मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अभंग ज्ञानेश्वरी| गुरु-परंपरा अभंग ज्ञानेश्वरी अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा श्रीज्ञानेश्वरी नित्यपाठ गुरु-परंपरा गीता-ध्यान अभंग ज्ञानेश्वरी - गुरु-परंपरा स्वामी स्वरूपानंद ह्या थोर सत्पुरूषाने ‘ अभंग ज्ञानेश्वरी ‘ नामक अत्यंत सुबोध, नितांत सुंदर आणि परम रसाळ असा अभंगात्मक ग्रंथ लिहीला. Tags : abhangdnyaneshwarisvaroopanandअभंगज्ञानेश्वरीस्वरूपानंद गुरु-परंपरा Translation - भाषांतर आदिनाथ सिद्ध आदिगुरु थोर ।त्यासी नमस्कार भक्तिभावें ॥१॥तया चि पासोनि शिव-शक्ति-बीज ।लाधलें सहज मत्स्येंद्रातें ॥२॥मत्स्येंद्रानें दिलें गोरक्षालागोनि ।गोरक्षें गहिनी धन्य केला ॥३॥गहिनीनाथें बोध केला निवृत्तीसी ।निवृत्ति उपदेशी ज्ञानदेवा ॥४॥ज्ञानदेव-शिष्य देवचूडामणि ।पुढें झाले मुनि गुंडाख्यादि ॥५॥रामचंद्र महा-देव रामचंद्र ।प्रसिद्ध मुनींद्र विश्वनाथ ॥६॥योग-सार ऐसें परंपराप्राप्त ।सद्गुरु गणनाथ देई मज ॥७॥स्वामी म्हणे झालें कृतार्थ जीवन ।सद्गुरु-चरण उपासितां ॥८॥अपूर्व नवलाव अनुभवावा !(फलश्रुति)श्रीज्ञानेश्वरी ग्रंथ गहन ।गुरुपुत्रांसी सुगम सोपान ।भावें घडतां श्रवणमनन ।लाभे समाधान अखंडित ॥१॥उपासनामार्ग सांपडे ।योगसार हाता चढे ।उघडती ज्ञानाचीं कवाडें ।सहज घडे निष्कामकर्म ॥२॥होवोनि अंतरंग अधिकारी ।भावें अवलोकितां ज्ञानेश्वरी ।साक्षात् प्रकटे भगवान् श्रीहरि ।स्वयें उद्धरी निजभक्तां ॥३॥नित्य अंतरीं ज्ञानदेव ।सर्वा भूतीं भगवद्भाव ।देव-भक्तां एक चि ठाव ।अपूर्व नवलाव अनुभवावा ॥४॥। हरिः ॐ तत् सत् सोऽहं हंसः । N/A References : N/A Last Updated : February 13, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP