मायू(मायू-माय/आई, भावला-मोठा दीर)आशीर्वादबारीक रेषांची झिरझिरीत साडी नेसलीसासर्याच्या पायी जाऊन वाकलीसासर्याने आशार्वाद दिलासूनबाई, तू ग होशील सात पोरांची आईबारीक रेषांची झिरझिरीत साडी नेसलीसासूच्या पायी जाऊन वाकलीसासूने आशार्वाद दिलासूनबाई, तू ग होशील सात पोरांची आईबारीक रेषांची झिरझिरीत साडी नेसलीमोठ्या दिराच्या पायी जाऊन वाकलीदिराने आशार्वाद दिलासूनबाई, तू ग होशील सात पोरांची आई N/A References : N/A Last Updated : February 12, 2013 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP