मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|श्रीज्ञानेश्वरांची आदि| अभंग ११ ते २० श्रीज्ञानेश्वरांची आदि अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३१ श्रीज्ञानेश्वरांची आदि - अभंग ११ ते २० संत नामदेवांनी संतांचा महिमा इतका रसाळ वर्णन केला आहे, तो एकमात्र त्यांनीच करू जाणे! Tags : abhangbooknamdevअभंगनामदेवपुस्तक अभंग ११ ते २० Translation - भाषांतर ११असतां सुखरुप मातापिता वृद्ध । वैकुंठा स्वानंदे निघोनी गेलीं ॥१॥संसाराची चिंता नाहीं विठठलासी । अखंड वृत्तीसी समाधान ॥२॥जालें वर्तमान ऐकिलें सिदोपंतीं । परम तेणें चित्तीं खेद केला ॥३॥येउनि परामर्ष घेतला दोघांचा । म्हणे सांभाळ तुमचा करितो देव ॥४॥उदासीन वृत्ति तुमची सर्वकाळ । पदार्थ सकळ पाहिजे तो ॥५॥दया करोनि मज आतां सांभाळावें । आळंकापुरीं राहावें सुखरुप ॥६॥पुत्रसंतती कांही होईल तुम्हांसी । मग येईल चित्तासी तें करा सुखें ॥७॥मग मानुनी वचन विठठलें तयाचें । म्हणे हें देवाचे करणें हो ॥८॥१२येउनि आळंकावती केला क्षेत्रवास । देऊनी चित्तास समाधान ॥१॥नित्य हरिकथा नामसंकीर्तन । संतांचे दरुशन सर्वकाळ ॥२॥पंढरीची वारी आषाढी कार्तिकी । विठठल येकाकी सुखरुप ॥३॥ऐसा बहुत काळ क्रमिलियावरी । पुत्र अपत्य उदरीं होतां न दिसे ॥४॥विठठल म्हणे अवो ऐकतेसी कांते । मज ऐसें वाटतें संन्यास घ्यावा ॥५॥देसी आज्ञा तरी जाईन वाराणसी । ऐसें रखुमाईसी म्हणितलें ॥६॥१३रखुमाई म्हणे ऐकतां जी ताता । संन्यास घ्यावा आतां म्हणताती ॥१॥संतती वांचूनि न घ्यावा संन्यास । ऐसें सांगावें त्यांस म्हणितलें ॥२॥निरोपाची वाट पाहे भलत्या मिसें । रखुमाई असे सावधान ॥३॥असताम दुश्चितपणें निरोप पुसिला । जा जा म्हणे दिधला अवसरु ॥४॥जाऊनि विठठलें घेतला संन्यास । चिंता रखुमाईस पडली भारी ॥५॥१४करावें सार्थक रखुमाईनें तेव्हां । आरंभिली सेवा अश्वत्थाची ॥१॥जाणोनी पैं देवें उग्र अनुष्ठान । तेथें जालें येणें श्रीपादाचें ॥२॥देखोनि सत्पात्र केला नमस्कार । सारांश उत्तर बोलियेलें ॥३॥पुत्रवती होई दिधला आसीर्वाद । रखुमाईसी विनोद वाटियेला ॥४॥माते तूं हांससी श्रीपाद पुसती । स्वामी पुत्र कैसे होती पतीविण ॥५॥भ्रतारें जाऊनी घेतला संन्यास । स्वामीचे वचनास वचनास नलगे बोल ॥६॥पुसतां खाणखूण निश्चयो बाणला । श्रीपाद बोलिला सत्य सत्य ॥७॥रखुमाईसी पुसे असे तुझें कोणी । येरी कर जोडोनी बोलियेली ॥८॥१५मातापिता घरीं आहेती समस्तें । वर्तमान तयातें श्रुत करुं ॥१॥कृपा करुनी यावें तुम्ही आश्रमासी । सनाथ करावयासी कृपादृष्टि ॥२॥नेऊनी आश्रमा दिधलें आसन । केलें श्रुत वर्तमान सिदोपंतीं ॥३॥अर्घ्यपाद्यपूजा भोजन सारिलें । मग वर्तमान पुसिलें सिदोपंतीं ॥४॥श्रीपाद म्हणती रामेश्वरी भाव । तंव येथें हा अभिप्राव जाला ऐसा ॥५॥आतां फिरोनियां जाणें वाराणसी । घेऊनी रखुमाईसी तुम्ही यावें ॥६॥१६श्रीपाद म्हणती याच्या दोषास्तव । माझें पुण्य सर्व लया जातें ॥१॥सिदोपंत म्हणत तुम्ही दयावंत । सीघ्र गमनार्थ कीजे स्वामी ॥२॥जाउनी वाराणसीं मठी प्रवेशले । मग पाचारिलें चैतन्यासी ॥३॥तुझें कोणी होतें सत्य सांग आतां । अन्यथा बोलतां उरी नाहीं ॥४॥चैतन्यें चरणीं ठेवियेला माथा । म्हणे त्यागुनी कांता आलों स्वामी ॥५॥उठवोनी श्रीपादें दिधलें आश्वासन । म्हणतां करी पाणिग्रहण इचें आतां ॥६॥अविधि कर्माचें न धरावें भय । यासी आहे साह्य जगदीश ॥७॥स्वदेशा जाउनी करावा आश्रमु । सुखरुप स्वधर्मु चालवावा ॥८॥श्रीपादें मस्तकीं हात ठेवियेला । निरोप दिधला चैतन्यासी ॥९॥१७चैतन्याश्रम संन्यासी जाले गृहवासी । मुळींच्या प्रकृतीसी ऐक्य केलें ॥१॥हासिन्नले लोक बरवा हा संन्यास । करिती उपहास दर्शनाचा ॥२॥द्विजीं वाळियेलें जगीं सांडियेलें । सेखीं उपेक्षिलें आप्तवर्गीं ॥३॥ऐसीं बारा वरुर्षे क्रमिली निगुती । तंव जालीसे संतती चौघजण ॥४॥निवृत्ती ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई । हांसती सकळही ऐकोनि नांवें ॥५॥जालीं उपवरें व्रतबंधा योग्य । उभयतां उद्धेग चिंतातुरें ॥६॥जातिकुळावेगळी पडियेली निराळी । माझी वंशावळी प्रायश्चित्त ॥७॥मेळविले द्विज केली ब्रह्मसभा । क्षमा अपराधा करा दीना ॥८॥निबंधीं निर्णय पाहती धर्मशास्त्रीं । तुम्हीं अति श्रौती परायण ॥९॥सांगाल तें मान्य म्हणती साहीजणें । शुची हें करणें पतितांसी ॥१०॥निवृत्ती म्हणे तुम्ही भूदेव प्रत्यक्ष । दर्शनेची मोक्ष जडमूढा ॥११॥१८पाहतील ग्रंथ सभाश्रेष्ठ महाजन । वैदिक शास्त्रज्ञ पुण्यश्लोक ॥१॥देहान्त प्रायश्चित्त असे या बोलिलें । विचारुनि भलें हित करा ॥२॥म्हणती द्विजवर आणिक नाहीं उपाव । संस्कारें देह करा शुद्ध ॥३॥श्रीपाद म्हणती अवश्य करीन । देह हे दंडीन अनुतापें ॥४॥त्रिवेणी संगमीं घालीन कर्वती । गेला पूर्वस्थिती वीतरागेम ॥५॥दारापुत्रगृह त्यजुनी निघाला । नमस्कार केला द्विजवृंदा ॥६॥झडझडां जाती परतोनी न पाहती । नाहीं पुनरावृत्ति म्हणती द्विज ॥७॥त्याग आणि वैराग्य हेंचि प्रायश्चित्त । मग जाला शुचिर्भूत गुरुकृपें ॥८॥निवृत्ती म्हणती आम्हां कवण गती । सांगावे श्रीमंती विचारुनी ॥९॥१९म्हणती सकळ द्विज जावें प्रतिष्ठाना । तेथुनी पत्र आणा तें वंद्य करुं ॥१॥नाहीं जाती कुळ वर्ण अधिकार । क्षेत्री वैश्य शूद्र द्विज नव्हों ॥२॥नव्हों देवगण यक्ष ना किन्नर । ऋषि निशाचर तेही नव्हों ॥३॥ते आम्ही अविनाश अव्यक्त जुनाट । निजबोधें इष्ट स्वरुप माझें ॥४॥नव्हों आप तेज वायू व्योम मही । महत्तत्व तेंही विराट नव्हों ॥५॥नव्हें मी सगुण नव्हें मी निर्गुण । अनुभूतीं भजन होउनी नव्हें ॥६॥निवृत्ति म्हणतसे ऐकें ज्ञानेश्वरा । माझी परंपरा ऐसी आहे ॥७॥२०विधी वेद विरुद्ध संपर्क संबंध । नाहीं भेदाभेद स्वस्वरुपीं ॥१॥अविधि आचरण परम दूषण । वेदोनारायण बोलियेला ॥२॥स्वधर्म अधिकार जातीपरत्व भेद । उचित तें शुद्ध ज्याचें तया ॥३॥म्हणोनियां संतीम अवश्य आचरावेम । जनां दाखवावें वर्तेनियां ॥४॥कुळींचा कुळधर्म अवश्य पाळावा । सर्वथा न करावा अनाचार ॥५॥प्रत्यवाय आहे अशास्त्रीम चालतां । पावन अवस्था जरी जाली ॥६॥ज्ञानदेव म्हणे ऐकाजी निवृत्ति । बोलिली पद्धती धर्मशास्त्रीं ॥७॥ N/A References : N/A Last Updated : January 02, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP