मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|श्रीनिवृत्तिनाथांची समाधी| अभंग ११ ते २० श्रीनिवृत्तिनाथांची समाधी अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४० अभंग ४१ ते ५० श्रीनिवृत्तिनाथांची समाधी - अभंग ११ ते २० संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangbooknamdevअभंगनामदेवनिवृत्तिनाथपुस्तक अभंग ११ ते २० Translation - भाषांतर ११ आपुलिया अंगें साहित्य श्रीरंगें । पुजियेले सांग संतसाधू ॥१॥निवृत्तिदेवें केली विठोबाची पूजा । उभारिल्या ध्वजा पताकांच्या ॥२॥पश्चिमेसी स्थळ अनादि समूळ । उघडिली शीळ समाधीची ॥३॥म्हणती योगेश्वर अनादि या शेजा । चिद्रलें ती पूजा केली असे ॥४॥नामा म्हणे देवा जागा निरंगनीं । युगादि हे धुणी धुपतीये ॥५॥१२ तुळसी बेल पुष्पें समर्पिलीं वर । पाहाती ऋषीश्वर पहिली पूजा ॥१॥नारा विठा गोंदा पाठविलाअ महादा । झाडावया शेजा पुढें जाले ॥२॥सभोंवतीं जागा झाडिली निर्मळ । अनादि हें स्थळ निवृत्तिराजा ॥३॥सभोंवते दीप लाविले समाधी । म्हणती पूजा आधीं केली असे ॥४॥अनादि हे पूजा केली म्हणती संत । आतां कोणी आंत उतरूं नये ॥५॥नामा म्हणे हरि काय स्थळ चांगलें । दुर्वा दर्भ फुलें वाहियेलीं ॥६॥१३ पुष्करिणीकांठीं वैष्णवांचे भार । देव ऋषीश्वर जेवताती ॥१॥अवघिया पात्रें वाढलीं नारायणें । सोडिती पारणें निवृत्तिराज ॥२॥विठोबा रखुमाईनें घेतला निवृत्ति । जेविताती पंक्ति गोपाळांच्या ॥३॥जेवले वैष्णव आणि ह्रषिकेशी । गेले आचमनासी पुष्करिणीतें ॥४॥अवघे संत तेथें बैसले निवाडे । पुंडलिक विडे वांटितसे ॥५॥नामा म्हणे केशव बैसले कीर्तनास । होतो कासाविस निवृत्तिराज ॥६॥१४ निवृत्तिदेवासाठीं स्फुंदती ऋषीश्वर । लविला पदर डोळियांसीं ॥१॥गरुडावर पुंडलिकें घातियेला साज । जाती निवृत्तिराज समाधीसी ॥२॥चालती विमानें वाजतसे घंटा । उठा आतां भेटा अवघेजण ॥३॥समाधीभोंवते कुंकुमाचे सडे । पाहती निवाडे योगीराज ॥४॥कीर्तन गजरीं गेलीसे मंडळी । बैसली ते पाळी समाधीच्या ॥५॥नामा म्हणे पुढें उभे नारायण । आरंभिलें नमन निवृत्तिराजें ॥६॥१५ नमो गणपति गजानना । नमो सरस्वति मंगलध्याना ।नमो अगाध ब्रह्मपरायणा । नमो नमो स्बामी ॥१॥नमो आदिमायादि सागरा । नमो चिदानंद दिगंबरा ।एकत्व एक सारा । नमो नमो तुज ॥२॥नमो मत्स्येंद्रनाथा अनादि । नमो सर्वव्यापका बुद्धि ।नमो जुनाट युगादि । तुज नमो ॥३॥नमो सत्यकाळनाथ त्रिजगतीं । नमो पुढत पुढती ।योगेश्वरा आदि अंतीं । नमो नमो स्वामी ॥४॥नमो गैहिनीनाथ अविनाशा । नमो सहजासहज प्रकाशा ।नमो व्यापुनि दाही दिशा । आदि गुरु तुज नमो ॥५॥गुप्तनाथ तुज नमन । नमो सद्गुरु परब्रह्म पूर्ण ।सदा स्वरूपीं अनुसंधान । नमस्ते नमस्ते ॥६॥नमो गैहिनीनाथ आदिगुरु । तूं संकटी आदि तारूं ।नमो संसारहर्ता हरू । सद्गुरुनाथा तुज नमो ॥७॥नमो कर्ता हर्ता नारायणा । नमो उदयाअस्तु गगनघना ।नमो विराटपुरुषा जगज्जीवन । नमस्ते नमस्ते कुळस्वामी ॥८॥नमो त्रिपुटी गुप्तधना । नीलवर्णा कलंकी कोंदणा ।नमो ज्योतिर्मय दारुणा । नमो नमो जगद्गुरु ॥९॥नमो पांडुरंग दयाळा । नमो गोविंदा गोपाळा ।नमो वैष्णवां सकळां । योगिया ऋषीश्वरा नमो नमो ॥१०॥नमो सर्व चराचर । नमो अंतरबाहेर ।नमो दहाही अवतारा । जगद्भूषणा तुज नमो ॥११॥नमन नेणो कैसें व्यापी । नमन रंगलें विश्वरूपीं ।नमन चिन्मय गुह्य गौप्यीं । नमो सर्वभूतीं निजगुरु ॥१२॥१६ धूप पंचारती गंधाक्षता वाहती । पूजिला निवृत्ति वैष्णवांनीं ॥१॥प्रेमें आसुवें येती सकळांचिये डोळां । माळ घाली गळां पुंडलिक ॥२॥निवृत्तिदेवें ग्रंथ केला होता सार । ठेविला समोर विठोबाच्या ॥३॥अवघ्या जनालागीं केला नमस्कार । उठावले भार वैष्णवांचे ॥४॥गोविंद गोपाळ आले ते सकळ । प्रेमें होती विकळ निवृत्तिराज ॥५॥केलीं आचमनें पुष्कर्णीचे तटीं । आले उठाउठी समाधीपाशीं ॥६॥नामा म्हणे देवा निवृत्तिसारखा योगी । नाहीं आतां जगीं दावावया ॥७॥१७ समाधीच्या पाळी वैसलीं सकळीं । केला या गोपाळीं जयजयकार ॥१॥निवृत्तीच्या संगें पुंडलिक पांडुरंग । सिद्ध जाले सांग समाधीसी ॥२॥निवृत्तिदेवें वंदिलीं सकळांची पाउलें । तीर्थ तें घेतलें विठोबाचें ॥३॥पताकांची छाया समाधीसी आली । उतरले खालीं निवृत्तिदेव ॥४॥पुंडलिक पांडुरंग गेले बरोबरी । बैसले आसनावरी निवृत्तिराज ॥५॥नामा म्हणे देवा काय पाहावें आतां । गेला पंढरिनाथा चिद्भानु तो ॥६॥ १८ निवृत्तिराज बैसले समाधीं सुचित । चिन्मय ते ज्योत उजळली ॥१॥पुंडलिकें मिठी निवृत्तीच्या गळां । अवघियांच्या डोळां आसुवें येती ॥२॥विठोबाचें ह्रदय आलेंसें भरून । झांकियेले नयन विवृत्तिराजें ॥३॥पुंडलिके आणिलें विठोबासी बाहेर । केला नमस्कार वैष्णवांनीं ॥४॥राही रखुमाई बैसल्या गहिंवरत । आणिक संत महंत वोसंडती ॥५॥नामा म्हणे हरि शुद्धि नाहीं सकळां । घाला आतां शिळा समाधीसी ॥६॥१९ नारा महादा गोंदा विठा जाले विकळ । झांकियेली शीळ समाधीची ॥१॥गंधर्व आणि देव चिंतावले भारी । दीर्घध्वनि करी नारा विठा ॥२॥गोंदा आणि महादा सांडिती शरीर । विसोबा खेचर फार कष्टी ॥३॥लोपलासे भानु पडला अंधार । गेला योगेश्वर निवृत्तिराज ॥४॥गेल्या त्या विभूति अनादि अवतार । आतां देवा फार आठवतें ॥५॥नामा म्हणे हरि धरवेना धीर । येती गहिंवर वोसंडोनी ॥६॥२० परिसा भागवत करितसे शोक । म्हणती देवा दुःख अति जालें ॥१॥द्वादशी समाधि दिधली निवृत्तीसी । जाले उदासी अवघेजणा ॥२॥देव म्हणे उठा करा आतां पूजा । घालूं पुष्णशेजा समाधीसी ॥३॥उठले सकळ होताती विकळ । गेले ते गोपाळ समाधीसी ॥४॥घेतली समाधि सव्य वैष्णवांनीं । पूजिताती सुमनीं समाधीसी ॥५॥नामा म्हणे अवघे करा प्रदक्षिणा । चला आचामना पुष्कर्णीसी ॥६॥ N/A References : N/A Last Updated : January 02, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP