मंत्रप्रकरण - अन्नपूर्णामंत्र

" श्रद्धावान लभते फलं" म्हणजे श्रद्धालु पुरूषालाच मंत्रानुष्ठानाची यथोक्त फलप्राप्ति होते.


" ॐ र्‍हीँ श्रीं क्लीं नमो भगवति माहेश्वरि अन्नपूर्णे स्वाहा "

ह्या वीस अक्षरात्मक अन्नपूर्णा मंत्राचा जप केल्याने सर्व मनोरथ सिद्ध होतात .

अथ संकल्पः -

ॐ अस्य श्री अन्नपूर्णेश्वरी मंत्रस्य द्रुहिणः ऋषिः

कृतिच्छंदः अन्नपूर्णेशी देवता ममाखिलसिद्ध्यर्थे जपे विनियोगः ॥

अथांगन्यासः -

ॐ अस्य श्री अन्नपूर्णेश्वरी मंत्रस्य द्रुहिणऋषिः इति शिरसि।

कृतिच्छंद इति मुखे। अन्नपूर्णेशी देवता इति हृदये।

हूंबीजं फःशक्ति इति गुह्ये। स्वाहा कीलकमिति पादयोः।

ममाखिलसिद्ध्यर्थे जपे विनियोग इति सर्वांगे ॥

अथ ध्यानम

तप्तस्वर्णनिभाशशांकमुकुटा रत्नस्वराभासुरा।

नानारत्नविराजिता त्रिनयना भूमीरमाभ्यां युता॥

दर्वीहाटकभाजनं च दधती रम्योच्चपीनस्तनी।

नृत्यंतं शिवमाकलय्य मुदिता ध्येयाऽन्नपूर्णेश्वरी॥

अर्थ -

अग्नीमध्ये तापलेल्या सुवर्णासमान जिची कांति असून मस्तकाचे ठायी चंद्राप्रमाणे शुभ्र मुकुट धारण करणारी , रत्नाच्या निर्मल कांतीप्रमाणे शुक्ल वर्ण , रत्नजडित भूषणांनी शोभायमान , तीन नेत्र धारण करणारी , भूमी व लक्ष्मी जिच्यासह आहेत , अर्थात अनन्य भक्तीने आपणास शरण येणारास भूमी व लक्ष्मी ह्या दोघी देण्याविषयी तत्पर , उजव्या हातांत दर्वी ( पळी ) व डाव्या हातांत सुवर्णपात्र घेतलेली , अत्यंत मनोहर रुप , उंच स्तनद्वयाने युक्त ; आणि श्रीमहादेवास नृत्य करतांना पाहून अत्यंत सुप्रसन्न झालेली ; अशा प्रकारचे अन्नपूर्णा देवीचे ध्यान करावे .

फलः -

ह्या मंत्राचा एक लक्ष जप व दहा हजार होम केल्याने सिद्धि होते . होमद्रव्यामध्ये घृत मिश्रित करणे अवश्य आहे . नंतर जयादि नऊ शक्तिसंपन्न अशा सिंहासनावर तिची पूजा करावी . अशा प्रकारे जप केल्यामुळे जेव्हां हा मंत्र सिद्ध होतो , तेंव्हा त्याचे घरी कुबेराचे संपत्तीचा संचय होतो व तो पुरुष सर्वांस वंद्य होऊन अधिष्ठाता होतो . ह्या मंत्राच्या प्रभावाने कुबेर हा महादेवाचा मित्र होऊन अष्ट दिक्पाल हेही कैलासाचे अधिपति ह्याच मंत्राच्या बलेकरुन झाले .

यंत्रोद्धार

मध्यभागी त्रिकोण काढून चारी बाजूंस चार कमलांच्या पांकळ्या काढून त्याच्यावर अष्टदल पद्म लिहावे , नंतर षोडशदल पद्म काढून भूपुराने युक्त करुन त्यावर अन्नपूर्णा देवीची स्थापना करावी ; ह्या यंत्राचे अग्नि आदिकरुन जे तीन कोण आहेत त्यांमध्ये क्रमाने शिव , वराह आणि माधव ह्याची मंत्राद्वारा भिन्न भिन्न पूजा करावी , असे भगवान मनूने सांगितले आहे . " ॐ हौं नमः शिवायेति " ह्या सप्तार्ण मंत्राने वरील यंत्राचे ठायी मंगलकारक शिवाची पूजा करावी .

दुसर्‍या कोणामध्धे " ॐ नमो भगवते वराहरुपाय भूर्भुवः स्वःपतये भूपतित्वं मे देहि ददापय स्वाहा " हा तेहतीस अक्षरांचा मंत्र लिहून वराहाची पूजा करावी . तसेच तिसर्‍या कोणामध्ये " ॐ नमो नारायणाय " हा अष्टाक्षर मंत्र लिहून भगवान श्रीविष्णूची अर्चना करावी . नंतर यथाक्रमाने ह्या तिन्ही मंत्रांचा उच्चार करुन अंगन्यास करावा . नंतर " ग्लौ अन्नं मह्यन्नं मे देह्यान्नाधिपतये ममान्नं प्रदापय स्वाहा ग्लौ " ह्याच मंत्रास भूबीज ग्लौं आणि लक्ष्मीबीज श्री ह्यांनी संपुटित करुन उजवीकडे लक्ष्मीची व डावीकडे भूमीची पूजा करावी . त्यानंतर खाली दिलेल्या चार शक्ति चार दलांचे ठायी स्थापन कराव्या , त्या अशाः - " ॐ पराय नमः " " र्‍हीं भुवनेश्वर्यै नमः " " श्री कमलायै नमः " " क्लीं सुभगाय नमः " नंतर १ ब्राह्मी , २ महेश्वरी , ३ कौमारी , ४ वैष्णवी , ५ वाराही , ६ इंद्राणी , ७ चामुंडा , ८ भुवनेश्वरी ह्यांची अष्टदलांचे ठायी स्थापना करुन पूजा करावी . पुनः षोडशदलामध्ये " १ अं अमृतायै नमः " २ " मां मानदायै नमः " ३ " तुं तुष्यै नमः " ४ " पुं पुष्यै नमः " ५ " प्रिप्रीत्यै नमः " ६ " रं रत्यै नमः " ७ " र्‍हीं र्‍हियै नमः " ८ " श्रीं श्रियौ नमः " ९ " स्वं स्वधायै नमः " १० " स्वां स्वाहायै नमः " ११ " ज्यो ज्योत्सनायै नमः " १२ " है हैमवत्यै नमः " १३ " छां छायायै नमः " १४ पूं पूर्णिमायै नमः " १५ " निं नित्यायै नमः " १६ " अं अमावास्यायै नमः " ह्या प्रकारे ह्यांचे न्यासपूर्वक पूजन करावे . पुढे भूपुराचे ठायी लोकपालांचे पूजन करुन त्यांच्या अग्रभागी अस्त्रांची पूजा करावी .

अन्नपूर्णेचा दुसरा मंत्र

" ॐ र्‍हीं नमः भगवति माहेश्वरि अन्नपूर्णे स्वाहा " हा अष्टादशाक्षरी मंत्र आहे. " ॐ र्‍हीं श्रीं क्लीं नमः भगवति माहेश्वरी ममाभिमतमन्नं देहि देहि अन्नपूर्णे स्वाहा " हा तेवीस अक्षरांचा मंत्र होय.

N/A

References : N/A
Last Updated : September 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP