मंत्रप्रकरण - कालीमंत्र.

" श्रद्धावान लभते फलं" म्हणजे श्रद्धालु पुरूषालाच मंत्रानुष्ठानाची यथोक्त फलप्राप्ति होते.


कालीमंत्र .

क्रीँ क्रीँ क्रीँ र्‍हीँ र्‍हीँ र्‍हूँ , र्‍हूँ दक्षिणे कालिके

क्रीँ क्रीँ क्रीँ र्‍ही र्‍हीँ ‍ र्‍हूँ र्‍हूँ स्वाहा .

कालीध्यान

करालवदनां घोरा मुक्तकेशां चतुर्भुजाम। कालिकां दक्षिणा दिव्या मुण्डमालाविभूषिताम ॥ सद्यश्छिन्नशिरःखड्गवामाधोर्ध्वकरांबुजाम। अभयंवरदाञ्चैव दक्षिणाधोर्ध्वपाणिकाम ॥ महामेघप्रभाश्यामां तथा चैव दिगंबराम। कण्ठावसक्तमुंडालीगलद्रुधिरचर्चिताम। कर्णावतंसतानीतशवयुग्मभयानकाम। घोरदंष्ट्राकरालस्या पीनोन्नतपयोधराम ॥ शवानां करसंघातैः कृतकांची हसन्मुखीम। सृक्कद्वयगलद्रक्तधारविस्फुरिताननाम । घोरगावां महारौद्री स्मशानालयवासिनीम। बालार्कमंडलाकारलोचत्रियान्विताम ॥ दन्तुरां दक्षिणव्यापि मुक्तालब्मिकचोच्छ्रयाम। शिवरुपमहादेवहृदयोपरिसंस्थिताम ॥ शिवाभिर्घोररावाभिश्चतुर्दिक्षु समन्विताम। महाकालेन च समं विपरीतरतातुराम। सुखप्रसन्नवदनां स्मराननसरोरुहाम। एवं संचितयेत काली सर्वकामसमृद्धिदाम ॥

भावार्थः -

कालिका देवीचे मुख भयंकर असून दर्शनीय आहे . भुजा ( हात ) चार असून केंस मोकळे सोडलेले आहेत . रुंडमाला धारण केल्यामुळे अत्यंत सुशोभित आहे . तिच्या डावीकडील दोन हातामध्ये नुकतीच छिन्नभिन्न केलेली शिरे हीच कोणी खड्ग असून तिच्या उजवीकडील दोन हातांमध्ये अभय आणि वरदान ही विद्यमान आहेत . ती देवी मोठ्या मेघाप्रमाणे श्यामवर्ण असून दिगंबरी आहे . कंठामध्ये धारण केलेल्या माळेंतील शिरांपासून गळणार्‍या रुधिराने तिचे सर्व शरीर लिप्त झालेले आहे . तिचे मुख व दाढा अत्यंत भयंकर असून पुष्ट व उन्नत असे तिचे स्तनद्वय आहे . दोन्ही कानांमध्ये घातलेल्या मृतशिरांच्या भूषणामुळे तिच्या रुपाची शोभा वृद्धिंगत होत आहे . तिचे सुहास्यवदन असून ओंठापासून रक्तधारा स्त्रवत असल्याकारणाने मुखकमल कम्पायमान दिसत आहे . ध्वनि घोर असून अत्यंत भयंकर , अशी ती देवी स्मशानामध्ये वास करणारी आहे . तिचे दोन्ही नेत्र बालसूर्याप्रमाणे तेजस्वी असून दांत मोठे आणि केस लांब आहेत . ती शिवरुपी महादेवाच्या हृदयावर स्थित आहे . तिच्या चारही बाजूंनी घोर ध्वनि करणारी कोल्ही ( भालू ) भ्रमण करीत आहेत . महाकालासहवर्तमान विलक्षण क्रीडा करण्यामध्ये ती निमग्न झालेली आहे . मदनाच्या मुखकमलाप्रमाणे प्रफुल्लित व प्रसन्न असे तिचे मुख असून ती सर्व मनोरथ पूर्ण करणारी आहे . याप्रमाणे देवी कालिकेचे ध्यान करावे .

जपहोमः -

लक्षमेकं जपेद्विद्या हविष्याशी दिवा शुचिः।

ततस्तु तद्दशांशेन होमयेद्धविषा प्रिये ॥

अर्थः -

शुचिर्भूत होऊन पूजा वगैरे आटोपल्यानंतर एकाग्र चित्ताने ह्या मूल मंत्राचा एक लक्ष जप करावा . दिवसा हविष्यान्नाचे एकवार भोजन करावे . जपाचा दशांश घृतहोम करावा .

कालीस्तव

कर्पूरं मध्यमांत्यस्वरपररहितं सेन्दुवामाक्षियुक्तम।

बीजं ते मातरेतत त्रिपुरहरवधू त्रिःकृतं ये जपंति ॥

तेषां गद्यानि पद्यानि च मुखकुहरादुल्लसंत्येव वाचः।

स्वच्छंदं ध्वांतधाराधररुचिरुचिरे सर्वसिद्धिं गतानाम ॥१॥

ईशानः सेंदुवामश्रवणपरिगतं बीजमन्यन्महेशि।

द्वंद्व ते मंदचेता यदि जपति जनो वारमेकं कदाचित ॥

जित्वा वाचामधीशं धनदमपि चिरं मोहयन्नंबुजाक्षी।

वृंदं चंद्रार्धचूडे प्रभवति स महाघोरबाणावतंसे ॥२॥

ईशो वैश्वानरस्थः शशिधरविलसद्वामनेतेण युक्तो।

शशिधरविलसद्वामनेत्रेण युक्तो।

बीजं ते द्वंद्वमन्यद्विगलिदचिकुरे कालिके ये जपन्ति ॥

द्वेष्टारं घ्नंति ते च त्रिभुवनमपि ते वश्यभावं न याति।

सृक्कद्वंद्वास्त्रधाराद्वयधरवरदे दक्षिणे कालिकेति॥३॥

उर्ध्व वामे कृपाणं करतकमलं छिन्नमुंडं तथाधः।

सव्ये चाभीर्वरं च त्रिगगदघहरे दक्षिणे कालिकेति ॥

जप्त्वैतन्नामवर्णं तव मनुविभवं भावयंते तदंब।

तेषामष्टौकरस्थाः प्रकटितवदने सिद्धयस्त्र्यंबकस्य ॥४॥

वर्गाद्य वन्हिसंस्थं विधुरतिललितं तत्त्रयं कूर्चयुग्मं।

लज्जाद्वंद्वं च पश्चात स्मितमुखि तदधष्टद्वय योजयित्वा॥

मातर्ये ये जपंति स्मरहरमाहेले भावयं ते स्वरुपं।

ते लक्ष्मीलास्यलीलाकमलदलदृशः कामरुपा भवन्ति ॥५॥

प्रत्येकं वा त्रयं वा द्वयमपि च परं बीजमत्यंतगुह्यं।

त्वन्नाम्ना योजयित्वा सकलमपि सदा भाववंतो जपंति ॥

तेषां नेत्रारविंदे विहरति कमला वक्त्रशुभ्रांशुबिम्बे।

वाग्देवी दिव्यमुंडस्त्रगतिशयलसत कंठपीनस्तनाढ्ये ॥६॥

गतासूनां बाहुप्रकरकृतकांचीपरिलसत ।

नितंबा दिग्वस्त्रां त्रिभुवनविधात्री त्रिनयनाम ॥

स्मशानस्थे तल्पे शवहृदि महाकालसुरत ।

प्रसक्ता त्वां ध्यायन जननि जडचेता अपि कविः ॥७॥

शिवाभिर्घोराभिः शवनिवहमुंडास्थिनिकरैः।

परं संकीर्णायां प्रकटितचितायां हरवधूम ॥

प्रविष्टां संतुष्टामुपरि सुरतेनातियुवती।

सदा त्वां द्यायन्ति क्वचिदपि न तेषां परिभवः ॥८॥

वदामस्ते किंवा जननि वयमुच्चैर्जडधियो।

न धाता नापीशो परिरपि न ते वेत्ति परमम ॥

तथापि त्वद्भक्तिर्मुखरयति चास्माकमसिते।

तदेदत क्षतव्यं न खलु शिशुरोषः समुचितः ॥९॥

समन्तादापीनस्तनजधनधृग्यौवनवती।

रतासक्तो नक्तं यदि जपति भक्तस्तव मनुम ॥

विवासास्त्वां ध्यायन गलितचिकुरस्तस्य वशगाः।

समस्ताः सिद्धौघा भुवि चिरतरं जीवति कविः ॥१०॥

समः सुस्थीभूतो जपति विपरीतो यदि सदा।

विचिन्त्य त्वां ध्यायन्नतिशयमहाकालसुरताम ॥

तदा तस्य क्षौणीतलविहरमाणस्य विदुषः।

कराम्भोजे वश्या स्मरहरवधू सिद्धिनिवहाः ॥११॥

प्रसूते संसारं जननि जगती पालयति च।

समस्तं क्षित्यादिप्रलयसमये संहरति च ॥

अतस्त्वां धाताऽपि त्रिभुवनपतिः श्रीपतिरपि।

महेशोऽपि प्रायः सकलमपि किं स्तौमि भवतीम ॥१२॥

अनेके सेवंते भवधिकगीर्वाणनिवहान।

विमूढास्ते मातः किमपि नहि जानंति परमम ॥

समाराध्यामद्यां हरिहरविरिञ्च्यादिविबुधैः।

प्रपन्नोऽस्मि स्वैरं रतिरसमहानंदनिरताम ॥१३॥

धरित्रीं कीलालं शुचिरपि समीरोऽपि गगनं।

त्वमेका कल्याणी गिरिश - रमणी कालि सकलम ॥

स्तुतिः का ते मातस्तव करुणया मामगतिकं।

प्रसन्ना त्वं भूया भवमनु न भूयान्मम जनुः ॥१४॥

स्मशानस्थः स्वस्थोः गलितचिकुरो दिक्पटधरः।

सहस्त्रं त्वर्काणां निजगलितवीर्येण कुसुमम ॥

जपस्त्वत प्रत्येकं मनुमपि तव ध्याननिरतो।

महाकालि स्वैरं स भवति धरित्रीपरिवृढः ॥१५॥

गृहे सम्मार्ज्जन्या परिगलितवीर्या हि चिकुरं।

समूलं मध्यान्हे वितरति चितायां कुजदिने ॥

समुच्चार्य प्रेम्णा मनुमपि सकृत कालि सततम।

गजारुढो याति क्षितिपरिवृढः सतकविवरः ॥१६॥

सुपुष्पैराकीर्णं कुसुमधनुषो मंदिरमहो।

पुरो ध्यायन्ध्यायन यदि जपति भक्तस्तव मनुम ॥

स गंधर्वश्रेणीपतिरवि कवित्वामृतनदी।

न दीनः पर्यंते परमपदलीनः प्रभवति ॥१७॥

त्रिपञ्चारे पीठे शवशिवहृदि स्मेरवदनाम।

महाकालेनोच्चैर्मदनरसलावण्यनिरताम ॥

समासक्तो नक्तं स्वयमपि रतानंदनिरतो।

जनो यो ध्यायेत्वामपि जननि स स्यात स्मरहरः ॥१८॥

सलोमास्थिस्वैरं पललमपि मार्जारमासिते।

परञ्चौष्ट्रं मैषं नरमहिषयोश्छागमपि वा ॥

बलिते पूजायामपि वितरतां मर्त्यवसताम।

सतां सिद्धिः सर्वा प्रतिपदमपूर्वा प्रभवति ॥१९॥

वशी लक्षं मंत्रं प्रजपति हविष्याशनरतो।

दिवा मातर्युष्मच्चरणयुगुलध्याननिपुणः ॥

परं नक्तं नग्नो निधुवनविनोदेने च मनुं।

जनो लक्षं स स्यात स्मरहरसमानः क्षितितले ॥२०॥

इदं स्तोत्रं मातस्तवमनुसमुद्धारणजनुः।

स्वरुपाख्यं पादांबुजयुगुलपूजाविधियुतम ॥

निशार्धं वा पूजासमयमधि वा यस्तु पठति।

प्रलापस्तस्यापि प्रसरति कवित्वामृतरसः ॥२१॥

कुरंगाक्षी वृन्दं तमनुसरति प्रेमतरलं।

वशस्तस्य क्षौणीपतिरपि कुबेरप्रतिनिधिः ॥

रिपोः कारागारं कलयति च तत केलिकलया।

चिरं जीवन्मुक्तः स भवति सुभक्तः प्रतिजनुः ॥२२॥

विधिसह फलश्रुतिः -

जो मनुष्य स्मशानामध्ये केश मोकळे सोडून वस्त्रहीन ( नग्न ) होऊन विहित आसनावर स्वस्थ मनाने तुझ्या दिव्य स्वरुपाचे उक्त मंत्रजपासहित ध्यान करीत होत्साता एक एक अशी रुईची सहस्त्र विगलित पुष्पे तुला अर्पण करतो , तो संपूर्ण पृथ्वीचा अधिपति होतो . हे देवी ! गृहामध्ये विंचरताना गळलेले स्वस्त्रीचे केश सर्व घेऊन मंगळवारी माध्यान्ह काली उक्त मंत्रजपपूर्वक भक्तिपुरःसर जो मनुष्य ते केश चिताग्नीमध्ये ( तुझ्या चिताग्निस्वरुपी ) अर्पण करितो , तो पृथ्वीपति होऊन निरंतर हत्तीवर आरुढ होतो . शिवाय व्यासादिकांसारख्या कविजनांमध्ये तो प्राधान्य मिळवितो . इतकेच नव्हे तर , पूर्वोक्त ध्यान व जप करणारे पुरुष या लोकी इंद्रासारखे स्वामित्व भोगून अंती त्या नित्य ध्यानाच्या प्रभावामुळे तुझ्या स्वरुपी लीन होतात . कारण , हे जगन्माते ! तूं प्रसन्नवदना व स्वभक्तकामेच्छा तात्काल पुरी करणारी आहेस . सदाशिवाबरोबर तुझा नित्य विहार असल्यामुळे जो साधक शिवहृदयस्वरुप आसनावर पंधरा कोणांनी युक्त अशा कालियंत्रामध्ये पूर्वोक्त प्रकारे शिवासह तुझे ध्यान करतो , तो शिवरुप होतो . जो मनुष्य पूजासमयी मांजर , उंट , नर , महिष इत्यादिकांचे मांस , रोम , अस्थि इत्यादि पदार्थ मोठ्या भक्तीने तुला अर्पण करितो , त्यास अनेक प्रकारच्या सिद्धि प्राप्त होतात ! सर्व इंद्रिये स्वाधीन ठेवून केवळ हविष्यान्नसेवनावरच प्रातःकालपासून दोन प्रहरपर्यंत जो मनुष्य तुझे ठायी एकाग्र चित्त ठेवून नित्य जप करीत एक लक्ष जपसंख्या म्हणजे एक पुरश्चरण करतो ; तो महादेवासमान सिद्ध होतो .

हे जननी ! मी केलेल्या ह्या तुझ्या स्तवनामध्ये तुझे स्वरुपवर्णन व मंत्रजपविधान यथामति कथन करुन तुझ्या चरणकमलाची पूजा , ध्यानादि विधीहि थोडक्यांत सांगितला आहे . जो साधक मध्यरात्री किंवा पूजासमयी हा स्तव नित्य पठण करील , त्याची वाणी यद्यपि दुष्ट असली , तरी ती प्रबंधयुक्त होऊन उत्तम प्रकारचे कवित्व वर्णन करील .

कालीकवच

श्रीजगन्मंगलस्यास्य कवचस्य ऋषिः शिवः।

छंदोऽनुष्टुप देवता च कालिका दक्षिणेरिता ॥

जगतां मोहने दुष्टनिग्रहे भुक्तिमुक्तिषु।

योषिदाकर्षणे चैव विनियोगः प्रकीर्तितः ॥१॥

शिरो मे कालिका पातु क्रींकारैकाक्षरीपरा।

क्रीँ क्रीँ क्रीँ मे ललाटश्च कालिका खड्गधारिणी ॥

र्‍हूँ र्‍हूँ पातु नेत्रयुग्मं र्‍हीँ र्‍हीँ पातु श्रुती मम।

दक्षिणे कालिके पातु घ्राणयुग्मं महेश्वरी ॥२॥

क्रीँ क्रीँ क्रीँ रसना पातु र्‍हूँ र्‍हूँ पातु कपोलकम।

वदनं सकलं पातु र्‍हीँ र्‍हीँ स्वाहास्वरुपिणी ॥

द्वाविंशत्यक्षरी स्कंधौ महाविद्या सुखप्रदा।

खड्गमुण्डधराकाली सर्वांगमभितोऽवतु ॥३॥

क्रीँ र्‍हूँ र्‍हीँ त्र्यक्षरी पातु चामुण्डा हृदयं मम।

ऐँ र्‍हीँ ओँ ऐँ स्तनद्वद्वं र्‍हीँ फट स्वाहा ककुत्स्थलम ॥

अष्टाक्षरी महाविद्या भुजौ पातु सकर्तृका।

क्रीँ क्रीँ र्‍हूँ र्‍हूँ र्‍हीँ र्‍हीँ करौ पातु षडाक्षरी मम ॥४॥

क्रीँ नाभि मध्यदेशञ्च दक्षिणे कालिकाऽवतु।

क्रीँ स्वाहा पातु पृष्ठं तु कालिका सा दशाक्षरी ॥

र्‍हीँ क्रीँ दक्षिणे कालिके र्‍हूँ र्‍हीँ पातु कटिद्वयम।

काली दशाक्षरी विद्या स्वाहा पातूरुयुग्मकम ॥५॥

ओँ र्‍हीँ क्रीँ मे स्वाहा पातु कालिका जानुनी मम।

कालीहुन्नाम विद्येयं चतुर्वर्गफलप्रदा ॥

क्रीँ र्‍हीँ र्‍हीँ पातु गुल्फौ च दक्षिणे कालिकेऽवतु।

क्रीँ र्‍हूँ र्‍हीँ स्वाहा पदं पातु चतुर्दशाक्षरी मम ॥६॥

भावार्थः -

हे कवच पठण किंवा धारण केले असतां त्रैलोक्यास मोहिता करितां येते . श्रीविष्णूने हेच कवच धारण करुन नारीवेषाने योगेश्वर महादेवास मोहित केले होते . श्रीरामाने रावणादि दुष्ट राक्षसांचा ह्याच कवचाचे योगाने संहार केला . हे प्राणेश्वरी , ह्याच कवचप्रसादाने मी त्रैलोक्यविजयी ईश्वर झालो आहे . धनपति कुबेर , शचीपति सर्वेश्वर आणि सकळ देवतागण हे ह्याच कवचानुग्रहाने सर्व सिद्धिश्वर झाले . ह्या श्रीजगन्मंगल कवचाचा ऋषि - शिव ; छन्द - अनुष्टुप , देवता - दक्षिणकालिका . जगन्मोहन , दुष्टनिग्रह , भुक्तिमुक्ति इत्यादिकांस साधनीभूत हेंच कवच होय . गुरुची भक्तिपुरस्सर पूजा केल्यावर कवच ग्रहण करणे उचित होय . ह्या कवचाच्या पन्नास आवृत्ति करणारा त्रैलोक्यविजयी होतो . ह्या कवचप्रसादेकरुन पाठक हा एक महिन्यांत महाकवि अथवा सिद्धिचा भोक्ता होतो . मूलमंत्रद्वारा काली मातेस पुष्पांजली देऊन केवळ एकवारच हे कवच पाठ केल्याने शेंकडो वर्षे पूजा केल्याचे फल प्राप्त होते . भूर्जपत्रावर हे कवच लिहून शेंडी , उजवा हात , अथवा कंठ यांपैकी कोठेंही धारण केले असता नुसत्या क्रोधाने सारे त्रिभुवन एका क्षणांत मोहित किंवा चूर्ण करण्याचे सामर्थ्य येते . यांत बिलकूल संशय नाही . अभक्त अथवा परशिष्यास हे प्रदान करुं नये , तर ते आपल्या भक्तिमान शिष्यासच द्यावे ; अन्यथा विनियोग करणारास मात्र मृत्युमुखी पडावे लागते . या कवचप्रसादाने घरांत लक्ष्मीचा वास निरंतर होऊन साधकाच्या मुखी सरस्वती सदैव वास करिते . जो पुरुष ह्या कवचाचे विधान न जाणतां नुसतां कालिमंत्रजप करील , त्यास लाखो जप केल्यानेही सिद्धि प्राप्त होणार नाही , हे सत्य होय .

N/A

References : N/A
Last Updated : September 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP