अंक तीसरा - प्रवेश पहिला

‘पंडितराज जगन्नाथ’या नाटकावा नायक महान्‍ संस्कृत कवि आणि विख्यात साहित्य-शास्त्र-पंडित जगन्नाथ हा आहे. यातील ‘गंगालहरी’ स्तोत्र आजही घरोघरी वाचले जाते.


[ स्थळ : दिल्लीमधील एक रस्ता, कलंदरखां ‘ गंगालहरीं ची एक पोथी हातीं घेऊन प्रवेशतो. ]

कलंदरखां ( पोटी वाचति )

उदन‌चन--मार्तण्ड--स्फुट--हेरंब--जननी--
कटाक्ष--व्याक्षेप--क्षण--जनित-संक्षोभ--निवहा: ॥

या खूदा ! काय ही जगन्नाथाची गंगालहरी ? कोण्या शैतानानं ही संस्कृत जबान शोधून काढली ? एकेक शब्द ऐसा मुष्कील, कीं बोलतांना दाताखालीं जीभ सांपडून. तिचे आशिकांच्या दिलासारखे टुकडे टुकडे व्हायचे ! एकेक शब्द ऐसा गहिरा, कीं कंदहार से दिल्लीतक लंबा !उदन्‌चन‌--मार्तण्ड--स्फुट कपट--हेरंच--जननी. कंबख्त ! एवढा लंबा मिसरा एका दमांत बोलायचा, म्हणजे एकदम दम उखडायचा ! छे छे, ही गंगालहरी घोकण्यापेक्षां गंगेंत शरीर झोकणं आसान आहे!. या अल्ला ! या सैतानी भाषेंत एकेका जीजवस्तूला नांवं तरी किती ! एक सूरज के बारा नांम--और वो भी बहोत मुष्कील ? म्हणे ‘ हिरण्यगर्भ ’ ! कंबख्त ! उच्चारतांनाच एकादी बाई गर्भगळित व्हाय्ची ! हमारे जबानमें देखो, चंद्राची नांवं सिर्फ दो-चार ! लेकिन ये संस्कृतमें--
हिमांशु:  चंद्रमा: चंद्र: इन्दु: कुमुदबांधव:
वुधु: सुधांशु: शुभ्रांशु: ओषधीश: ‘ निशापाणी ’!

निशापाणी ? कंबख्त ! ये निशापाणी यहाँ कहाँसे आया ? ( पुन:वाचतो )

‘ बिधु: सुधांशु: सुभ्रांशु: औषधीश: निशापति: !’

हां, निशापति: ! अच्छा --

अब्जो जैवातृक : सोमो ग्लौ: मृगांक; कलानिधि:
द्विजराज: शशधरो नक्षत्रेश: क्षपाकर: ॥

क्षमा कर: ! माफ कर: ! रहेम करा ! मोजून वीस ! लेकिन‌ एकालहि आमच्या त्या ‘चाँद’ ची सर येनार नाहीं ! आहाहा चाँद ! चौदहवीका चाँद ! पूनमका चाँद ! त्यांत चंद्राची चमक नि गोडवा आहे तसाच गोलावाहि आहे--चाँद ! ओ मेरे चाँद ! नाहींतर यांचा शशीऽशी: ! सूर्यःचंद्रांना या संस्कृतवाल्यांनीं इतकीं नांबं ठेबलीं, म्हणूनच ते खपा होऊन दूर अस्मानांत जाऊन बसले !

बायकांच्या वर्णनांत तर संस्कृत शायरांसारखे बुददू दुनियेंत कोणी नसतील ! काय तर म्हणे ‘ रंभोरू ’ !- याने, केळीच्या खांबासारख्या जिच्या मांडया आहेत अशी नारी ! बारे बुददु ! अल्लाघरची रंबी देखील हा ‘ रंभोरू’ ऐकून पळून जायची !.

अच्छा ! बेवफा सुंदरींवर आम्हीहि संतापतों. लेकिन‌ किती नाजुक अदबीनं !--ओ संगदिल ! म्हणजे जा संस्कृतवाल्यांचे ’ पाषाणह्रदये !’. ओ जालिम‌ ! हे म्हणतात ‘ निष्ठुरे !’ ओ सितमगर ! हे म्हणतील--“ अयि अन्यायकारिके ह्रदय--विदारिके चंडिके!!” अरे बे--अकल ! मुलायम माषुकांना शिव्याशाप द्यायचे, तर ते देखील मुलायम नकोत का ? संगदिलसितमगर--जालिम‌ !--आहे का एक तरी कठोर अक्षर ? नाहींतर हें भिकार संस्कृतर--रामो हरि: करि: भर भुर !.

लेकिन‌ इलाज नाहीं. जगन्नाथ पंडितासारखं यशस्वी व्हायचं असेल. तर ही गंगालहरी घोकलीच पाहिजे--

मरुल्लील--लोलल्लहरि लुलितांबोजपटली--
स्खलत--पांसुव्रातच्छुरण-विसरत‌ कौंकुमरुचि: ।

मरुल‌लीला ! अरे, इसमें भी अल्ला है ! वारे जगन्नात पंडित ! ( पुनः बांग पुकारल्यागत ‘ मस्ल्लीला ’ हा शब्द उच्चारून नमाज पढतो.  मस्तक जमिनील टेकवितो. इतक्यांत हरीराम नि बन्सरिराम प्रवेशतात. )

हरीराम : ए, ये क्या है ?

कलंदर : ( हरीरामच्या मांडीचा आधार घेट उठतांच--) रंभोऽरू !

बन्सीराम : ( पाठीवर थाप मारून ) क्यो पठ्ठे कलंदर, जगन्नाथाच्या गंगालहरीशीं ही झटापट ?

कलंदर : हां, अजि महाब्राह्मण ! नास्ति अन्य: इलाज: ! सुंदरी--छोकरी--नौकरी--अब्दागिरी इत्यादींनां प्राप्तर्थें सिर्फ यही रास्ता विद्यते !

हरीराम : वा: यार ! बरीच मजल गांठलीस तूं !

बन्सीराम : हां, पण मधें उर्दू शब्द आल्यानं ही तुझी संस्कृत--वाणी गंगा-जमनी औलाद वातते !

कलंदर : रे रे पागल, अबे भेजाविरहित ! ही गंगाजमनी औलाद नास्ति ! संस्कुत और उर्दुका मधुफ: अस्ति !. जगन्नाथरायावर ताण करणार मी ! संस्कृत व उर्दू यांच्यावर अलग अलग हुकमत दाखवून तो शाहजादीचा नवरा, अर्थात शाहजहानभुपते: जामात : बन गया ! बन गया ना ? पण मी तर दोन्ही भाषांवर एकत्र हुकमतंदर्शयित्वा माझ्या दिलप्यारीचा नवरा भविष्यामि !

हरीराम : वाहवा वाहवा ! काय रे, पण ही तुझी दिलप्यारी कोण ? तिंच नांव काय ?

कलंदर : ओ हो ! मुलयम‌ मधुमधुरं अतीव सुंदरं है उसका नाम !

बन्सीराम : हां हां कलंदरखां, कबूल ! लेकिन‌ नाम तो बताइये !

कलंदर : नाम सुनो बे बदमान बम्मन !

चामनमें खीलती है जो
गंधिता ललिताच या ।
कलंबुरथ दिल आशिक
जिसए बेशक लिया ॥

हरीराम : ये तो गाना हो गया !

बन्सीराम : यार कलंदर, तुझी ही अजब जबान कशी समजणार ? सरळ सीध्या भाषेंत सांग.

कलंदर : अबे बुद‌दू । या शेरांतच तिचं नांव अखेर गुंफलं आहे मीं !. “ जिसने बेशक‌ लिया” यांतली शेवटची तीन अक्षरं कौनसी ?

बस्सीराम : ( विचार करून ) क--लि --या ! अच्छा ! कलिया ! शाहजादीची ती माषुक सहेली ! शाहजादीचं जगन्नाथाशीं लग्न झाल्यापासून अधिकच माजलेली !

कलंदर : हां, तिलाहि तिच्या मालकाचा शौक--म्हणजे संस्कृतच शौक--जडला आहे ! जगन्नाथाची ‘ गंगालहरी ’ तर ती बेखटक बोलते ! अतीब मधुरं !. इसलिये इम‌ संस्कृत पढते हैं ! संस्कृतच्या जोरावर जगन्नाथानं शाहजादीला आपली औरत केली; मी तिच्या त्या माषुक सहेलीला माझी औरत करणार !. अजी पंडत, तुम्हारी यह संस्कृत जबान बहोत बुरी है भैया ! पण करतां काय ? तिचा ताईत कंठांत बांधल्यानंतरच तो तेलंगी बम्मन बादशहाचा जांबई झाल: दौलतीचा धनी झाला. सुखानं संसार चाललाय‍ त्यांचा. तस्मात‌ कारणात‌ .

हरीराम : बेवकूफ ! बंद कर तुझं संस्कृत.

कलंदर : कस्मात‌ कारणात‌  ? किस लिये बंद करूं रे ?

हरीराम : त्याची जरूरी नाहीं रे ! जगन्नाथाचे दिवस भरत आले--तो आतां बरबाद होणार आणि आपली आबादी आबाद होणार !

कलंदर : भो : आश्चर्यम‌ ! आश्चर्यम‌ ! ताज्जुबकी बात वर्तते !

हरीराम : अरे ताज्जुब कुछ नहीं ! जरा कान कर इकडे ! ( कानांत कांहीं तरी सांगून मोठयाणें --) गुप्त बातमी आहे ही !

कलंदर : ( तोंड वळवून बन्सीरामचा कानांत कर्कश आवाजांत--) अच्छा ! अच्छाऽ! तर मग आतां आपले मन्सूरखां जल्दीसे सुभेदार बनणार ! और हम सब मनसबदार ! औरंगजेबनें लढाई जिंकली ! शहेनशाहांना आग्र्‍याच्या किल्लयांत कैद केलं ! दाराशुकोह लाहोरला पळाला !

हरीराम : अबे, जोरसे मत चिल्ला ! “ जबान छाटून टाकीन, ठार मारीन, जान घेईन ही बातमी कुठें बडबडलास तर !”. असं मन्सूरखांनं बजावलं आहे ! गुप्त बातमी आहे ही !

बन्सीराम : पठ्ठे कलंदर, आतां काय, कलियासारख्या हजार पोरी तुझ्या पायाशीं येतील ! हां. लेकिन‌ आतां मन्सूरखांकडे चल. मोठी मर्दुमकी गाजवायची आहे आपल्याला !

कलंदर : मर्दुमकी ? ( लढाईच्या कल्पनेनं घाबरतो. )

हरीराम : डरो मत ! मन्सूरखांचा पैसा नि शहराचा कोतवाल आपल्या बाजूल आहे. दाराशुकोह लाहोरल गेला आहे. मग भीति कसली ?

बन्सीराम : हां, जगन्नाथाची मग्रूची मातील अन‌ शाहजादी मसूरखांला मिळणार ! आम्ही वारणशीच्या मठाचे आचार्य होणार; अन‌ तूं कलियाबरोबर मन‌सबदारीचा मालिक बनणार !

कलंदर : बहोत अच्छा ! औरंगजेब की सलतनत्‌ आ रही है ! उस्ताद मन्सूरखां की जय हो !

हरीराम : अबे उल्लू. खामोश. मोठयानं ओरडूं नकोस. चल, चल लौकर.

कलंदर : अच्छा. चलो चलो बे पगडीफिरावू !

[ तिघेहि जातात. कलंदर जातां जातां ललकारी ठोकतो-

‘ कलिया, तुझे सतायेगा ये
छलिया । मेरी हो जा हो ऽऽ’ ]

N/A

References : N/A
Last Updated : April 01, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP