मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|श्रीचांगदेवांची समाधी| अभंग १ ते १२ श्रीचांगदेवांची समाधी अभंग १ ते १२ अभंग १३ ते २६ श्रीचांगदेवांची समाधी - अभंग १ ते १२ संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangbooknamdevअभंगचांगदेवनामदेवपुस्तक अभंग १ ते १२ Translation - भाषांतर १ निवृत्तिदेवा योग्य गंगेचें तें स्नान । करुं अवघेजण आवडीनें ॥१॥तीर्थयात्रा होईल देवसमागमें । केवढा महिमा रामें सांगितला ॥२॥मार्गीं चालताती भक्त आणि हरी । आले भुलेश्वरीं अवघेजण ॥३॥भुलेश्वरालागीं पूजा केली सांग । भक्त पांडुरंगें तीन रात्रीं ॥४॥तेथून वैष्णव चालियेले हरी । आले सिद्धेशरीं देवभक्त ॥५॥पाराशर ऋषींचें स्थळ पुरातन । राहिले नारायण पंचरात्र ॥६॥नामा म्हणे देवा जावें कपिलेश्वरा । आनंद ऋषीश्वरा जाला फार ॥७॥२ कौतुकानें तेथें आले सावकाश । उभे हरिदास कीर्तनासी ॥१॥दहा दिवस तेथें राहियेले स्वस्थ । अवघ्यांचा मनोरथ पूर्ण जाला ॥२॥क्षेत्रींचा महिमा पुसिती देवासी । जना आगळी काशी सांगियेली ॥३॥येथोनियां वाट जाते वाराणसी । मुनि आणि ऋषि आनंदले ॥४॥नामा म्हणे देवा दिवस जाले फार । लागेल उशीर समधीसी ॥५॥३ चालिले घेऊनि देव ऋषीश्वरा । आवघियां पुढारां गरुडदेव ॥१॥दिवसानुदिवस चालिले सत्वर । पहावें गोदातीर म्हणोनियां ॥२॥धन्य गोदातीर धन्य कचेश्वर । जाती ऋषीवर स्नानालागीं ॥३॥सारा पौष मास गेला कचेश्वरीं । नित्य गंगातीरीं स्नानसंध्या ॥४॥पाहिला कचेश्वर पाहिली ती गोदा । आली प्रतिपदा माघमास ॥५॥नामा म्हणे देवा जावें पुण्यस्तंभा । मनोहर जागा सिद्धेश्वर ॥६॥४ उठले वैष्णव कीर्तन गजरीं । आले सिद्धेश्वरी आश्रमासी ॥१॥पौर्णिमेपावेतों राहिले निश्चल । नेमा आतां स्थळ समाधीसी ॥२॥निवृत्ती मुक्ताई संगें आला चांगा । म्हणती पांडुरंगा उठा आतां ॥३॥ज्ञानदेवासाठीं उत्सव आळंकापुरीं । तैसा कर्हेतीरीं सोपानासी ॥४॥तैसी चांगयाची पुरवावी आळी । नामा वनमाळी उठावले ॥५॥५ दशमीचे दिवशीं ठेविलें प्रस्थान । साधियेला येणें देव गुरु ॥१॥दिधला मंडप सिद्धेश्वरासमोर । उठावले भार वैष्णवांचे ॥२॥सर्व स्वस्थ तेथेंज बैसले मिळून । नारदा कीर्तन पुढें होत ॥३॥धन्य पुण्यस्तंभ धन्य गंगातीर । धन्य दिसती भार पाताकांचे ॥४॥नामा म्हणे देवा निजभक्तीसाठींज । अंगें होसी कष्टी पांडुरंगा ॥५॥६ गोदातीरीं उत्सव करिती जगजेठी । चांगदेवासाठीं समारंभ ॥१॥निवृत्ति मुक्ताबाई संगें पंढरिनाथ । आले मंडपांत समुदायेंसी ॥२॥निवृत्ति पांडुरंग बैसले निवाडे । चांगदेव पुढें उभे ठेले ॥३॥जोडियेले कर चांगदेवें पुढतीं । करिती विनंति वोसंडोनी ॥४॥नामा म्हणे देवा उठिलें अंतःकरण । नाहीं देहभान चांगयासी ॥५॥७ चवदाशें वर्षें शरीर केलें जतन । नाहीं अज्ञानपण गेलें माझें ॥१॥अहंकारें माझें बुडविलें घर । जालों सेवा थोर स्वामीसंगें ॥२॥तापत्रयीं तापलों महाअग्नीं जळालों । अविवेकीं जालों मंदामती ॥३॥काय माझा देह वायांविण व्यर्थ । आलों शरणागत पांडुरंगा ॥४॥अभिमानें आलों श्रीआळंकापुरीं । अज्ञान केलें दुरी मुक्ताईनें ॥५॥नामाअ म्हणे योग दुःखाचें शरीर । काय याचा घोर करूनियां ॥६॥८ नाना दुःख माया आठवती मना । आतां नारायणा कृपा करी ॥१॥माझ्या पातकांचा लागूं नेदी अंत । ऐसें माझें चित्त साक्ष असे ॥२॥ज्ञानाग्नि माझी करा तृणवत । होऊनि कृपावंअत श्रीहरी ॥३॥योगिराज यासी नाहीं पापदोष । केला उपदेश मुक्ताईनें ॥४॥नामा म्हणे देवाअ पेटलें अंतर । करा आतां स्थिर योगिराज ॥५॥९ अवघ्या विद्येचा करूनी अभ्यास । पावलों मी क्लेश देवराया ॥१॥मुक्ताबाई योगें उतरलों भवसिंधु । तैशी दीनबंधु कृपा करी ॥२॥पतितपावन नाम तुझें थोर । करीं अंगिकार अनाथाचा ॥३॥धन्य आमुचें भाग्य जाहलें दर्शन । अंगें नारायण साहित्य करी ॥४॥चांगदेवें ऐसें आठविलें फार । केला नमस्कार नामा म्हणे ॥५॥१० कृपावंत जाली जेव्हां मुक्ताबाई । स्वरूप दिशा दाही दाखविलें ॥१॥पाठीं पोटीं स्वरूप केलें सद्गुरुनें । तंव अभिमान गेला माझा ॥२॥याच्या उपकाराची काय वर्णू थोरी । ज्यांच्यासंगें हरि जोडियेला ॥३॥पुरे पुरे आतां आठविसी फार । होईल उशीर समाधीसी ॥४॥नामा म्हणे देवा उठा संतजन । करूं आतां स्नान गौतमींसी ॥५॥११ हरिपाठ गजरें केला जयजयकार । उठावले भार वैष्णवांचे ॥१॥टाळ मृदंग वाजती अपार । मिरविती भार वैष्णवांचे ॥२॥दोहीं बाहीं उभे पताकांचे भार । मध्यें मनोहर गौतमी ते ॥३॥विसोबा खेचरें पुंडलिका हातें । आणिलेंज साहित्य समाधीचें ॥४॥नामा म्हणे हरि चांगदेवा स्नान । घाली आवडीनें प्रेमयुक्त ॥५॥१२ निवृत्ति मुक्ताई गोविंद गोपाळ । उठले सकळ स्नानालागीं ॥१॥राही रखमाई सहसमुदायेंसी । मुनि आणि ऋषि उठावले ॥२॥करूनियां स्नान निघाले सकळ । नाचती गोपाळ गोदातीरीं ॥३॥चांगदेवें सोवळें होऊनियां त्वरें । देव ऋषीश्वर पूजियेले ॥४॥धन्य गोदातीर आदि हे अनादि । उरकिली समाधि यथासांग ॥५॥नामयाचे पुत्र नारा विठा गोंदा । जागा झाडी महादा समाधीची ॥६॥ N/A References : N/A Last Updated : January 02, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP