मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|तीर्थावळी| अभंग २१ ते ३० तीर्थावळी अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४० अभंग ४१ ते ५० अभंग ५१ ते ६२ तीर्थावळी - अभंग २१ ते ३० तीर्थांचे वर्णन. Tags : abhangbooknamdevअभंगतीर्थावळीनामदेवपुस्तक अभंग २१ ते ३० Translation - भाषांतर २१तीर्थे करोनी नामा पंढरीये आला । जिवलगा भेटला विठोबासी ॥१॥सद्गदित कंठ वोसंडला नयनीं । घातली लोळणी चरणावरी ॥२॥शिणलों पंढरिराया पाहें कृपादृष्टी । थोर जालों हिंपुटी तुजविण ॥३॥अज्ञानाचा भाग होता माझे मनीं । हिंडवलें म्हणोनि देशोदेशीं ॥४॥परि पंढरीचें सुख पाहतां कोटि वाटे । स्वप्नींही परि कोठें न देखेंची ॥५॥उदंड तीर्थाची ऐकों जाय प्रौढी । परि चित्त माझें वोढी चंद्रभागा ॥६॥म्हणोनि चरणांची ठाकोनि साउली । आलों मज सांभाळीं मायबापा ॥७॥तया देवाची वास न पाहती माझे नयन । न करिती पूजन कर त्यांचे ॥८॥तेणें पंथें माझे न चलती चरण । नाइकती श्रवण कीर्ति त्यांची ॥९॥कटी तटीं जेणें कर नाहीं ठेविले । न देखें पाउलें विटेवरी ॥१०॥त्यांते म्हणतां देव लाजे माझे मन । ते कष्ट दारुण कवणा सांगू ॥११॥जये गांवीं नाहीं वैष्णवांचा मेळु । न देखे सुकाळु हरिकथेचा ॥१२॥कुंचे गरुड टके न देखों पताका । त्या देवाची शंका वाटे थोर ॥१३॥हें जेथें न देखें तेथें खंती वाटे जीवीं । नामा म्हणे आवडता प्राण माझा ॥१५॥२२केशव म्हणे नाम्या खंती वाटे माझ्या मनीं । निद्रा न लगे नयनीं पाहताम वाट ॥१॥तुजविण उदास वाटे ही पंढरी । न पडे क्षणभरी विसरु तुझा ॥२॥डोळियां वेगळा नवजें कोठें दुरी । चित्त मजवरी ठेवुनि राहे ॥३॥तुज माझी सवे मज तुझी आवडी । गुळासी न सोडी गोडी जैसी ॥४॥तैसे तुम्ही आम्ही एकमेकांमाजीं । विचारिताम सहजीं दुजें नाहीम ॥५॥येतया जातया पुसे तुझी गोष्टी । म्हणे माझें नामें दृष्टि पडिलें होतें ॥६॥वाटे तहानभूक पीडिल्या जाणें कोण । एका मजविण गूज त्याचें ॥७॥रात्रदिवस खेद करुनि आपुल्या जीवा । असेल माझा धांवा पोकारीत ॥८॥मजवीण कोणाचिये साउलीं बैसेल । कोण त्या पूसेल शीणभागु ॥९॥संपांपासीं सांगे शिणले मजविण । कंठीं धरिला प्राण मजलागीं ॥१०॥धरुनीं हनुवटी दिधलें आलिंगन । कुरवाळोनी वदन नेत्र पुशी ॥११॥मग काढोनी कंठीची सुमनतुळशीमाळा । घातलिसे गळां नामयाच्या ॥१२॥सर्वांसुंदर पाहे कृपादृष्टी । पुसे जीवींची गोष्टी कृपासिंधू ॥१३॥निवृत्ति ज्ञानेश्वर सोपान खेचर । नरहरि सोनार आदिकरोनी ॥१४॥समस्त भक्त मिळोनी लोटांगणीं येती । आलिंगन देती नामयासी ॥१५॥अनिवार सुमनें वर्षती सुरवर । गगनीं जयजयकार शब्द होती ॥१६॥ऋषिगण गंधर्व मिळोनि सकळिक । येती दृष्टिसुख घ्यावयासी ॥१७॥रुक्माई आरती घेऊनी आली वेगें । ओंवाळिले दोघे देवभक्त ॥१८॥कवतुकें नाम्याची धरिली हनुवटी । पाहे कृपादृष्टी घडिये घडिये ॥१९॥२३केशव म्हणे नाम्या धन्य तुज फावलें । बरवें तुवां केलें आत्महित ॥१॥पुण्यपावन तीर्थें पाहिलीं सकळिक । प्रक्षाळिलीं पातकें वासनेचीं ॥२॥धन्य तुवाम केलें जन्मोनि सार्थक । शोक मोह दुःख निवारिलें ॥३॥तीर्थयात्रा सफळ व्हावया संपूर्ण । करी का उद्यापन विधियुक्त ॥४॥केलिया कष्टाचेम होईल सार्थक । सांगेन तें ऐक वचन माझें ॥५॥महा मुक्तिक्षेत्र वैकुंठ महीवरी । विख्यात पंढरी भूवैकुंठ ॥६॥एक शीत अन्न अर्पे द्विजामुखीं । राहे सदा सुखी कल्पवरी ॥७॥क्षेत्रवासी भावें पूजावे ब्राह्मण । षड्रस भोजन द्यावें त्यांसी ॥८॥सुगंध चंदन सुमन तुळसीमाळा । समर्पी तांबुला सदक्षिणा ॥९॥ऐसें बोलोनियां देवें नामा धरियेला करीं । राउळभीतरीं घेउनि गेले ॥१०॥मग रुक्माईसी सांगे वैकुंठीचा राणा । आजी आराधना नामयाची ॥११॥२४तंव ते जगन्माता म्हणे जी कृपावंता । कर्ता करविता कोण याचा ॥१॥हा तुमचा दास आहे अंतरंग । काय या उद्वेग करणें असे ॥२॥सर्व भार याचा लागे चालवणें । ऋणवई केलें येणें जन्मोजन्मीं ॥३॥तुम्हांपरतें यासी जिवलग सोयरे । कोण आहेत दुसरे लोभापर ॥४॥दृढ चरण धरोनि राहिला अंतरीं । जालासे अधिकारी सर्वस्वाचा ॥५॥जन्मोनिया येणें जोडिलें जें कांहीं । तितुकें तुमच्या पायीं निक्षेपिलें ॥६॥म्हणोनि याचें कोड करावें परिपूर्ण । व्हावें पैं उत्तीर्ण ऋणियाचें ॥७॥मायबापें याची सखी जिवलग । सांडोनि तुमचा संग धरिला सुखें ॥८॥म्हणोनि याचें हित लागे विचारावें । उचित करावें देवराया ॥९॥आपुल्या दासाचा संभ्रम सोहळा । करणें हे गोपाळा ब्रीद तुमचें ॥१०॥रुक्माई म्हणे हा भाग्यवंत नामा । न कळे याचा प्रेमा नित्य नवा ॥११॥२५आतां जावें वेगीं नामया घेऊनि । सांगावीं आवंतणी ब्राह्मणांसी ॥१॥सकळकामपूर्ण असती तुमच्या पायीं । विचारावें कांहीं न लगे देवा ॥२॥काय काय न लभे तुमचे कृपादृष्टी । सदा सुखवृष्टी हरिच्या दासां ॥३॥नामयाचा हात धरोनि पंढरीनाथ । निघाले अक्षत द्यावयासी ॥४॥निवृत्ति ज्ञानेश्वर जनमित्र सोपान । सांवता जाल्हण घेऊनि सरिसे ॥५॥चोखामेळा बंका काठीकर पुढें । दोन्हीं बाही देव्हडे सनकादिक ॥६॥नामयाचे पाठीं चाले केशीराज । लागावया रज चरणींचे ॥७॥आपुल्या दासाचा सिद्धि न्यावा पणु । म्हणोनि यजमानु जाला देव ॥८॥तेणें मिसें करितसे क्षेत्रप्रदक्षिणा । प्रार्थित ब्राह्मण परम प्रीति ॥९॥ऐसा अनाथांचा नाथ दीनाचा गोसावी । आवडी नित्य नवी सेवकाची ॥१०॥तो या नामयाचा सुखाचा शृंगारु । रुक्मादेविव्रु श्रीविठ्ठल ॥११॥२६तंव अध्यात्मिक पंडित अग्निहोत्री । एक म्हणविती श्रीत्री सदाचार ॥१॥आम्हांसी तें नाहीं तुमचें स्वरुपज्ञान । अपूर्व दर्शन देखिलें आजी ॥२॥सुखाचेम पारणें करविलें या रुपें । तेणें त्रिविधताप निवारले ॥३॥कवण वृत्ति काय चालविजे व्यापार । योजिलें बिढार कवणें ठायीम ॥४॥आजिचें निमित्त काय उपस्थित । ऐकोनि पंढरीनाथ बोलते जाले ॥५॥माझी कुळवृत्ति हरिदासां ठाउकी । मज यासी ओळखी निकट असे ॥६॥मज असंगा संगु सर्वकाळीम याचा । अनंत जन्मांचा ऋणानुबंध ॥७॥साक्ष तुमचे चरणा करुनि बोले वाचा । मी मैत्र नामयाचा अंतरंगु ॥८॥करोनियाम स्नानविधी यावें शीघ्रवत । करावें सनाथ कृपादृष्टीं ॥९॥बिढार तरी असे राउळ्भीतरीं । नांव सांगों तरी अनंत जाणा ॥१०॥जीवींचें गुजगौप्य संतांसी पुसावें । निःसंदेह यावें भोजनासी ॥११॥ऐसी ते अमृतवाणी ऐकोनि श्रवणीं । आनंदले मनीं भूदेव ते ॥१२॥आज्ञा देती देवा जावें निजमंदिरा । शीघ्रवत करा पाकसिद्धी ॥१३॥मग रुक्माईसी सांगे सकळ विवंचना । प्रार्थिले ब्राह्मणां सकळिकांसी ॥१४॥कर्मठ अभिमानी नोळखती मज । देखिनियां चोज वाटे त्यांसी ॥१५॥कुळवृत्ति नाम पुशिलें मज तिहीं । सांगितलें म्यांही सर्व त्यांसी ॥१६॥सांगाती संतांचा मी मैत्र नामयाचा । अनंत जन्मांचा निकट म्हणोनी ॥१७॥बिढार तरी असे राउळभीतरीं । सांगे खूण परी न कळे त्यांसी ॥१८॥नाम तरी अनंत दाविला संकेत । परी नेघे त्यांचें चित्त आठवण ॥१९॥तंव ते विश्वमाता म्हणे जी कृपानिधी । सदा भेदबुद्धि त्यांचे ठायीं ॥२०॥विद्या वयसा जाती कुळाचा अभिमान । त्या कैचे चरन प्राप्त तुमचे ॥२१॥उदार चक्रवतीं भक्तांचा विसावा । त्याच्या निजभावा वेळाईतु ॥२२॥तो भाग्यें जोडला वैकुंठीचा ठेवा । उजरीं जाली दैवा नामयाच्या ॥२३॥२७तंव अणिमादि सिद्धि उभ्या महाद्वारीम । तिहीं सर्व सामोग्री सिद्ध केली ॥१॥सडासंमार्जनें गुढिया तोरणें । शृंगारिलीं भुवनें परिचारिकीं ॥२॥म्हणती काय पुण्य केलें येणे विष्णुदासें । देवा लोभ पिसें लावियेलें ॥३॥द्वारीं दिपावळी चौकरंग माळा । अभिनव सोहळा आरंभिला ॥४॥हरुषें मंगळ तुरे वाजती विनोदें । भक्त जयजय शब्देम गर्जताती ॥५॥मंगळ मार्जन नामयातें करविलें । मग तें आरंभिलें पुण्याहवाचन ॥६॥देवे अंगवस्त्रें आपुलेनी हातें । वाहिलीं अनंतें विष्णुदासा ॥७॥सत्यभामा राही रुक्माई जननी । वेगीं अक्षवाणी घेऊनि येती ॥८॥आनंदें नरनारी कवतुक पाहती । जीवें ओवाळिती नामयासी ॥९॥आपुलिया दासाचा करी समारंभु । दीनानाथ प्रभु कृपसिंधु ॥१०॥धन्य हा नामा म्हणती सकळ लोक । नेणती याचें सुख ब्रह्मदिक ॥११॥२८मग जाला स्वयंपाक स्नानविधि सारा । सकळां हांकारा जाणविला ॥१॥आले महाद्वारीम दिधलीं आसनें । पूजा नारायणें आरंभिली ॥२॥तंव ठकलों म्हणती देव पहा हो कैसें जालें । सर्व सुख नेलें इहीं भक्तीं ॥३॥रत्नजडित पाट सत्वरी आणिले । वरी द्विज बैसविले पृथक्कारें ॥४॥प्रक्षाळोनि चरण पुसिले पीतांबरें । मस्तकीं आदरें तीर्थ वंदी ॥५॥कस्तुरीचे टिळे दिव्य चंदन उटी । घातलिया कंठी तुळशीमाळा ॥६॥दशांग धूप रत्नाचा दीपक । ओवाळी नायक वैकुंठींचा ॥७॥दोही बाही पंक्ति मांडिल्या देव्हडी । राही रुक्माई परवडी वाढितसे ॥८॥चतुर्विध अन्नें आथिलीं बहुगुणें । षड्र्स पक्वान्नें सर्वांठायीं ॥९॥मग संकल्प सोडिला नामयाचे करें । भक्त जयजयकारें गर्जिन्नले ॥१०॥भोक्ता नारायण लक्ष्मीचा पती । म्हणोनि प्राणाहुती घेतल्या वेगीं ॥११॥भर्ता भोक्ता कर्ता करविता आपण । सहज तेथें पूर्ण सकळ काम ॥१२॥विश्वंभर कृपादृष्टि न्याहाळीत । प्रार्थना करीत ब्राह्मणांची ॥१३॥देखोनि ते समृद्धि हरिखले द्विज । जाले नवल चोज पहा कैसें ॥१४॥कोण हा गृहस्थु केव्हडा भाग्यवंतु । नेणए अद्भुतु महिमा याचा ॥१५॥ऐसे जेविले आनंदे धाले परमानंदें । मुखसुद्धि गोविंदें दिधली करीं ॥१६॥कर्पूरेंसहित समर्पिले विडे । कर जोडोनी पुढें विनवीतसे ॥१७॥ऐसा भक्तजन कृपाळू दीनाचा दयाळु । आनंदें गोपाळु उभा असे ॥१८॥तया नामदेवें भुलविलें लोभें । वेडावले उभे चिदानंद ॥१९॥२९सकळिकां नकस्कार करुनी यादवरावो । सांगे जीवींचा भावो तयांप्रती ॥१॥तुमचे कृपादृष्टि करावें भोजन । येणें होईल संपूर्ण व्रतसिद्धी ॥२॥हेचि आवडी आहे बहु माझ्या जीवीं । ते आजी गोसावी पूर्ण कीजे ॥३॥क्षण एक बैसावें स्वस्थ अंतःकरणें । संकल्पिलें नारायणें तुळसीदळ ॥४॥संतुष्ट मानसें यातें अंगिकारा । मग निजमंदिरा जावें स्वामी ॥५॥आजि तुमचा लाभु जाला भाग्य योगें । नामयाच्या प्रसंगें घडली सेवा ॥६॥तुम्ही ब्रह्मबीज ब्रह्मादिकां पूज्य । सांभाळिले मज कृपादृष्टी ॥७॥मज निरालंबासी करोनी अवलंबन । निष्कामासी पूर्ण केलें काम ॥८॥अकर्ता असंगु तुमचेनि कृतार्थ । जालों पैं यथार्थ वचन माझें ॥९॥मग ते चतुर्विधा महामंत्रस्वरें । द्विज जयजयकार करिताती ॥१०॥विजय सर्वकाळ व्हावें पुढतो पुढतीं । आशिर्वाद देती मंत्राक्षता ॥११॥पितांबराचे अचळीं घेउनी मंत्राक्षता । घालितसे माथा नामयाच्या ॥१२॥हेंचि तुझें प्रेम राहो हें चिरंतन । मुखीं नाम ध्यान ह्रदयी सदा ॥१३॥तंव म्हणती धरामर तुम्ही श्रमलेति थोर । लागला उशीर भोजनांसी ॥१४॥सर्वाम ठाईं तुम्ही सर्वच होउनी एक । कारण सार्थक केलें निकें ॥१५॥स्वामीचा आदर सांगतां अभिनव । नम्रता गौरव निरुपम ॥१६॥अकल्प आयुष्य चिरंजीव व्हावें । आम्हां सांभाळावेम पुढतापुढतीम ॥१७॥आतां संतांचिया पंक्ती सारावें भोजन । करावेम परीपूर्ण जीवींचे कोड ॥१८॥उच्छिष्ट प्रसाद द्यावा नामयातें । आस करुनि पाहात वास तुमची ॥१९॥३०सुवर्णाचें ताट वोगरुनी परिकर । रुक्माईनेम सत्वर आणियेलें ॥१॥कनक कळस घेऊनि सत्यभामा आली । आपोशन घाली देवराया ॥२॥सुखाचा सुरतरु भक्त चिंतामणी । पुरवितो आयणी निजभक्ताची ॥३॥तेथे उद्धव अक्रुर नारद तुंबर । आणिक अपार भक्त येती ॥४॥महाद्वारीं होतां उभा नामा ठेला । तो जवळी बोलाविला केशिराजें ॥५॥देवाचा वोरसु देखोनी गौरव । देहीं देहभाव विसरला ॥६॥निजबोध निवृत्ति राहिली निवांत । ह्रदयीं वोसंडित प्रेमरसें ॥७॥देखोनी पंढरीनथ धाविन्नला वेगीं । जैसी वत्सालागीं तान्हें धेनू ॥८॥उचलोनि चहूंभुजी दिलें आलिंगन । आणिलें उमजून देहावरी ॥९॥धरोनि बाहुवटीं बैसविला ताटीं । स्फुंदताम हिंपुटी होत असे ॥१०॥कुर्वाळोनि माथा घास घाली मुखीं । तंव तो परलक्षी तन्मय होतु ॥११॥अंतरीचें गुज बोले कृपासिंधु । करुनि सावधु नामयासी ॥१२॥म्हणे जिवलगा बोलें सुख गोष्टी । आर्त आहे पोटीं बहु दिवसांचें ॥१३॥अंतरीचें सुख बाहेरी तूं पाहे । गगना काय आहे पाठीपोट ॥१४॥तैसा तूं आनंदु आहे पै निर्मळ । चिद्रूप केवळ सदोदित ॥१५॥तुझें तेंचि माझें माझें तेंचि तुझें । आहे सहजीम सहजें एकविध ॥१६॥परतोनियां दृष्टि घाली मजवरी । मी तो निरंतरीं तूंचि होसी ॥१७॥हा तुझा सोहळा पाहें उघडा डोळां । मी तुज जवळां ज्ञानदीपू ॥१८॥आर्त तुझिये भेटी आले भक्तराणे । सुखाचें पारणें करवी त्यांसी ॥१९॥परमानंद मूर्ति धन्य हा निर्वृत्ति । सुखाचा सांगाती ज्ञानदेव ॥२०॥पवित्र हा सोपान परलोकींचें तारुं । करी याचा आदरु भाग्यवंता ॥२१॥म्हणोनि पंढरीनाथें आश्वासिलें करें । मिठी दिली येरें चरणकमळीं ॥२२॥नामा म्हणे तुझे कृपेचा वोल्हावा । विश्रांति या जिवा जाली असे ॥२३॥ N/A References : N/A Last Updated : January 02, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP